"नवबौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:


== लोकसंख्या ==
== लोकसंख्या ==
[[इ.स. २०११]] च्या जनगणनेनुसार, भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ८७% बौद्ध (७३ लाख) हे नवबौद्ध आहेत, जे इतर धर्मांतून धर्मांतरित बौद्ध आहेत. आणि उर्वरित १३% बौद्ध (११ लाख) हे हिमालयीन ईशान्य भारतातील असून ते पारंपारिक बौद्ध अाहेत.<ref>[http://www.nationaldastak.com/country-news/buddhism-has-brought-literacy-gender-equality-and-well-being-to-dalits/ Buddhism has brought literacy gender equality and well being to Dalits (in Hindi)]</ref><ref>[http://www.indiaspend.com/cover-story/conversion-to-buddhism-has-brought-literacy-gender-equality-and-well-being-to-dalits-18224 Buddhism has brought literacy gender equality and well being to Dalits]</ref> भारतातील एकूण बौद्धांपैकी ७७% बौद्ध अनुयायी हे महाराष्ट्र राज्यात आहेत तर भारतातील नवबौद्धांपैकी सुमारे ९०% नवबौद्ध [[महाराष्ट्र]]ात आहेत.<ref>[http://www.indiaspendhindi.com/cover-story/%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE]</ref>
[[इ.स. २०११]] च्या जनगणनेनुसार, भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ८७% बौद्ध (७३ लाख) हे नवबौद्ध आहेत, जे इतर धर्मांतून धर्मांतरित बौद्ध आहेत. आणि उर्वरित १३% बौद्ध (११ लाख) हे हिमालयीन ईशान्य भारतातील असून ते पारंपारिक बौद्ध अाहेत.<ref>[http://www.nationaldastak.com/country-news/buddhism-has-brought-literacy-gender-equality-and-well-being-to-dalits/ Buddhism has brought literacy gender equality and well being to Dalits (in Hindi)]</ref><ref>[http://www.indiaspend.com/cover-story/conversion-to-buddhism-has-brought-literacy-gender-equality-and-well-being-to-dalits-18224 Buddhism has brought literacy gender equality and well being to Dalits]</ref> भारतातील एकूण बौद्धांपैकी ७७% बौद्ध अनुयायी हे महाराष्ट्र राज्यात आहेत तर भारतातील नवबौद्धांपैकी सुमारे ९०% नवबौद्ध [[महाराष्ट्र]]ात आहेत.<ref>[http://www.indiaspendhindi.com/cover-story/%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE]</ref> महाराष्ट्रातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी साधारणपणे ९९.९८% नवबौद्ध आहेत.


== ‘नवबौद्ध’ बद्दल गैरसमज ==
== ‘नवबौद्ध’ बद्दल गैरसमज ==

१९:०३, २० फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणेतून इ.स. १९५६ नंतर बौद्ध धम्म स्वीकारलेल्या व्यक्तींना नवबौद्ध (neo-Buddhist) म्हटले जाते. नवबौद्ध ही एक 'शासकीय संज्ञा' असून या धर्मांतरीत बौद्धांत 'नवबौद्ध' हा प्रघात बहुतांशरित्या आढळत नाहीत कारण ते स्वत:ला केवळ 'बौद्ध' समजतात. नवबौद्ध हे नवयान किंवा नवबौद्ध धर्माचे अनुयायी असतात. नवबौद्ध हे विशेषत: पूर्वाश्रमीचे दलित आहेत. ‘नवबौद्ध’चा शब्दश् अर्थ ‘नवीन बौद्ध’ असा घेतला जातो पण याचा सांप्रदायिक वा मूळ अर्थ ‘नवयानी बौद्ध’ असा होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना ज्या बौद्ध धम्माची दीक्षा दिली तो महायान किंवा थेरवाद बौद्ध धर्म नव्हता, तर तो 'नवबौद्ध धम्म' (नवयान) होता. २०११ च्या भारतीय जनगणेच्या अहवालानुसार, भारतातील बौद्ध लोकसंख्येत ८७% नवबौद्ध (नवयानी बौद्ध) आहेत आणि एकूण नवबौद्धांपैकी जवळजवळ ९०% हे महाराष्ट्रात आहेत.

लोकसंख्या

इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ८७% बौद्ध (७३ लाख) हे नवबौद्ध आहेत, जे इतर धर्मांतून धर्मांतरित बौद्ध आहेत. आणि उर्वरित १३% बौद्ध (११ लाख) हे हिमालयीन ईशान्य भारतातील असून ते पारंपारिक बौद्ध अाहेत.[१][२] भारतातील एकूण बौद्धांपैकी ७७% बौद्ध अनुयायी हे महाराष्ट्र राज्यात आहेत तर भारतातील नवबौद्धांपैकी सुमारे ९०% नवबौद्ध महाराष्ट्रात आहेत.[३] महाराष्ट्रातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी साधारणपणे ९९.९८% नवबौद्ध आहेत.

‘नवबौद्ध’ बद्दल गैरसमज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रभावित होऊन बौद्ध बनलेले काही नवयान बौद्ध अनुयायी स्वतःला नवबौद्ध म्हणवून घेत नाहीत कारण त्यांनी नवबौद्धचा 'नवयानी बौद्ध' असा सांप्रदायिक अर्थ न घेता केवळ ‘नवीन बौद्ध’ असा शाब्दिक अर्थ घेतला. वास्तवात मात्र ‘नवयानी बौद्ध’ व ‘नवयान बौद्ध धर्म’ याचे संक्षिप्त रूप अनुक्रमे ‘नव-बौद्ध’ व ‘नव बौद्ध धर्म’ असे आहे.

धम्मचक्रप्रवर्तन दिन

इ.स.१९५६ मध्ये १४ ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे ५ लाख अनुयायां सोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन भारतात बौद्ध धर्माची पुनःस्थापना केली. हा धर्म अंगीकारून तथाकथित अस्पृश्य हे बौद्ध धम्मात आले. भारतातील करोडो अस्पृश्यांना यामुळे अधिक संधी उपलब्ध झाल्या आणि हजारो वर्षांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरी मधून त्यांची मुक्तता झाली. या ऐतिहासिक सोहळ्याच्या दिवसाला "धम्म चक्र प्रवर्तन दिन" हे नाव मिळाले. या दिवशी आणि या दिवसा नंतर बौद्ध धम्म स्वीकारलेल्या व्यक्तींना नवबौद्ध किंवा नवयानी म्हटले जाते.

बावीस प्रतिज्ञा

धम्म दीक्षेबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या धर्मांतरित नवयानी बौद्ध अनुयायांना बौद्ध धम्माचे सार असलेल्या बावीस प्रतिज्ञा दिल्या. या प्रतिज्ञांत नवबौद्ध धर्माचे सार आहे.


१ ) मी, ब्रह्म, विष्णु आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

२ ) मी, रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

३) मी, गौरी-गणपती इत्यादी हिन्दू धर्मातील देव देवतांस मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही

४) देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही.

५ ) बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो.

६) मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही.

७) मी बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचरण करणार नाही.

८) मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करवून घेणार नाही.

९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.

१०) मी समता स्थापण्याचा प्रयत्न करीन.

११) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा आवलंब करीन.

१२) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमितांचे पालन करीन.

१३) मी सर्व प्राणिमात्रांवर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.

१४) मी चोरी करणार नाही.

१५) मी खोटे बोलणार नाही.

१६) मी व्यभिचार करणार नाही.

१७) मी नशायुक्त कोणत्याही पदार्थाचे सेवन करणार नाही.

१८) प्रज्ञा, शील, व करूणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन.

१९) मी, माझ्या जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिन्दू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो.

२०) बुद्धधम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.

२१) आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.

२२) इत:पर बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.


संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे