"डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २०: ओळ २०:


* बाबासाहेबांच्या कार्याची माहिती देणे, प्रदर्शनाचे आयोजन इत्यादी कार्यक्रम होणार.
* बाबासाहेबांच्या कार्याची माहिती देणे, प्रदर्शनाचे आयोजन इत्यादी कार्यक्रम होणार.

==हे सुद्धा पहा==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र]]


==संदर्भ==
==संदर्भ==

१५:३७, २० फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक हे दिल्लीतील २६ अलीपूर मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक आहे. यातील इमारतीची रचना उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकासारखी आहे. ही वास्तू परिनिर्वाण स्थळ म्हणून ओळखली जाते. २१ मार्च २०१६ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन केले आहे.[१] सध्या या स्मारकाच्या मुख्य इमारतीचे काम झाले असून आतली कामे आता सुरू आहेत. २०१८ च्या एप्रिलपर्यंत याचे काम पूर्ण होईल.[२]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधीत पंचतीर्थ म्हणजेच पाच स्थळांचा विकास करण्याचं केंद्र आणि स्थानिक राज्य सरकारनं ठरवलं आहे, त्यापैकी हे स्मारक एक आहे.

इतिहास

केंद्रीय कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीतील १, हार्डिंग ॲव्हेन्यू हे सरकारी निवासस्थान सोडले आणि २६, अलीपूर रोड इथल्या निवासस्थानी राहायला आले. १९५१ ते १९५६ या काळात बाबासाहेबांचे वास्तव्य या घरात होते. तिथेच त्याचं ६ डिसेंबर, १९५६ रोजी महापरिनिर्वाण (निधन) झाले. म्हणून या वास्तूला 'परिनिर्वाण स्थळ' म्हटले जाते.

या जागेवर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक उभारण्याचं काम वेगात सुरू आहे. या स्मारक स्थळी कार्यरत असलेले डॉ. आंबेडकर राष्ट्रीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक विजय बौद्ध यांनी मागील १२ वर्षापूर्वीपासून या स्मारकासाठी संघर्ष सुरू केला होता. या घराचं स्मारकात रुपांतर करावं या मागणीसाठी बराच काळ आंदोलन झालं.

त्यानंतर, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केंद्रात आल्यावर ही वास्तू मूळ मालकाकडून ताब्यात घेण्यात आली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी सोहळा समितीनं या घराचं राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला.

२०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नव्याकोऱ्या राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीसाठी भूमिपूजन केलं आणि हे काम दोन वर्षांत पूर्ण करून १४ एप्रिल, २०१८ ला त्याचं उद्घाटन करण्याचा मनोदयही पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवला होता.

स्मारकाची वैशिष्ट्ये

  • एकूण जागा ७,३७४ चौरस मीटर, ४,५६१.६२ चौरस मीटरचं बांधकाम.
  • स्मारकाच्या प्रवेशद्वारावर अशोक स्तंभ उभारण्यात आला आहे.
  • इमारतीची रचना उघडलेल्या भारतीय संविधान या पुस्तकासारखी आहे.
  • बाबासाहेबांच्या कार्याची माहिती देणे, प्रदर्शनाचे आयोजन इत्यादी कार्यक्रम होणार.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे