"गांधी जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५१: ओळ ५१:
#
#
# ''' माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो.'''
# ''' माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो.'''

[[वर्ग:महात्मा गांधी]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्या]]
[[वर्ग:भारतातील सार्वजनिक सुट्ट्या]]

१३:०७, १८ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

गांधी जयंती हा महात्मा गांधी जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो. गांधी जयंती हा भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून स्वीकारला आहे.

महात्मा गांधीचे कार्य:

  • असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला.
  • १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले.
  • १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली.
  • गांधीजी आजीवन साम्प्रदायीकातावादा (सम्प्रदायांवर राजकारण करणे) चे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले.
  • ढासळत जाणार्‍या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले.१९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले.
  • १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले.
  • या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.


महात्मा गांधी यांचे मराठी सुविचार

  1. जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.
  1. कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
  2. माझ्या परवानगीशिवाय. मला कुणीही दुखावू शकत नाही.
  3. इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा 'स्व' तुम्हाला सापडेल.
  4. देवाला कोणताच धर्म नसतो.
  5. आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही.
  6. रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.
  7. एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.
  8. तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.
  9. या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी आहे, हेही मला मान्य आहे. म्हणूनच फार पूर्वी मी एक निष्कर्ष काढलाय, की सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वांमध्ये काही ना काही चुका आहेत.
  10. तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही.
  11. प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते.
  12. धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.
  13. कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
  14. चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे.
  15. बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करू शकतो.
  16. अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे.
  17. 'डोळ्याच्या बदल्यात डोळा' या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.
  18. माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो.