"मांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४६: ओळ ४६:
मांग समाज हा पारंपरितरित्या हिंदू धर्मीय आहे, त्यामुळे ९६% मांग हे [[हिंदू]] असून, त्याचे कुलदैवत [[खंडोबा]] आहे. याशिवाय [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या [[नवबौद्ध चळवळ|बौद्ध धर्मांतराच्या चळवळीत]] हजारो मांगांनी [[बौद्ध धर्म]] स्वीकारला होता. ३.८% मांग हे बौद्ध धर्मीय आहेत. मांगांचा एक लहान भाग [[ख्रिश्चन धर्म]]ला मानणारा आहे. ०.२% मांग हे ख्रिश्चन आहेत. ख्रिश्चन धर्मीय मांग हे 'अनुसूचित जाती' प्रवर्गात समाविष्ठ होत नाहीत.
मांग समाज हा पारंपरितरित्या हिंदू धर्मीय आहे, त्यामुळे ९६% मांग हे [[हिंदू]] असून, त्याचे कुलदैवत [[खंडोबा]] आहे. याशिवाय [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या [[नवबौद्ध चळवळ|बौद्ध धर्मांतराच्या चळवळीत]] हजारो मांगांनी [[बौद्ध धर्म]] स्वीकारला होता. ३.८% मांग हे बौद्ध धर्मीय आहेत. मांगांचा एक लहान भाग [[ख्रिश्चन धर्म]]ला मानणारा आहे. ०.२% मांग हे ख्रिश्चन आहेत. ख्रिश्चन धर्मीय मांग हे 'अनुसूचित जाती' प्रवर्गात समाविष्ठ होत नाहीत.


== पोटजाती ==
मांग जातीत १२ पोटजाती आहेत:
मातंग, मादिंग, दानखनी, मांग, उचले, ककरकाढे, खानदेशी, गारुडी, घोडके, डफळे, दखने, पिंढारी, मदारी, मांगेला, वऱ्हाडे.
== उल्लेखनीय व्यक्ती ==
== उल्लेखनीय व्यक्ती ==
* [[लहुजी वस्ताद साळवे]]
* [[लहुजी वस्ताद साळवे]]

१५:०२, ९ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

मांग
वादक मांग (रूसेल १९१६)
एकूण लोकसंख्या

सुमारे २७,००,००० (२०१८)

लोकसंख्येचे प्रदेश
प्रमुख : महाराष्ट्र

इतर : गुजरात  • दमण आणि दीव  • राजस्थान

भाषा
मुख्यः- मराठी, हिंदी
धर्म
हिंदू धर्म (९६%), बौद्ध धर्म (३.८%) व ख्रिश्चन धर्म (०.२%)[१]
संबंधित वांशिक लोकसमूह
मराठी लोक


मांग किंवा मातंग हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे, जो प्रमुख्याने महाराष्ट्र राज्यात राहतो. हिंदू वर्णव्यवस्थेत या जातीला अस्पृश्य (दलित) मानले गेले होते. महाराष्ट्रात मांगांची लोकसंख्या सुमारे २५ लाख आहे.

इतिहास

शिवाजी महाराजांचा काळ ते स्वातंत्र्यपूर्व काळ

मातंग समाज हा मुळचा रांगडा, आक्रमक तरीही प्रामाणिक तसेच गावचा संरक्षणकर्ता समाज होता. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडांचे घेरे, चौक्या, पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदारीची जबाबदारीही मातंग समाजाकडे होती. शिवकाळात मातंगांच्या शौर्याची काही उदाहरणे सापडतात. यात शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे 'सर्जेराव मांग' व बाजी पासलकर या महाराजांच्या शिलेदाराची उमदी घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी जातीने 'येल्या मांग' होते. शिवकालीन बखरीत व पोवाड्यात यांचा उल्लेख आढळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी मातंग, रामोशी अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरवलं. त्यांना गावांतून तडीपार केले, त्यांच्यावर खोटे आरोप लावले, तेव्हा मातंग समाजाने इंग्रजांच्या विरोधात गांवागांवातून संघर्ष केला. मातंग समाजातील लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विनायक दामोदर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले यांना दिले. वासुदेव बळवंत फडके यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले.

बाबासाहेब आंबेडकर काळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या अस्पृश्यता विरोधी आंदोलनात बहुसंख्य महारांसोबतच मांगांचाही सहभाग होता. डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतर आंदोलनातही १४ ऑक्टोबर १९५६ रोजी सुमारे १०,००० मांगांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.

हलगीवादन

गावातील शुभप्रसंगी, मिरवणुकांमध्ये मांगांनी हलगी वाजवण्याची प्रथा आहे. मातंग म्हणजे गावाचे वाजंत्री होय. 'कुणब्याघरी दाणं अन, मांगाघरी गाणं' अशी एक म्हण आहे. आज ह्या हलगीलाही प्रतिष्ठा मिळाली आहे.

व्यवसाय

मांग समाज बारा बलुतेदारांपैकी एक समजला जातो. केतकीपासून (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मांगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज झाडू बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची तोरणे बनवणे हे देखील त्यांचे पारंपरिक व्यवसाय होते. पण काळाच्या ओघात पारंपरिक व्यवसाय बंद पडून मांगांचे रोजगार बंद झाले.

मातंग समाज त्यांचा परंपरागत दोरखंड तयार करणे, झाडू तयार करणे इत्यादी. व्यवसायांपासून अलिप्त होऊन शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत होऊ लागला आहे. परंपरागत शेतजमीन असलेली मातंग लोक आपली शेती सांभाळत आहेत. याखेरीज सरकारी, खाजगी नोकऱ्यांमध्ये तसेच उद्योजकतेकडे मातंग समाज बांधव वाटचाल करू लागला आहे. हा समाज इतर क्षेत्रांतही पुढे जात आहे. 

लोकसंख्या

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये मांग समाज हा लोकसंख्येने महार नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात २०,०३,९९६ लोकसंख्या मांगांची होती. मांग लोकसंख्या महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र आढळते.

२००१ च्या जनगणनेनुसार मांग लोकसंख्या:

धर्म

मांग समाज हा पारंपरितरित्या हिंदू धर्मीय आहे, त्यामुळे ९६% मांग हे हिंदू असून, त्याचे कुलदैवत खंडोबा आहे. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धर्मांतराच्या चळवळीत हजारो मांगांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. ३.८% मांग हे बौद्ध धर्मीय आहेत. मांगांचा एक लहान भाग ख्रिश्चन धर्मला मानणारा आहे. ०.२% मांग हे ख्रिश्चन आहेत. ख्रिश्चन धर्मीय मांग हे 'अनुसूचित जाती' प्रवर्गात समाविष्ठ होत नाहीत.

पोटजाती

मांग जातीत १२ पोटजाती आहेत: मातंग, मादिंग, दानखनी, मांग, उचले, ककरकाढे, खानदेशी, गारुडी, घोडके, डफळे, दखने, पिंढारी, मदारी, मांगेला, वऱ्हाडे.

उल्लेखनीय व्यक्ती

संदर्भ