"नर्मदा निधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''नर्मदा निधी''' ही कोंबडीची एक रोगमुक्त प्रजाती आहे. मध्य प्रदेश...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

११:३७, ३१ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

नर्मदा निधी ही कोंबडीची एक रोगमुक्त प्रजाती आहे. मध्य प्रदेशातील पशुवैद्यकीय विद्यापीठाने कोंबडीची रोगमुक्त प्रजाती तयार केली आहे, त्यांना प्रतिजैविके खाऊ घातली जातात, त्यामुळे या कोंबडय़ा सेवन केल्याने मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो पण या कोंबडय़ांना रोग होत नसल्याने कुठल्या कृत्रिम औषधांचा वापर त्यांच्यात करावा लागत नाही.

प्रथिनांनी परिपूर्ण असलेल्या कोंबडय़ामध्ये ‘कडकनाथ’ व ‘जबलपूर कलर’ या कोंबडय़ांच्या प्रजातीच्या जनुकांचा समावेश करून या कोंबडय़ाची निर्मिती करण्यात आली आहे. कडकनाथ ही आदिवासी बहुल झाबुआ व अलिराजूर या मध्य प्रदेशातील भागात असलेली कोंबडय़ांची प्रजाती आहे. तर जबलपूर कलर ही प्रजाती विद्यापीठानेच या कोंबडय़ांपासून तयार केलेली आहे. नर्मदा निधी प्रजातीच्या कोंबडय़ा स्वस्त व अधिक पौष्टिक आहेत. ग्रामीण भागातील गरीब लोकांकरिता कोंबडय़ांची ही प्रजाती विकसित केली आहे. ती ग्रामीण भागात घरातील खरकटय़ा अन्नावर वाढू शकते व या कोंबडय़ांना रोग होत नाहीत, त्यांना परदेशी कोंबडय़ांप्रमाणे लशी द्याव्या लागत नाहीत. डाळींचे भाव वाढल्यानंतर गरिबांना अन्नातून प्रथिने मिळावीत, यासाठी ही कोंबडीची प्रजाती उपयोगी आहे. साध्या देशी कोंबडय़ा ४९ अंडी देतात तर नर्मदा निधी ही कोंबडी १८१ अंडी देते. यातील एक अंडे ४ रुपयांना पडते, एरवी एक अंडे सहा रुपयांना मिळते, या कोंबडीचे मांस किलोला ८०-९० रुपये दराने मिळते. सध्या चिकनचा भाव १२० रुपये किलो आहे. या कोंबडीची चव देशी कोंबडीसारखी आहे.