"शिल्पा शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १४: ओळ १४:


==बिग बॉस ११ ची विजेता==
==बिग बॉस ११ ची विजेता==
१२ जानेवारी २०१८ रोजी, शिल्पा शिंदे हि ४७ टक्के मते घेऊन बिग बॉस ११ च्या ग्रँड फिनालेची विजेती ठरली आहे. घरात चार फायनल कंटेस्टेंट उरले होते. हिना खान, विकास गुप्ता, शिल्पा शिंदे आणि पुनीश शर्मा या चौघे फायनल प्रतिस्पर्धक होते. अटीतटीच्या झालेल्या या रिअॅलिटी शोमध्ये शिल्पाला [[हीना खान]]ने तगडी टक्कर दिली होती.
१२ जानेवारी २०१८ रोजी, शिल्पा शिंदे हि ४७ टक्के मते घेऊन बिग बॉस ११ च्या ग्रँड फिनालेची विजेती ठरली आहे. घरात चार फायनल कंटेस्टेंट उरले होते. हिना खान, विकास गुप्ता, शिल्पा शिंदे आणि पुनीश शर्मा या चौघे फायनल प्रतिस्पर्धक होते. अटीतटीच्या झालेल्या या रिअॅलिटी शोमध्ये शिल्पाला [[हीना खान]]ने तगडी टक्कर दिली होती. बिग बॉसमधील शिल्पाच्या खेळीमुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत जास्त वाढ झाली आहे.


==संदर्भ==
==संदर्भ==

१०:१९, १६ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

शिल्पा शिंदे (जन्म: २८ ऑगस्ट १९७७) ही हिंदी अभिनय क्षेत्रात काम करणारी मराठी अभिनेत्री आहे. सुरूवातील तिने विविध मालिकांमधून अनेक भूमिका साकारल्या. 'भाभीजी घर पर है' या मालिकेतील तीची 'अंगुरी भाभी'च्या भूमिकेने ती सर्वाधिक ओळखली जाते. शिल्पा बिग बॉस ११ ची विजेता ठरली आहे.[१]

वयक्तिक जीवन

शिल्पा शिंदेचा जन्म २८ ऑगस्ट १९७७ रोजी मुंबईत एका मध्यमवर्गीय दलित कुटुंबात झाला. शिल्पाचे वडील उच्चन्यायालयात न्यायाधीश होते. शिल्पाला लहानपणीपासून डान्सची खूप आवड होती.

चार बहिण-भावांमध्ये शिल्पा तिसरी मुलगी आहे. शिल्पाला सोडून तिच्या तिन्ही भावा-बहिणींचं लग्न झालं आहे. शिल्पाची मोठी बहिण शुभा शिंदे मुंबईमध्ये राहत असून ती गृहिणी आहे. शिल्पा तिची मोठी बहीण अर्चनाच्या जास्त जवळ आहे. शिल्पाची दुसरी बहिण तृप्तीचंही लग्न झालं असून ती अमेरिकेमध्ये स्थायिक आहे. शिल्पाचा लहान भाऊ आशुतोष बँकेत नोकरी करत असून शिल्पाची वहिनीही नोकरी करते.

शिल्पा शिंदे रोमित राज सोबत बरेच दिवस रिलेशनशिप मध्ये होती पण ते सध्या वेगवेगळे राहतात.

शिक्षण व करिअर

शिल्पाचे शिक्षण मुंबईत झालेले असून तीने मानसशास्त्रात पदवी घेतली आहे. शिल्पा शिंदेने तिचे करिअर १९९९ मध्ये सुरू केले. सुरूवातीला तिने विविध मालिकांमधून भूमिका साकारल्या. भाभी, मायका, संजीवनी, चिडीया घर, हातीम, आम्रपाली आणि मिस इंडिया या मालिकांमध्येही काम केले आहे.

शिल्पाने दोन तेलगू सिनेमात सुद्धा काम केले आहे. यामध्ये दसरी नारायण राव यांचा छिना आणि सुरेश वर्मा यांच्या शिवानी या सिनेमांचा समावेश आहे. शिल्पा शिंदेने १९९९ मध्ये नकारात्मक भूमिकेने अभिनयाची सुरुवात केली होती. २०१७ मध्ये शिल्पाने पटेलचा पंजाबी सिनेमा शादी मध्ये एक आयटम साँग सुद्धा केले आहे.

बिग बॉस ११ ची विजेता

१२ जानेवारी २०१८ रोजी, शिल्पा शिंदे हि ४७ टक्के मते घेऊन बिग बॉस ११ च्या ग्रँड फिनालेची विजेती ठरली आहे. घरात चार फायनल कंटेस्टेंट उरले होते. हिना खान, विकास गुप्ता, शिल्पा शिंदे आणि पुनीश शर्मा या चौघे फायनल प्रतिस्पर्धक होते. अटीतटीच्या झालेल्या या रिअॅलिटी शोमध्ये शिल्पाला हीना खानने तगडी टक्कर दिली होती. बिग बॉसमधील शिल्पाच्या खेळीमुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत जास्त वाढ झाली आहे.

संदर्भ