"इस्लाम धर्माचे संप्रदाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५: ओळ ५:
==सुन्नी==
==सुन्नी==
पैगंबर मोहम्मद (इ.स. ५७० - ६३२) यांनी स्वत: अनुसरलेल्या गोष्टी तसंच विचारांचं पालन करणारा पंथ अशी सुन्नी अर्थात सुन्नत गटाची ओळख आहे.
पैगंबर मोहम्मद (इ.स. ५७० - ६३२) यांनी स्वत: अनुसरलेल्या गोष्टी तसंच विचारांचं पालन करणारा पंथ अशी सुन्नी अर्थात सुन्नत गटाची ओळख आहे.
एका निष्कर्षानुसार जगभरातील मुसलमानांपैकी ८० ते ८५ टक्के सुन्नी पंथीय आहेत. तर उर्वरित १५ ते २० टक्के शिया पंथाचे आहेत.
==हे सुद्धा पहा==

१२:०६, ११ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

इस्लाम धर्माचे सर्व अनुयायी स्वत:ला मुसलमान म्हणवतात. मात्र इस्लामचा कायदा (फिकह) आणि इतिहास याविषयीच्या आकलनानुसार मुसलमान विविध संप्रदाय किंवा पंथांमध्ये विभागले गेले आहेत. प्रामुख्यानं मुसलमानांमध्ये शिया आणि सुन्नी असे दोन प्रमुख पंथ आहेत. मात्र या दोन्ही पंथांमध्येही अनेक उपपंथ आहेत. शिया आणि सुन्नी दोन स्वतंत्र गट असले तरी अल्ला एकच आहे, यावर त्यांचं एकमत आहे. मोहम्मद अल्लाचे दूत वा प्रेषित असल्याचं हे दोन्ही पंथ मानतात.

कुराण हा ग्रंथ अल्लाची देणगी आहे यावर दोन्ही पंथांची श्रद्धा आहे. मात्र धर्मपालनाच्या विविध पद्धती तसंच पैगंबर मोहम्मद यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण यासंदर्भात दोन्ही पंथांमध्ये तीव्र मतभेद आहेत. दोन्ही पंथांचे कायदेकानूनही वेगळे आहेत.

सुन्नी

पैगंबर मोहम्मद (इ.स. ५७० - ६३२) यांनी स्वत: अनुसरलेल्या गोष्टी तसंच विचारांचं पालन करणारा पंथ अशी सुन्नी अर्थात सुन्नत गटाची ओळख आहे. एका निष्कर्षानुसार जगभरातील मुसलमानांपैकी ८० ते ८५ टक्के सुन्नी पंथीय आहेत. तर उर्वरित १५ ते २० टक्के शिया पंथाचे आहेत.

हे सुद्धा पहा