"वर्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना '''वर्ण''' असे म्हणतात. ते केवळ ध्वनी असतात, म्हणून त्यांना '''ध्वनिरूपे''' म्हणतात.
तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना '''वर्ण''' असे म्हणतात. ते केवळ ध्वनी असतात, म्हणून त्यांना '''ध्वनिरूपे''' म्हणतात. वर्ण हा भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: [[अक्षर]], [[शब्द]], [[वाक्य]] व [[व्याकरण]]) एक आहे.


[[अक्षर]] लिहून ठेवल्यामुळे हे [[ध्वनी]] नाश न पावता कायमचे राहतात म्हणून त्यांना [[अक्षर|अ-क्षर (नाश न पावणारे)]] असेही म्हणतात.
[[अक्षर]] लिहून ठेवल्यामुळे हे [[ध्वनी]] नाश न पावता कायमचे राहतात म्हणून त्यांना [[अक्षर|अ-क्षर (नाश न पावणारे)]] असेही म्हणतात.

१३:११, ३१ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ते केवळ ध्वनी असतात, म्हणून त्यांना ध्वनिरूपे म्हणतात. वर्ण हा भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, शब्द, वाक्यव्याकरण) एक आहे.

अक्षर लिहून ठेवल्यामुळे हे ध्वनी नाश न पावता कायमचे राहतात म्हणून त्यांना अ-क्षर (नाश न पावणारे) असेही म्हणतात.

वर्णमाला

मराठी वर्णमाला खालील प्रमाणे आहे:

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ, ॠ व लृ

क्, ख्, ग्, घ्, ङ् च्, छ्, ज्, झ्, ञ् ट्, ठ्, ड्, ढ्, ण् त्, थ्, द्, ध्, न् प्, फ्, ब्, भ्, म्

य्, र्, ल्, व्

स्, श्, ष्, ह्

ळ्

वर्णमाला उच्चार

आपण एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना नेमके काय होते? आपल्या फुफ्फुसांतून हवा वर येते. ती हवा मग glottis, larynx वगैरे अवयवांतून जाते आणि शेवटी मुखात येते. येथे नाक, पडजीभ, टाळू, alveolar ridge, दात, ओठ, जीभ अशा वेगवेगळ्या अवयवांची उघडझाप होते व एक उच्चार तयार होतो. पडजीभ आणि जीभेची मागची बाजू एकत्र आली की वेगळा वर्ण उच्चारला जातो आणि जीभेचे टोक व दात यांचा एकमेकांना स्पर्श झाल्यावर एक वेगळाच वर्ण उच्चारला जातो.

उच्चारात वापरले जाणारे अवयव

  • पडजीभ (velum)
  • टाळू (palate)
  • नाकातील पोकळी (nasal cavity)
  • ओठ
  • दात
  • जिभेचे टोक
  • जिभेचा मधला भाग
  • जिभेची मागची बाजू,

इत्यादि अवयव तर वापरले जातातच.

  • पण पडजीभेच्या मागचा भाग (uvula) हा भाग उर्दू भाषेतले काही वर्ण उच्चारण्यासाठी वापरला जातो. जसे- क़, ख़, ग़, ड़, ढ़, फ़ वगैरे. मराठीतही च, छ, ज, झ, ञ, फ आणि ड ही अक्षरे दोन-दोन प्रकारे उच्चारली जातात, पण वेगळी दाखवली जात नाहीत. मराठीतल्या डावा या श्ब्दातला ड चा उच्चार वाड़ा या शब्दातल्या ड़ पेक्षा वेगळा आहे.

या सर्व अवयवांना उच्चारक (articulators) असे म्हणतात.

व्यंजने व त्यांचे विभाजन

वर उल्लेखिलेले उच्चारक वापरून वेगवेगळे उच्चार केले जाता. एखादा उच्चार करण्यासाठी कोणते दोन उच्चारक वापरले आहेत, हे पाहून त्यानुसार ५ प्रकारांत व्यंजनांचे विभाजन केले आहे. हे प्रकार पुढीलप्रमाणे-

  • कण्ठ्य - पडजीभ व जिभेची मागची बाजू यांच्या संयोगातून निर्माण होणारे जिह्वामूलीय वर्ण- जसे अ, आ, क्, ख्, ग्, घ्, ङ्, ह्‌ आणि विसर्ग
  • तालव्य - जिभेचा स्पर्श वरील हिरडीवर होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण, जसे इ, च्, छ्, ज्, झ्, ञ्, य्‌, श्
  • मूर्धन्य - जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण, जसे - ऋ, ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, र्‌, ष्, ळ्‌
  • दन्त्य - जिभेचा दातांना स्पर्श झाल्यावर निर्माण होणारे वर्ण, जसे - ऌ, त्, थ्, द्, ध्, न्, ल्‌, स्
  • ओष्ठ्य - दोन्ही ओठांमधून निर्माण होणारे वर्ण, जसे - उ, ओ, औ, प्, फ्, ब्, भ्, म्, उपध्मानीय (कःपदार्थमधले विसर्गसदृश अक्षर)

कण्ठ्य, तालव्य आदि संज्ञा प्राचीन भारतीय उच्चारशास्त्रज्ञांच्या शास्त्रीय परिभाषेतील संज्ञा आहेत.

मराठी लिपीत क्ष (क्‍ष) आणि ज्ञ ही दोन जोडाक्षरे त्यांच्या नित्यवापरामुळे मूलध्वनी समजली जातात. हिंदीत क्ष, ज्ञ, श्र. आणि त्र ही जोडाक्षरे मूलध्वनी समजली जातात. मराठी भाषेतील ज्ञ हा दंत्य आहे, बंगालीतला ज्ञ (ज्‍ञ) तालव्य आहे, तर हिंदीतला ज्ञ (ग्य) कंठ्य आहे. मराठीतले च़, छ़, ज़, झ़ हे दंततालव्य आहेत, आणि फ़ दंतोष्ठ्य आहे..

न वापरले जाणारे भाग

uvula सारखाच आणखी एक उच्चारकही आपण वापरत नाही तो म्हणजे alveolar ridge. हा उच्चारक तोंडाच्या आतील बाजूस दातांच्या वर आहे.- त्याच्या व जीभेच्या टोकाच्या संयोगातून ट्, ड्, हे इंग्रजी भाषेतले उच्चार निर्माण होतात. हे वर्ण आपल्या ट्, ड्, हून वेगळे आहेत, कारण दोन्ही भाषांत वेगवेगळ्या अवयवांच्या संयोगातून ते निर्माण झाले आहेत. दोन्हीं वर्णगटांचे सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे उच्चार करून पाहिल्यास, त्यांतला फरक लक्षात येईल.

'श्' व 'ष्' यांत फरक काय

असा प्रश्न पडलेल्यांना आता या भागात त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. सर्व वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या भागांचा संयोग करून वेगवेगळे वर्ण उच्चारून पहावेत, म्हणजे त्यांतील फरक आणखी स्पष्टपणे लक्षात येईल.