"कोरेगावची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २६: ओळ २६:
}}
}}


'''भीमा कोरेगांवची लढाई''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यामधील]] [[कोरेगाव भीमा|कोरेगाव]] या गावात [[भीमा नदी|भीमा नदीच्या]] काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी ही लढाई [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]च्या [[महार]] सैनिक व पेशव्यांच्या [[मराठा]] सैनिकांत झाली होती.<ref>https://www.loksatta.com/vishesh-news/marathi-articles-on-history-of-battle-of-koregaon-1512473/</ref> ब्रिटिशांच्या ८३४ सैनिकांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रांसिस एफ. स्टॉंटन करीत होता तर २८,००० मराठा सैनिकांचे नेतृत्व [[पेशवे]] व सेनापती [[बाजीराव दुसरा]] हा करीत होता. इंग्रजांची ८३४ संख्येची तुकडीमध्ये सुमारे ५०० महार सैनिकांचा समावेश होता आणि पेशव्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई सैनिकांचा समावेश होता.<ref>https://m.youtube.com/watch?v=aHrm5gaDpZo</ref> पेशवाई काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशव्यांशी लढले आणि विजयी झाले.<ref>http://www.dalitdastak.com/news/are-you-know-that-war-untouchable-defeat-peshawa-2886.html</ref><ref>[https://www.forwardpress.in/2015/01/maharon-aur-mangon-ke-hathon-peshwai-ka-ant/ महार मांगांच्या हातांनी पेशवाईचा शेवट (हिंदी)]</ref><ref>[https://www.forwardpress.in/2016/02/mahar-shaury-ko-maisur-ka-salam/ महारांच्या शौर्यास मैसूरचा सलाम]</ref>
'''भीमा कोरेगांवची लढाई''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यामधील]] [[कोरेगाव भीमा|कोरेगाव]] या गावात [[भीमा नदी|भीमा नदीच्या]] काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]च्या व पेशव्यांच्या [[मराठा साम्राज्य]]ाच्या सैनिकांत झाली होती.<ref>https://www.loksatta.com/vishesh-news/marathi-articles-on-history-of-battle-of-koregaon-1512473/</ref> ब्रिटिशांच्या बाजूने ८३४ सैनिक होते ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टाँटन करीत होता तर रेशव्यांच्या मराठा साम्राज्याच्या बाजूने २८,००० सैनिक होते ज्याचे नेतृत्व सेनापती [[पेशवा] [[बाजीराव दुसरा]] हा करीत होता. इंग्रजांच्या सैनिक तुकडीमध्ये सुमारे ५०० महार सैनिकांचा समावेश होता आणि पेशव्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई सैनिकांचा समावेश होता.<ref>https://m.youtube.com/watch?v=aHrm5gaDpZo</ref> पेशवाई काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशव्यांशी लढले आणि विजयी झाले.<ref>http://www.dalitdastak.com/news/are-you-know-that-war-untouchable-defeat-peshawa-2886.html</ref><ref>[https://www.forwardpress.in/2015/01/maharon-aur-mangon-ke-hathon-peshwai-ka-ant/ महार मांगांच्या हातांनी पेशवाईचा शेवट (हिंदी)]</ref><ref>[https://www.forwardpress.in/2016/02/mahar-shaury-ko-maisur-ka-salam/ महारांच्या शौर्यास मैसूरचा सलाम]</ref>
या युद्धात पराभूत झालेल्या पेशव्यांच्या [[मराठा साम्राज्य]]ाचा अस्त झाला.<ref>https://satyagrah.scroll.in/article/25204/why-lakhs-of-indians-celebrate-the-british-victory-over-the-maratha-peshwas</ref>
या युद्धात पराभूत झालेल्या पेशव्यांच्या [[मराठा साम्राज्य]]ाचा अस्त झाला.<ref>https://satyagrah.scroll.in/article/25204/why-lakhs-of-indians-celebrate-the-british-victory-over-the-maratha-peshwas</ref>

१२:२०, ३१ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.

भीमा कोरेगांवची लढाई
तिसरे इंग्रज-मराठा युद्ध ह्या युद्धाचा भाग
कोरेगावांमध्ये ब्रिटिशांनी उभारलेला विजय स्तंभ
कोरेगावांमध्ये ब्रिटिशांनी उभारलेला विजय स्तंभ
दिनांक १ जानेवारी, इ.स. १८१८
स्थान भीमा कोरेगांव, पुणे जिल्हा महाराष्ट्र
परिणती ब्रिटिश विजय व पेशवे मराठांच्या पराजय
प्रादेशिक बदल इंग्रज तुकडीचा कोरेगावच्या लढाईत यशस्वी बचाव बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री मधील प्रामुख्याने महार सैन्याच्या मदतीने
युद्धमान पक्ष
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी पेशव्यांचे मराठा साम्राज्य
सेनापती
कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टाँटन पेशवा बाजीराव दुसरा
बापू गोखले
आप्पा देसाई
त्रिंबक डेंगळे
सैन्यबळ
८३४ (५०० पायदळ, ३०० घोडदळ आणि २४ तोफा उडवणारे गोलंदाज) २८,००० (२०,००० घोडदळ ८,००० पायदळ
(जवळजवळ २८,००० सैनिकांनी लढाईत भाग घेतला नेतृत्व २ तोफखाना प्रमुख)
बळी आणि नुकसान
२७५ ठार, जखमी किंवा बेपत्ता ५००–६०० ठार, जखमी किंवा बेपत्ता (ब्रिटिशांनुसार)

भीमा कोरेगांवची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व पेशव्यांच्या मराठा साम्राज्याच्या सैनिकांत झाली होती.[२] ब्रिटिशांच्या बाजूने ८३४ सैनिक होते ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टाँटन करीत होता तर रेशव्यांच्या मराठा साम्राज्याच्या बाजूने २८,००० सैनिक होते ज्याचे नेतृत्व सेनापती [[पेशवा] बाजीराव दुसरा हा करीत होता. इंग्रजांच्या सैनिक तुकडीमध्ये सुमारे ५०० महार सैनिकांचा समावेश होता आणि पेशव्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई सैनिकांचा समावेश होता.[३] पेशवाई काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशव्यांशी लढले आणि विजयी झाले.[४][५][६] या युद्धात पराभूत झालेल्या पेशव्यांच्या मराठा साम्राज्याचा अस्त झाला.[७]

भीमा-कोरेगावच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहिद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे — ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’.

या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी देशभरातून बौद्ध (पूर्वीचे महार) व दलित लोक लाखोंच्या संख्येने येत असतात.

पार्श्वभूमी

इ.स. १८०० च्या दशकांत मराठा साम्राज्य अनेक तुकड्यांत विभागलेले होते. त्यात पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्या चे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे तुकड्यामुळे कमकुवत साम्राज्य होते.[८] ब्रिटिश साम्राज्याने ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर यांच्या प्रमुखांशी शांतता करार वा तह करून त्या त्या संस्थानांचा भाग आपल्या राज्याला जोडला होता. १३ जून इ.स. १८१७ रोजी पेशवे आणि गायकवाड घराण्यात महसुलावरून वाद झाला त्यात बाजीराव पेशवे यांनी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतली. व बडोदा संस्थानचा मोठा भाग पेशवाईत समाविष्ट केला. परंतु यासाठी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतल्यामुळे अप्रत्यक्षपणे तो भाग ब्रिटिशांनी आपल्या राज्यास जोडला. यामुळे मराठा साम्राज्य ब्रिटीश अधीनस्त झाले आणि पेशवे केवळ नामधारी उरले.[९] [१०] अल्पावधीतच पेशव्यांनी ब्रिटिशांना नमवण्याचा प्रयत्न खडकीची लढाई त केला परंतु ब्रिटिशांनी तेथेही पेशव्याचा पराभव केला. ही लढाई ५ नोव्हेंबर इ.स. १८१७ रोजी झाली.[११] त्यानंतर पेशवे यांनी तेथून सातारा येथे पळ काढला आणि ब्रिटिशांनी पूर्णपणे पुण्यावर ताबा मिळवला. पुणे हे चार्लस बार्टन बर व कर्नल जनरल स्मिथ याच्या नेतृत्वाखाली होते. आणि ते पेशव्यांचा पाठलाग करत होते. दरम्यान कर्नल स्मिथ याला भिती वाटत होती की पेशवा तेथूनही निसटून कोकणात जातील व तेथे राज्य करतील, म्हणून त्याने कर्नल बर याला कोकणात आणखी कुमक पाठवण्यास सांगितली. आणि एक जास्तीची कुमक पुण्याजवळील शिरूर येथे ठेवण्यास सांगितली.[१२] दरम्यान पेशवे कर्नल स्मिथचा पाठलाग चुकवून निसटून जाण्यात यशस्वी झाले परंतु दक्षिणेकडून कर्नल थेओफिलस प्रिझलर सैन्यासह तयार होताच.,ते पाहून पेशव्यांने मार्ग बदलला आणि पूर्वेकडे चालत नाशिकच्या वायव्य भागातून पुढे सरकले आणि कर्नल स्मिथ त्यांच्यावर हल्ला करेल या भीतीने ते पुन्हा पुण्याकडे वळले..[१३]डिसेंबर इ.स. १८१७ च्या अखेरीस कर्नल बरला बातमी समजली की पेशवे पुण्यावर चालून येत आहेत तेव्हा त्याने शिरूर येथील सैन्याला मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले ते सैन्य पुढे सरसावले आणि त्याची लढाई झाली. हीच ती भीमा- कोरेगावची लढाई होय.[१४] [१५]

पेशव्यांचे मराठा सैन्य

पेशव्यांच्या सैन्यात २०,००० घोडदळ, ८००० पायदळ सतत तैनात असे.[१६] कंपनी सरकाराच्या सैन्यांनी हल्ला करू नये यासाठी प्रत्येकी ६०० सैनिकांच्या तीन तुकड्या तैनात असत.[१७] सैनिकांत अरब, गोसावी व मराठा जातीचे सैनिक असत. [१८] हे सैन्य पहिल्या फळीत हल्ला करण्यासाठी अरब सैन्याचा वापर करीत असे. तसेच त्यासाठी भाडोत्री सैनिक व त्यांचे वारस यांचाही सैन्यात वापर केला जात असे.[१९], [२०] सैन्यात घोडदळ आणि तोफखाना असे दोन विभाग ठेवलेले असत.

लढाईचे नेतृत्व बापू गोखले, अप्पा देसाई आणि त्रिंबक डेंगळे हे करत असत. [२१]पैकी त्रिंबकजी डेंगळे हे कोरेगाव लढाईत प्रत्यक्ष सहभागी होते.[२२] तर अन्य जवळच्या फूलसेहर (आत्ताचे फुलगाव) येथे होते.[२३]

कंपनी सैन्य

कंपनीच्या ८३४ सैन्याची तुकडी शिरूर येथून निघाली.[२४]

  • दुसऱ्या बटालियन (बॉम्बे नेटिव्ह आर्मी तुकडी क्र १०२) मधील महार जातीचे सुमारे ५०० सैनिक होते. या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस स्टाँटन यांनी केले. अन्य अधिकाऱ्यांमध्ये,
    • लेप्टनंट आणि अड्जुटंट पिटसन
    • लेफ्टनंट जॉन्स
    • असिस्टंट सार्जंट विंजेट हे होते.
  • लेफ्टनंट स्वान्सटन नेतृत्व करीत असलेले सुमारे ३०० सैनिकांचे घोडदळ
  • २४ युरोपियन आणि ४ तोफा चालवणारे स्थानिक मद्रासी गोलंदाज व सहा पावडर तोफा. यांचे नेतृत्व लेफ्टनंट चिसलोम(Chisholm) करत होते. याचबरोबर साहाय्यक सार्जंट वायली (वायल्डे) यांचा तोफाखान्यात समावेश होता.

लढाई

भिमा कोरेगाव लढाई दरम्यान ब्रिटिशांची व्यूहरचना

इतिहास

भीमा कोरेगाव येथे इंग्रजांनी बांधलेला विजय स्तंभ

पेशवा दुसरा बाजीराव नासिककडे न जाता ओझरचा घाट उतरून जुन्नर खेडावरून ता. ३० डिसेंबर रोजी चाकण येथे येऊन पोहचला, अशी बातमी स्मिथ यास कळली. पूर्वी कोंकणांतून मुंबईकडून इंग्रज फौज येत होती तिला गाठावे किंवा पुण्यावर येऊन ते शहर एकदम हस्तगत करावे असा बाजीरावाचा बेत असल्याचे स्मिथ यास दिसून आले, दोन्ही गोष्टी इंग्रजांस बिकटच होत्या. पुण्यास इंग्रजांचा बंदोबस्त अगदींच तात्पुरता होता. त्याने आपल्या मदतीस शिरूरहून जास्त फौज बोलावली होती, त्यावरून कॅ. स्टाँटन थोडे इंग्रज सैन्य बरोबर घेऊन ता. ३१ डिसेंबर इ,स. १८१७ रोजी रात्री ८ वाजता शिरूरहून निघा, तो दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता कोरेगांवजवळ येऊन उतरला. तेथील टेकडीवरून त्याला पेशव्याची प्रचंड फौज भीमा नदीच्या काठीं दिसली. स्टाँटनची बातमी बापू गोखल्यास होतीच. घोडनदीहून वरील इंग्रज फौज पुण्यास येत होती तिची बाजीरावाशीं अकस्मात गाठ पडली. बापू गोखल्यास श्रीमंतानी आज्ञा केली, की आज लढाई करून आम्हास पुढे जाण्यास मार्ग करून द्यावा. गावास लहानशी तटबंदी होती तेथे इंग्रज आश्रयार्थ गेले. त्यावर दुसऱ्या बाजूने मराठ्यांनी तोफांचा मारा सुरू केला. जागा अडचणीची असल्यामुळे तोफा बंद करून मराठ्यांकडील अरबांनी व पायदळांनी इंग्रजांवर चालून घेतले. तेव्हा संगिनीचे व तरवारीचेच युद्ध झाले. दोन्ही बाजूंचे भरपूर नुकसान झाले. रात्री ९ वाजेपर्यंत लढाई चालून पेशव्यांचे सैन्य आपल्या छावणीकडे परत आलें. सकाळी इंग्रजांच्या सैनिकांनी पाहिले तर पेशव्यांचे सैन्य निघून गेल्याचे दिसले. इंग्रजांचे २७५ मारले गेले तर १७५ जखमी झाले, त्यापैकी बहुतेक होतकरूच होते. मराठ्यांचे सुमारे ५००-६०० लोक पडले. बाजीराव तर अगोदरच जेजुरीच्या वाटेने साताऱ्याकडे निघाला होता. पाठीमागून जनरल स्मिथ येत असतां त्यास ओझरच्या घाटात त्रिंबकजी डेंगळ्याच्या रामोशांनी इतके सतावून सोडले की ता. २ जानेवारी इ.स. १८१८ रोजी जेमतेम तो चाकणला येऊन पोचला. त्याच दिवशी कॅ. स्टाँटन हा जखमी झालेले लोक व उरलेली फौज बरोबर घेऊन परत शिरूरच्या छावणीत गेला. [२५]

संदर्भ

  1. ^ इ.स. १८८५ चे गॅझेटिअर
  2. ^ https://www.loksatta.com/vishesh-news/marathi-articles-on-history-of-battle-of-koregaon-1512473/
  3. ^ https://m.youtube.com/watch?v=aHrm5gaDpZo
  4. ^ http://www.dalitdastak.com/news/are-you-know-that-war-untouchable-defeat-peshawa-2886.html
  5. ^ महार मांगांच्या हातांनी पेशवाईचा शेवट (हिंदी)
  6. ^ महारांच्या शौर्यास मैसूरचा सलाम
  7. ^ https://satyagrah.scroll.in/article/25204/why-lakhs-of-indians-celebrate-the-british-victory-over-the-maratha-peshwas
  8. ^ मानसिंग, सुर्जित. p. ३८८ https://books.google.com/books?id=6HAeAgAAQBAJ&pg=PA388. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ तारिक, मोहम्मद. pp. 1.15–1.16 https://books.google.com/books?id=DR2oAQAAQBAJ&pg=SA1-PA15. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ संधू, गुरुचरन सिंग. pp. २११ https://books.google.com/books?id=6qTeAAAAMAAJ. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ जॉन रिड्डीक. pp. ३४ https://books.google.com/books?id=Es6x4u_g19UC&pg=PA34. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ नाव=CharlesDatta1918
  13. ^ . pp. 542–550 https://books.google.ca/books?id=Fds2AAAAMAAJ&pg=PA542. |पहिले नाव= missing |पहिले नाव= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ नाव ="गॅझेटिअर1885"
  15. ^ name="CharlesDatta1918"> http://www.forgottenbooks.com/readbook_text/A_History_of_the_Maratha_People_v3_1000347281/241. Unknown parameter |पान क्रमांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |प्रथम नाव= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  16. ^ Reginald George Burton (2008). pp. 164–165. ISBN 978-0-9796174-6-1 https://books.google.com/books?id=UAxEpTvTxrQC&pg=PA164. Missing or empty |title= (सहाय्य)
  17. ^ नाव=Gazetteer1885
  18. ^ नाव=RGB_2008
  19. ^ name="HTP_1825">Henry Thoby Prinsep (1825). 2. pp. 158–167 https://books.google.ca/books?id=Uq5jAAAAMAAJ&pg=PA160. Missing or empty |title= (सहाय्य)
  20. ^ name="RVR_1916"
  21. ^ name="Gazetteer1885"
  22. ^ name="JGD_1826"
  23. ^ name="TEC_1884">Thomas Edward Colebrooke (2011) [1884]. 2. pp. 16–17 https://books.google.com/books?id=yjjehtJoLQgC&pg=PA16. Missing or empty |title= (सहाय्य)
  24. ^ . pp. 244–247 https://books.google.com/books?id=dboMAAAAIAAJ&pg=PA244. Missing or empty |title= (सहाय्य)
  25. ^ संदर्भ ग्रंथ - मराठी रियासत खंड 8

हे ही पहा

बाह्य दुवे