"अल्पेश ठाकोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''अल्पेश ठाकोर''' (जन्म १९७७) हा एक गुजराती सामाजिक कार्यकर्ता व ओबी...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१८:५३, २६ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

अल्पेश ठाकोर (जन्म १९७७) हा एक गुजराती सामाजिक कार्यकर्ता व ओबीसी समाजाचा नेता आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत असताना तो पुढे काँग्रेसमध्ये सहभागी झाला. गुजरातमध्ये निवडणूक लढवली आणि तो राधनपूर मतदारसंघातून निवडून आला.

ठाकोरला प्रारंभीपासून ओबीसी, एसटी, एससी समाजाचे प्रश्‍न सोडविण्यात रस होता. त्याने ‘गुजरात क्षत्रिय ठाकोर सेने’ची स्थापनाही केली आहे. या वर्गातील तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी तो नेहमीच प्रयत्नशील राहिला. भटक्‍या विमुक्तांना आरक्षणाबरोबरच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याचे कार्य सुरू असते.

गुजरातमधील ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी त्याने २०१६ मध्ये मोठे आंदोलन केले.