"समतेचा पुतळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६६: ओळ ६६:
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* [http://www.loksatta.com/mumbai-news/dr-babasaheb-ambedkar-350-feet-statue-will-be-place-in-indu-mill-1288313/ इंदु मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ३५० फुट पुतळा]
* [http://www.loksatta.com/mumbai-news/dr-babasaheb-ambedkar-350-feet-statue-will-be-place-in-indu-mill-1288313/ इंदु मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ३५० फुट पुतळा]

*http://m.lokmat.com/photos/maharashtra/it-should-be-memorial-indu-millar-babasaheb-when/it-should-be-memorial-indu-millar-babasaheb-when-3/ असं असेल इंदू मिलवर बाबासाहेबांचं स्मारक]


{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

०७:५२, ९ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

समतेचा पुतळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई
सर्वसाधारण माहिती
प्रकार राष्ट्रीय व ऐतिहासिक स्मारक
ठिकाण प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र, भारत
बांधकाम सुरुवात २०१५
मूल्य अंदाजे ₹ ५९१ कोटी
ऊंची
वास्तुशास्त्रीय स्मारक, पुतळा, स्तूप
क्षेत्रफळ ४८,४१४.८३ चौरस मीटर (सुमारे १२.५ एकर)
बांधकाम
वास्तुविशारद शशि प्रभू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई किंवा समतेचा पुतळा (इंग्रजी: The Statue of Equality)[१][२][३] हे १०६.६८ मीटर (३५० फुट) उंच डॉ. आंबेडकरांचा पुतळा असलेले महाराष्ट्र सरकारद्वारा प्रस्तावित भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय संविधानाचे जनक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आहे.[४] भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विशालकाय मूर्ती आणि विश्व-स्मारकाच्या निर्मीतीचे मुंबईत उद्घाटन केले.[५][६][७][८] समतेचे हे स्मारक बाबासाहेबांचे समाधी स्थळ चैत्यभूमी पासून जवळच आहे. या स्मारकाच्या जमिनीचे क्षेत्रफळ ४८,४१४.८३ चौरस मीटर असून स्मारकासाठीचा खर्च सुमारे ५९१ कौटी रूपये इतका येईल.[९]

विश्वमानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि न्यायासाठी संपुर्ण आयुष्य संघर्ष केला आणि भारतातील कोट्यवधी जनतेला त्यांनी समतेचा, स्वादीक्षाभूमी आणि माणूस म्हणून जगण्याचा हक्क बहाल केला. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समतेचे प्रतिक असेही म्हणतात आणि यामुळेच त्यांच्या या स्मारकाला समतेचे स्मारक संबोधिले जाते.

इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई येथे १८ ऑगस्ट २०१२ रोजी भारताचे माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांनी या बाबत घोषणा केली होती की, या स्मारकाची निर्मिती दादर येथील जुन्या हे स्मारक राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळा(इंदू मिल)च्या जागेवर उभारण्यात येणार.[१०] पुढे नरेंद्र मोदींच्या हस्ते ११ नोव्हेंबर २०१५ रोजी इंदुमिल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपुजन करण्यात आले. तेव्हाही या जमिनीचे हस्तांतरण पूर्ण झाले नव्हते. ५ एप्रिल २०१५ रोजी राज्य सरकार अणि केंद्र सरकार यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला होता. या कराराची पूर्ती राज्य सरकारने अद्याप केली नसल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या शिवाय या करारानुसार इंदु मिलच्या जागेची किंमत राज्य सरकारने द्यावी किंवा त्या किमतीची जागा एनटीसीला द्यावी यावर राज्य सरकारने सहमती दर्शवली होती[११]

रचना

फाउंडेशन स्टोन

११ ऑक्टोबर इ.स. २०१५, सदर स्मारकाची कोनशीला भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्थापित केली.।[१२] स्मारकाचेनिर्मितीचे काम नोव्हेंबर २०१५ पासून सुरु झाले आहे.

स्मारकाची संरचना

स्मारकाचा आराखडा वास्तुविशारद शशी प्रभू यांनी तयार केला आहे. स्मारक संरचनेत मुख्यप्रवेशद्वार एसकेएस मार्गाच्या सोबत कँडेल रोडच्या मध्यबिंदू समांतर होत आहे तसेच. अनुयायांच्या सोयीसाठी हे स्मारक चैत्यभूमी ला जोडले जात आहे. स्मारकाचा अंदाजित खर्च ५५० कोटी रुपये असून १२ एकरच्या इंदू मिलच्या जागेत स्मारक बांधले जाणार आहे.[१३] स्मारकाचे मुख्य आकर्षण तलावाच्या चारही बाजूने २५००० चौरस फुट स्तूप असेल. दगडाचे २४ आरे असलेले एक विशाल घुमट ज्याचा आकार अशोक चक्र सारखा असेल तसेच ३९,६२२ चौरस फुट जागेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील संग्रहालय आणि ग्रंथालय तयार केले जाणार आहे.स्मारक परिसरात ४५० वाहनाची पार्किंगची सुविधा असेल. स्मारक निर्मितीची जबाबदारी "मुबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण" (MMRDA) कडे सोपवण्यात आली आहे.[१४][१५]

स्तूप

स्तूप 110.95 कोटी रूपये असा सर्वात असा महागडा हिस्सा असेल (यूएस $ में 16.2 मिलियन). स्तूप 40 मीटर (140 फुट) ऊंच 80 मीटर (110 फुट) परिधी व्यासाचे असेल. एक धारीदार छत्र यासारखे बौद्ध चैत्य बनेल. एक आठ स्तरीय कांस्य चंदवा गुंबदाच्या पायामध्ये एक कमल तलाव समवेत 2,400 वर्ग मीटरचे एक निर्मित क्षेत्रात स्तूपाच्या शीर्षावर बुद्धांची आठ पट मार्गाचे प्रतिनिधीत्व.[१६]

विपश्यना हॉल

सदर स्मारकात १३००० लोक विपश्यना करू शकतील एक्ढ्या क्षमतेच विपश्यना हॉल प्रस्तावित आहे.[१७]

संघर्ष दालन

स्मारकात ५०,००० चौ.फुट कलादालनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर तैलचित्र, वस्तूसंग्रहालय तसेच भव्य ग्रंथालय असेल.।[१८]

विवाद

स्मारकाच्या उद्घाटनानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर तसेच प्रकाश आंबेडकर स्मारकाच्या आराखड्यावरून असमाधानी होते. तसेच त्यांचा मते समतेचा पुतळा हा अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेचा पुतळा या पेक्षा उंच असावा ही प्रमुख मागणी होती. प्रकाश आंबेडकर यांच्या मतानुसार हे स्मारक ‘थिंक टैंक संस्था’, म्हणून जगभरातील विद्वानांसाठी आंतरराष्ट्रीय मानक बौद्धिक केंद्र प्रमाणे असावे कारण बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले. आनंदराज आंबेडकर यांनी देखील राज्य सरकार द्वारा निर्मित आराखडा परिपूर्ण नाही असे म्हणत एक भिन्न आराखडा निर्माण केला जावा अशी इच्छा व्यक्त केली. सदर आराखडा केवळ एक बगीचा वाटत आहे, हा आराखडा अंतिम करण्यापूर्वी जागतिक दर्जाच्या उद्योग निर्मिती करणाऱ्या सोबतच बौद्ध धम्म विशेषज्ञ, प्रतिष्ठित आर्किटेक्ट विभिन्न बौद्ध देशातील विशेषज्ञांची मते घ्यावीत, त्याच बरोबर जनतेतून तांत्रिक समिती गठीत करण्याची मागणी केली. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाची उंची महत्तम हवी ज्यामुळे समुद्राच्या समोरील भागात परदेशातून मुंबईत प्रवेश करतेवेळी जागतिक आकर्षण म्हणून स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रभावशाली ठरावा.[१९][२०]

स्मारकातील नव्या आराखड्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याची ऊंची १५० फुट वरून ३०० फुट केलेली आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ name="TNN 2012">TNN (2 January 2012). "Statue of equality should come up at Indu Mill site: Ambedkar". The Times of India. 1 October 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Govt dithers even on 'statue of equality' plan". dna. 16 March 2012. 1 October 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "A year on, state govt yet to pick designer for Ambedkar memorial".
  4. ^ Sports (10 October 2015). "PM Modi to be briefed on how Ambedkar Memorial will look". The Indian Express. 20 October 2015 रोजी पाहिले.
  5. ^ "Ambedkar memorial: Statue taller than that of Liberty sought". Indian Express. 2012-12-06. 2013-10-29 रोजी पाहिले.
  6. ^ http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-01-02/pune/30580928_1_entire-land-memorial-years-acres
  7. ^ http://www.yourspj.com/statue-of-equality-diversion-from-objective/
  8. ^ http://www.dnaindia.com/mumbai/report-govt-dithers-even-on-statue-of-equality-plan-1662960
  9. ^ आंबेडकर स्मारक खर्चात १६६ कोटींची वाढ, लोकसत्ता, १९ सप्टेंबर २०१७
  10. ^ "Indu Mills land in the city for the memorial of Dr Babasaheb Ambedkar before December 6, the death anniversary of the late leader".
  11. ^ माझा पेपर
  12. ^ PTI (20 October 2015). "PM Lays Foundation Stone of Ambedkar Memorial, Sena Stays Away". The New Indian Express. 20 October 2015 रोजी पाहिले.
  13. ^ http://www.bhaskar.com/news/MH-ambedkar-statue-installation-news-hindi-5401395-PHO.html
  14. ^ दैनिक भास्कर
  15. ^ "PM Modi to be briefed on how Ambedkar Memorial will look".
  16. ^ "Ambedkar memorial on 12-acre Indu Mill land".
  17. ^ "Work on Ambedkar memorial to commence in November". I am in DNA of India. 8 October 2015. 20 October 2015 रोजी पाहिले.
  18. ^ "PM Narendra Modi Lays Foundation Stone of Ambedkar Memorial in Mumbai". NDTV.com. 11 October 2015. 20 October 2015 रोजी पाहिले.
  19. ^ Rashid, Omar (11 October 2015). "Ambedkar family not satisfied with memorial design". The Hindu. 20 October 2015 रोजी पाहिले.
  20. ^ "Ambedkar memorial design fails to impress Dalit leaders - See more at: http://indianexpress.com/article/cities/mumbai/ambedkar-memorial-design-fails-to-impress-dalit-leaders/#sthash.brcoe6p0.dpuf". External link in |title= (सहाय्य)