"मीना कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मीना कपूर (जन्म : कलकत्ता, १९३०, मृत्यू : मुंबई, २३ नोव्हेंबर २०१७) य...
(काही फरक नाही)

१६:२०, ५ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

मीना कपूर (जन्म : कलकत्ता, १९३०, मृत्यू : मुंबई, २३ नोव्हेंबर २०१७) या एक हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन करणाऱ्या गायिका होत्या. त्यांचे वडील विक्रम कपूर हे कलकत्त्याच्या न्यू थिएटर्स स्टुडिओचे अभिनेते होते. चित्रपट निर्माते पी. सी. बरुआ हेही नातेवाईक होते. घरातच चित्रपट असल्याने मीना कपूरला चित्रपटात प्रवेश सुकर झाला; पण ती लोकप्रिय मात्र तिच्या गुणांमुळेच झाली.

तरुण वयातच एस.डी. बर्मन यांच्यासारख्या संगीतकाराने तिला हेरले आणि तिला ‘अथ दिन’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत आणले. १९४० ते ६५ हा मीना कपूर यांच्या कारकीर्दीतील बहराचा काळ होय. अतिशय सुंदर, नितळ, स्वच्छ आणि निकोप असा आवाज. सहजपणे वळणाऱ्या आवाजातून निघणाऱ्या हरकती आणि मुरकती यामुळे मीन कपूरने गायलेली गाणी रसिकांच्या स्मरणात राहणारी ठरली.

मीना कपूर यांचा संगीतकार अनिल विश्वास यांच्याशी १९५९ मध्ये विवाह झाला. त्या काळातील चित्रपटसृष्टीला अनिल विश्वासही कंटाळले होते. त्यामुळे दिल्ली आकाशवाणीवर काम करण्याची चालून आलेली संधी त्यांनी स्वीकारली. मीना कपूर यांनीही आपल्या कारकिर्दीला रामराम करून त्यांच्याबरोबर दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला, तरीही नंतरच्या काळात त्या चित्रपटांसाठी गातच राहिल्या.

मीना कपूर यांची गाजलेली गाणी

  • आना मेरी जान मेरी जान संडे के संडे (चित्रपट - शहनाई)
  • एक नई कली ससुराल चली
  • कुछ और जमाना कहता है (चित्रपट - छोटी छोटी बातें, १९६५)
  • मोरी अटरिया पे कागा बोले (चित्रपट - आँखे, १९५०)
  • याद रखना चाँद तारों ये सुहानी रात को
  • रसिया रे मन बसिया रे (चित्रपट - परदेसी-१९५७)
  • रुत रंगीली है सुहानी रात है (चित्रपट - प्यार की जीत, १९४८)