"लेशान जायंट बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट इमारत |नाव = '''{{लेखनाव}}''' |चित्र = Image:Leshan Buddha Statue View.JPG...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२२:२२, १९ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

लेशान जायंट बुद्ध
Leshan Giant Buddha
सर्वसाधारण माहिती
प्रकार पुतळा
ठिकाण लेशान, चीन
बांधकाम सुरुवात इ.स. १७१३
पूर्ण इ.स. १८०३
ऊंची
वास्तुशास्त्रीय ७१ मीटर (२३३ फूट)


लेशानचे भव्य बुद्ध (चीनी: 乐山 大佛; इंग्रजी: Leshan Giant Buddha) हा ७१ मीटर (२३३ फूट) उंच दगडाचा मैत्रेय बुद्धांचा पुतळा आहे. हा जगातील सर्वात उंच दगडाचा पुतळा आहे.[१]

चीनच्या लेशान शहराशेजारच्या डोंगरातील बसलेल्या अवस्थेतील ही भव्य बुद्धमूर्ती इ.स. ७१३ आणि इ.स. ८०३ दरम्यान (तांग राजघराण्याच्या काळात) एमेई पर्वताच्या एका उभ्या कड्यांमध्ये कोरीवकाम करून बनवली गेली. अजूनही सुस्थितीत असलेली ही मूर्ती बसलेल्या अवस्थेतील बुद्धांची जगातील सर्वात उंच मूर्ती आहेच पण प्राचीन काळातील सर्वात उंच एकाष्म शिल्प म्हणूनही तिला ओळखले जाते. या मूर्तीच्या समोरच, तिच्या पायाजवळ मिंग, चिंग्यी आणि दादू या तीन नद्यांचा संगम आहे. इ.स. १९९६ पासून या स्थळाला UNESCO World Heritage Site चा दर्जा मिळाला आहे.[२] मूर्तीच्या आजूबाजूची १८ चौरस किमी जागा ऐतिहासिक संरक्षित क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक मूर्ती आणि कोरीवकामे आहेत.

  1. ^ http://www.ancient-origins.net/ancient-places-asia/leshan-giant-buddha-largest-stone-buddha-world-003398
  2. ^ Mount Emei Scenic Area, including Leshan Giant Buddha Scenic Area. UNESCO World Heritage Site