"बुद्ध पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६२: ओळ ६२:
[[वर्ग:जयंती]]
[[वर्ग:जयंती]]
[[वर्ग:गौतम बुद्ध]]
[[वर्ग:गौतम बुद्ध]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्या]]
[[वर्ग:भारतातील सार्वजनिक सुट्ट्या]]

२३:०६, १४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


'बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीय लोकांचा सण आहे. हा सण वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशीच तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत[१] आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध धम्म सिद्धांतावरून तथागत बुद्ध विश्वातील सर्वात महान महापुरुष होते, असे मानले जाते. आज बौद्ध धर्माला मानणारे, प्रामुख्याने भारत, चीन, नेपाल, सिंगापूर, व्हियतनाम, थायलंड, जपान, कंबोडिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया, पाकिस्तान इत्यादी देशांतील१८० कोटींहून अधिक लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. [२]

बिहारमधील बोधगया हे हिंदू व बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो.[१] बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण विहार एक महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते. हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबधित असले तरी आजूबाजूच्या परिसरातीला हिंदू लोक देखील या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात. येथील बौद्ध विहारात हिंदूही आस्थापूर्वक पूजा करण्यास येतात. या विहाराचे महत्त्व तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणा शी जोडले गेले आहे. या विहाराचे स्थापत्य अजिंठा लेण्यांच्या विहारासारखे आहे. या विहारात गौतम बुद्धांची अंतिम क्षणाच्या मृत्युशय्येवर पडलेल्या अवस्थेतील (भू-स्पर्श मुद्रा) ६.१ मीटर लांब मूर्ती आहे. ही मूर्ती लाल मातीपासून बनवलेली आहे. जेथून मूर्तीसाठी माती काढली आहे तेथेच हे विहार तयार केले आहे. [३] विहाराच्या पूर्व भागात एक स्तूप आहे. तेथे गौतम बुद्धांवर अंतिम संस्कार झाले.

श्रीलंका तसेच अन्य दक्षिण-पूर्व आशियायी देशात हा दिवस 'वेसाक' उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा 'वैशाख' शब्दाचा अपभ्रंश आहे.[४] या दिवशी बौद्ध अनुयायी घरावर दिवे लावतात. घरे फुलांनी सजवतात. जगभरातून या दिवशी अनुयायी बोधगया येथे येतात आणि प्रार्थना करतात. या दिवशी बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठण केले जाते. विहार तसेच घरातील बुद्धाच्या मूर्तीची फुले वाहून, दिवे ओवाळून पूजा केली जाते. बोधिवृक्षाचीही पूजा केली जाते आणि त्याच्या फांद्यांना पताकांनी सुशोभित केले जाते.वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते. या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे.

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली येथील संग्रहालयातील बुद्धाच्या अस्थी सर्वांना दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात, तिथेही येऊन लोक प्रार्थना करतात.

बुद्ध जयंतीचे महत्व

जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

आरंभीचा प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधिवृक्षाखाली संबोधीज्ञान प्राप्‍त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्‍त झाले. त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे. या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली.

दुःख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तु स्वतःला मिळविण्याकरीता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले.

ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्‍त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले. यालाच आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात.

हिंदू धर्मीयांचा आहे तसा बौद्धांचा कर्मावर व पुनर्जन्मावर विश्वास नाहीे. तेव्हा हे जन्ममरणाचे रहाटगाडगे कसे चालते, याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य-समुत्पादही त्यांना समजला. प्रतीत्य-समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काही तरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून असते. तेव्हा जन्ममृत्यू कसे होतात, याचे स्पष्टीकरण करणारी कार्यकारणपरंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कार्यकारणपरंपरेने कसा संबंध पोहोचतो, हे प्रतीत्य-समुत्पादात सांगितले आहे.

बुद्ध पौर्णिमेला विशेष ठिकाणी जाऊन सामूहिक प्रार्थना करण्याची प्रथा आहे.

हे सुद्धा पहा


चित्रदालन

संदर्भ

  1. ^ a b मनोहर पुरी. "बुद्ध पोर्णिमा" (एचटीएम) (हिन्दी भाषेत). अभिव्यक्ति. Unknown parameter |accessyear= ignored (|access-date= suggested) (सहाय्य); Unknown parameter |accessmonthday= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ साचा:Citebook
  3. ^ लेखक कुमार आनंद. "बुद्ध पौर्णिमा" (एचटीएम) (हिन्दी भाषेत). नूतन सवेरा. Unknown parameter |accessyear= ignored (|access-date= suggested) (सहाय्य); Unknown parameter |accessmonthday= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "बुद्ध पूर्णिमा या बुद्ध जयंती" (एचटीएम) (हिन्दी भाषेत). वेब दुनिया. Unknown parameter |accessyear= ignored (|access-date= suggested) (सहाय्य); Unknown parameter |accessmonthday= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

साचा:प्रवेशद्वार