"खासगाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३२: ओळ १३२:


== धार्मिक स्थळे ==
== धार्मिक स्थळे ==
गावात [[मारुती]] मंदिर, [[खंडोबा]] मंदिर, [[शनिदेव]] मंदिर, [[कृष्ण ]] मंदिर, [[दुर्गा]] देवी मंदिर, [[दत्त]] संस्थान, [[बौद्ध]] विहार, दोन [[महादेव]] मंदिरे, [[मशिदी]] ही प्रमुख धार्मिक स्थळे आहेत.
गावात [[मारुती]] मंदिर, [[खंडोबा]] मंदिर, [[शनिदेव]] मंदिर, [[कृष्ण ]] मंदिर, [[दुर्गा]] देवी मंदिर, [[दत्त]] संस्थान, [[बौद्ध]] विहार, दोन [[महादेव]] मंदिरे, [[मशिदी]] ही प्रमुख धार्मिक स्थळे आहेत.

[[File:Hanuman Mandir in Khasgaon.jpg|thumb|खासगांवातील हनुमान मंदिर]]

[[File:Hanuman Mandir, Khasgaon.jpg|thumb|हनुमान मंदिराचा आतील भाग]]

[[File:Two Buddhist flags in India|thumb|खासगाव मधील बुद्ध विहाराची नियोजित जागा]]

[[File:Vitthal Mandir in Khasgaon (Jalna district).jpg|thumb|खासगांवातील विठ्ठल रूक्माई मंदिर]]

[[File:Mosque in Khasgaon (Jalna district).jpg|thumb|खासगांवातील मशिद]]


== आरोग्य ==
== आरोग्य ==

२३:५५, १३ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

  ?खासगांव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

२०° १५′ २०.८८″ N, ७६° ०३′ २९.५२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,२६७.०९ चौ. किमी
जवळचे शहर जाफ्राबाद
विभाग औरंगाबाद
जिल्हा जालना
तालुका/के जाफ्राबाद
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
३,५७३ (२०११)
• ३/किमी
९०३ /
भाषा मराठी

खासगांव हे जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातील एक विकसनशील गाव आहे. जाफ्राबाद पासून हे गाव ९ कि.मी. अंतरावर आहे. वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान, तसेच तंत्रज्ञानाच्या विविध योजना व उपक्रम या गावी राबवल्या गेल्या आहेत. स्वच्छता अभियानामध्ये या गावाने जिह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर स्मार्ट ग्राम (आदर्श गांव) म्हणून तालुक्यात हे गांव प्रथम स्थानासाठी नामांकित झाले आहे. गावचा विकास व प्रगती पाहण्यासाठी १३ मे, इ.स. २०१७ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर काही मंत्र्यांनी या गांवास भेट दिली आहे.

लोकसंख्या

खासगाव येथे इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार ७३८ कुटुंबे असून लोकसंख्या ३,५७३ आहे. पैकी पुरुष लोकसंख्या १,८७८ तर स्त्रियांची संख्या १,६९५ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या ४९४ (२८१ मुले व २१३ मुली) असून ती एकूण लोकसंख्येच्या १३.८३% आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या २१२ (५.९३%) असून त्यात १०६ पुरुष व १०६ स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे १० लोक (०.२८%) असून त्यात ६ पुरुष व ४ स्त्रिया आहेत.[२][३]

घटक एकूण पुरुष स्त्री
कुटुंबे ७३८
लोकसंख्या ३,५७३ १,८७८ १,६९५
मुले (० ते ६ ) ४९४ २८१ २१३
अनुसूचित जाती २१२ १०६ १०६
अनुसूचित जमाती १०
साक्षरता ७४.३७% ८६.१६% ६१.६७%
एकूण कामगार १,७५३ १,०४६ ७०७
एकूण मतदार २,७०१ १,४७६ १,२२५

ग्रामसंसद

खासगांवची ग्रामपंचायत

खासगांवातील ग्रामपंचायत सदस्य संख्या ११ असून एकूण मतदार संख्या २,७०१ आहे, ज्यात १,४७६ पुरुष व १,२२५ स्त्रिया आहेत.

शैक्षणिक सुविधा

गावामध्ये अनेक शैक्षणिक केंद्रे उपलब्ध आहेत.

  • जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा, खासगांव (प्राथमिक) (विद्यार्थी संख्या - ४४)
  • जिल्हा परिषद प्रशाला, खासगांव (माध्यमिक) (विद्यार्थी संख्या - २२०)
  • अभिजीत कला व वाणिज्य महाविद्यालय, खासगांव
  • जिजाऊ इंग्लिश स्कूल, खासगांव

याशिवाय गावात काही वस्ती शाळा आहेत.

आरोग्य केंद्र

गावात अनेक वैद्यकीय व आरोग्य केंद्रे आहेत.

  • प्राथमिक आरोग्य केंद्र — १
  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्र — १
  • पशुवैद्यकीय दवाखाना — १
  • अंगणवाड्या — ५

पिण्याचे पाणी

  1. सार्वजनिक विहिरी — ३
  2. खाजगी विहिरी — १९५
  3. बोअर वेल — २५
  4. हातपंप — ७
  5. पाण्याच्या टाक्या — ३
  6. नळ योजना — २
  7. नळकोंडाळी — ११
  8. नळ कनेक्शन — ५४४
  9. वाटर फिल्टर — १

गावासाठी एक वॉटर फिल्टर बसवल्यामुळे लोकांना स्वच्छ पाणी मिळते. हे पाणी ५ रुपयामध्ये १५ लिटर तसेच १ रुपयात १ लिटर या भावात मिळण्याची व्यवस्था येथे केलेली आहे.

नद्या

गावातून दोन नद्या वाहतात — सितान्हानीतरी (मोठी नदी) आणि लेंडी नदी

गावांतून जाणाऱ्या या दोन्ही नद्यांची खोली वाढवून त्यात ठिकठिकाणी सिमेंट बांधारे (कट्टा) घालून पाणी अडवा-पाणी जिरवा ची योजगा राबवलेली आहे. यामुळे पाण्याचे पाणी व शेतीसाठीचे पाणी यांचे प्रमाण व उपलब्धता वाढली आहे.

स्वच्छता

खासगांव हे स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर आहे. गावात कुठेही उघडी गटारे नाहीत. कचरा न्यायला ग्रामपंचायतीची कचरा गाडी रोज सकाळी येते.

हगणदारी मुक्त

गावात जवळजवळ ९९% कुटुंबांनी घरात शौचालये बांधलेली असून हे गाव हगणदारी मुक्त आहे. येथे गावात वैयक्तिक संडास खोल्यांची सार्वजनिक प्रकारे बांधणी केली असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हा प्रकल्प सर्वोत्कृष्ट वाटला.

संपर्क व दळणवळण

खासगांव येथे डाक घराची सुविधा उपलब्ध असून त्याचा पिन कोड ४३१ २०६ आहे. गावात दूरध्वनी उपलब्ध असून मोबाईल टॉवरही उभारण्यात आले आहे. गावात मोबाईल फोन सुविधा आहे. गावात शासकीय बस सेवा तसेच ऑटोरिक्षा, टॅक्सी व व्हॅन उपलब्ध आहे.

बाजार

गावात रेशन दुकान आहे. गावात दर गुरुवारी आठवड्याचा बाजार भरतो. गावच्या बाजारात गाय, बैल, म्हैस, शेळी इत्यादी पशूंची खरेदी-विक्रीसुद्धा केली जाते.

लोकजीवन

खासगावांत विविध जातिधर्माचे लोक राहतात. त्यात प्रामुख्याने मराठा, गोंधळी, मुस्लिम, धनगर, माळी, बौद्ध हे समाज आहेत. तसेच वडार, चांभार, मांग इत्यादी समाज सुद्धा अल्प प्रमाणात आहेत.

धार्मिक स्थळे

गावात मारुती मंदिर, खंडोबा मंदिर, शनिदेव मंदिर, कृष्ण मंदिर, दुर्गा देवी मंदिर, दत्त संस्थान, बौद्ध विहार, दोन महादेव मंदिरे, मशिदी ही प्रमुख धार्मिक स्थळे आहेत.

खासगांवातील हनुमान मंदिर
हनुमान मंदिराचा आतील भाग
चित्र:Two Buddhist flags in India
खासगाव मधील बुद्ध विहाराची नियोजित जागा
खासगांवातील विठ्ठल रूक्माई मंदिर
खासगांवातील मशिद

आरोग्य

गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात पाच अंगणवाड्या (पोषण आहार केंद्रे) आहेत. गावात एक इतर पोषण आहार केंद्रही आहे.

गावात हुतुतूचे क्रीडांगण आहे. गावात खेळ / करमणूक केंद्र उपलब्ध नाही. सर्वात जवळील खेळ / करमणूक केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही. सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.

गावात साने गुरुजी यांचे नाव असलेले सार्वजनिक ग्रंथालय आहे. गावात वृत्तपत्रे मिळतात. गावात विधानसभा मतदान केंद्र आहे. गावात जन्म व मृत्यू नोंदणी केंद्र आहे.

वीज

उत्पादन

खासगाव ह्या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या क्रमाने): कापूस, गहू, बाजरी, ज्वारी, मका, भुईमूग, तूर, मूग

संदर्भ

हे ही पहा

बाह्य दुवे