"भीम ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''भीम ध्वज''' ('''निळा ध्वज''', ''बौद्ध ध्वज'') हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१७:३३, ११ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

भीम ध्वज (निळा ध्वज, बौद्ध ध्वज) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतीक ध्वज आहे. हा नवबौद्ध धर्मीयांचा ध्वज असून तो बौद्ध विहारांवर लावण्यात येतो. अशोकचक्र चिन्हांकित हा निळा ध्वज दलित-बहुजन आंदोलनात नेहमी वापण्यात येतो. तसेच हा ध्वज बाबासाहेबांचे व भारतीय बौद्धांचे (नवयानी) प्रतिक सुद्धा मानला जातो. डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्मासंबंधीच्या अनेक ठिकाणी हा ध्वज स्थित असतो. या ध्वजाचा रंग निळा असून तो समतेचे प्रतिक मानतो. बाबासाहेब हे समतेचे थोर पुरस्कर्ते होते. या ध्वजावर महान चक्रवर्ती सम्राट अशोकांचे पांढऱ्या रंगात बौद्ध धम्मचक्राचा एक रूप असलेले अशोकचक्र असते. अनेकदा या ध्वजावर ‘जय भीम’ असे शब्द लिहिलेले असतात.