"हनुमंत उपरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = हनुमंत उपरे
| चित्र =
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| टोपणनाव = काका
| जन्मदिनांक =
| जन्मस्थान =
| मृत्युदिनांक = [[१९ मार्च]] [[इ.स. २०१६]]
| मृत्युस्थान = [[मुंबई]]
| शिक्षण =
| पदव्या =
| चळवळ = ओबीसी बौद्ध-धर्मांतर चळवळ
| संघटना = [[सत्यशोधक ओबीसी परिषद]]
| अवगत भाषा =
| कार्यक्षेत्र = सामाजिक-धार्मिक चळवळी, राजकारण
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[बौद्ध धर्म]]
| प्रभाव = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
| प्रभावित = ओबीसी समाज
| वडील नाव =
| आई नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव =
| अपत्ये = २ मुले, १ मुलगी
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
'''हनुमंत उपरे''' (– [[१९ मार्च]] [[इ.स. २०१६]]) हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी, [[सत्यशोधक ओबीसी परिषद]]ेचे अध्यक्ष, व 'ओबीसी बौद्ध-धर्मांतर'चे प्रणेते होते.
'''हनुमंत उपरे''' (– [[१९ मार्च]] [[इ.स. २०१६]]) हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी, [[सत्यशोधक ओबीसी परिषद]]ेचे अध्यक्ष, व 'ओबीसी बौद्ध-धर्मांतर'चे प्रणेते होते.



०२:२५, ११ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

हनुमंत उपरे
टोपणनाव: काका
मृत्यू: १९ मार्च इ.स. २०१६
मुंबई
चळवळ: ओबीसी बौद्ध-धर्मांतर चळवळ
संघटना: सत्यशोधक ओबीसी परिषद
कार्यक्षेत्र: सामाजिक-धार्मिक चळवळी, राजकारण
धर्म: बौद्ध धर्म
प्रभाव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रभावित: ओबीसी समाज
अपत्ये: २ मुले, १ मुलगी

हनुमंत उपरे (– १९ मार्च इ.स. २०१६) हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष, व 'ओबीसी बौद्ध-धर्मांतर'चे प्रणेते होते.

जीवन

हनुमंत उपरे यांचा बीड जिल्ह्यातील एका खेड्यात जन्म झाला. उपरे यांनी खूप कष्टाने उच्च शिक्षण घेतले. इ.स. १९९०-९५ दरम्यान प्राध्यपकाची नोकरी करीत असतानाच त्यांनी सामाजिक व राजकीय चळवळीत प्रवेश केला. भारिप बहुजन महासंघाचे ते काही काळ प्रदेशाध्यक्ष होते. उपरे यांचा पत्नी, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे. पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे नाव द्यावे यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. ‘भावसार जागृती’ नावाचे मासिक त्यांनी दोन दशकांपेक्षा अधिक काळ अव्याहतपणे चालवले. त्यातून त्यांनी ओबीसीतील अनेक उपेक्षित जातीचे वास्तव मांडले. ‘मी ओबीसी बोलतोय’ हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे.

धर्मांतर चळवळ

पुढे उपरेंनी सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या माध्यमातून ओबीसी (इतर मागासवर्गीय) समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला. उपरे यांनी २००६ मध्ये नवयान बौद्ध धम्म स्वीकारला आणि २००७ मध्ये, मुंबई लक्षावधी लोकांना मुख्यतः ओबीसी व आदिवासी, बौद्ध धम्माची दीक्षा दिली.[१] ओबीसी समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी आर्थिक, सामाजिक लढ्याबरोबरच सांस्कृतिक परिवर्तनाची चळवळ केली पाहिजे, अशी त्यांची धारणा झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला प्रेरणास्थानी ठेवून त्यांनी १४ ऑक्टोबर २०११ पासून ‘चलो बुद्ध की ओर’ - ‘ओबीसी बांधव आता बुद्ध धम्माच्या वाटेवर’ हे अभियान सुरु केले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी ओबीसी धर्मांतर जनजागृती परिषदा घेतल्या. राज्यातील लाखो ओबीसींना आपल्या मूळ बौद्ध धम्माकडे आणण्याची चळवळ त्यांनी हाती घेतली होती. त्यांच्या या चळवळीला राज्यभरातून नव्हे तर इतर राज्यातूनही मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याचा परिणाम म्हणून ओबीसीमधील विविध जातींमधील सुमारे साडे सहा हजार लोकांनी धर्मातर केले होते. याच्या पुढील वर्षी १४ ऑक्टोबर २०१६ रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवर ५ लाख ओबीसी धर्मांतर करुन बुद्ध धम्माचा स्वीकार करतील असे त्यांनी उद्दिष्ट ठेवले होते.

निधन

हनुमंत ऊपरे यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी १९ मार्च २०१६ रोजी सकाळी नऊच्या सुमारास मुंबईत निधन झाले. उपरे यांना ८ मार्च रोजी औरंगाबाद येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने दाखल करण्यात आले होते. त्यांनंतर त्यांना ११ मार्च रोजी मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र १९ मार्च गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले. उपरे यांच्या इच्छेनुसार त्यांचे डोळे, किडनी यासारख्या अवयवांचे दान केले गेले आहे.

संदर्भ