"देवराई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विकिकरण}}
{{विकिकरण}}
'''देवराई''' म्हणजे [[देव|देवाच्या]] नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे [[वन]]. इंग्रजी भाषेत याला (Sacred grove) सेक्रेड ग्रोव्ह म्हणतात. हे परंपरेने चालत आलेले सरकारच्या वनखात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले ‘[[अभयारण्य]]‘च होय.अशा वनांना अनेकदा ‘शरणवन’ किंवा ‘अभयस्थान’ असही म्हटलं जातं. देवराया [[भारत]]भर विखुरलेल्या आहेत तशा भारताबाहेरही आहेत. काही भागात देवरायांना ‘चर्च फॉंरेस्ट’ असंही म्हटलं जातं.<ref>डॉ.साने हेमा , डॉ. घाटे विनया भवताल द्वैमासिक (दिवाळी विशेषांक) २०१७ </ref>
'''देवराई''' म्हणजे [[देव|देवाच्या]] नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे [[वन]]. इंग्रजी भाषेत याला (Sacred grove) सेक्रेड ग्रोव्ह म्हणतात. हे परंपरेने चालत आलेले सरकारच्या वनखात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले ‘[[अभयारण्य]]‘च होय. अशा वनांना अनेकदा ‘शरणवन’ किंवा ‘अभयस्थान’ असेही म्हटले जाते. देवराया जशा [[भारत]]भर विखुरलेल्या आहेत तशा त्या भारताबाहेरही आहेत. काही भागांत देवरायांना ‘चर्च फॉंरेस्ट’ असेही म्हटले जाते.<ref>डॉ. [[हेमा साने]], डॉ. विनया घाटे, भवताल द्वैमासिक (दिवाळी विशेषांक) २०१७ </ref>

ओळ १५: ओळ १५:
#[[ओरिसा]] : जाहेर
#[[ओरिसा]] : जाहेर
#[[महाराष्ट्र]] : राय,राई
#[[महाराष्ट्र]] : राय,राई
याखेरीज देवरहाटी, देवरकंंड, सिद्दरवनम, ओरांंस अशा वेगवेगळ्या संंज्ञा देवराईसाठी आहेत.<ref>पलांंडे दातार साईली,भवताल दिवाळी विशेषांंक (देवराई) 2017</ref>
याखेरीज देवरहाटी, देवरकंंड, सिद्दरवनम, ओरांंस अशा वेगवेगळ्या संंज्ञा देवराईसाठी आहेत.<ref>साईली पलांंडे दातार, भवताल दिवाळी विशेषांंक (देवराई) 2017</ref>

==देवराईतील देवता==
==देवराईतील देवता==
देवराई म्हणजे एक समृद्ध असा जंगलाचा तुकडा. देवराई ही एक परिपूर्ण परिसंस्था असते असे मानण्यास काही अडचण नाही. या सर्व राज्यावर देखरेख करणारी एक सामर्थ्यशाली देवता देवराईत असते. ही शक्तिमान देवता बहुतेक तांदळा म्हणजे निराकार पाषाणाची असते. ५० ते ६० टक्के या देवता मातृदेवता असतात. काही ठिकाणी एकेकट्या तर काही ठिकाणी समूहाने असतात. डॉ.कोसंबी यांनी नमूद केल्याप्रमाणे या मातृदेवतांचे वैशिष्ट्य म्हणजे या देवतांपैकी कुणालाही पुरुष सहचर नाही. शिरकाई, वरदाई अशी यांची नावे असतात. पुरुष देवता जेथे आहेत तेथे त्यांची नावे चेलोबा, म्हसोबा, बाजीबुवा, भैरोबा अशी दिसून येतात.<ref>डॉ.[[हेमा साने]], डॉ विनया घाटे, भवताल द्वैमासिक (दिवाळी विशेषांक) २०१७ </ref>
देवराई म्हणजे एक समृद्ध असा जंगलाचा तुकडा. देवराई ही एक परिपूर्ण परिसंस्था असते असे मानण्यास काही अडचण नाही. या सर्व राज्यावर देखरेख करणारी एक सामर्थ्यशाली देवता देवराईत असते. ही शक्तिमान देवता बहुतेक तांदळा म्हणजे निराकार पाषाणाची असते. ५० ते ६० टक्के या देवता मातृदेवता असतात. काही ठिकाणी एकेकट्या तर काही ठिकाणी समूहाने असतात. डॉ.कोसंबी यांनी नमूद केल्याप्रमाणे या मातृदेवतांचे वैशिष्ट्य म्हणजे या देवतांपैकी कुणालाही पुरुष सहचर नाही. शिरकाई, वरदाई अशी यांची नावे असतात. पुरुष देवता जेथे आहेत तेथे त्यांची नावे चेलोबा, म्हसोबा, बाजीबुवा, भैरोबा अशी दिसून येतात.<ref>डॉ.[[हेमा साने]], डॉ. विनया घाटे, भवताल द्वैमासिक (दिवाळी विशेषांक) २०१७ </ref>

==देवराईचे पर्यावरणीय महत्त्व==
==देवराईचे पर्यावरणीय महत्त्व==
ओळ २६: ओळ २६:
[[वनस्पतीशास्त्र|वनस्पतिशास्त्र]]च्या विद्यार्थ्यांना देवराई म्हणजे बिनभिंतींचे संग्रहालय होय. या देवरायांत विविध प्रकारची शैवाले, भूछत्रे, कवकवर्गी नेच्यांचे अनेकविध नमुने, आेंबळसारखी अनावृत्तबीजी महावेल, आणि अनेक पुष्पवंत वनस्पतींचा खजिना, त्यात लागवडीखाली असलेल्या पिकांचे वन्य भाईबंद व [[माकड|माकडासारखी]] झाडाच्या फांद्यांवर वाढणारी सुगंधी ऑर्किड्‌स असू शकतात.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/pune/articleshow/32436016.cms</ref>

==देवराईच्या अभ्यासाचे महत्त्व==
[[पुणे|पुण्याच्या]] डेक्कन कॉलेजमधील सुप्रसिद्ध संशोधक डॉ. [[धर्मानंद कोसंबी]] यांनी देवरायांचा पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र, आणि भारतविद्या शास्त्र या दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. डॉ. [[वा.द .वर्तक]], डॉ. [[माधव गाडगीळ]], कैलास मल्होत्रा आदी अभ्यासकांनी विसाव्या शतकाच्या मध्यापासून देवरायांचा विशेष अभ्यास केला आहे. डाॅॅ. [[माधव गाडगीळ]] हे देवरायांचे तज्ज्ञ मानले जातात.

==देवराईच्या अभ्यासाचे महत्व==
डेक्कन कॉलेजमधील सुप्रसिद्ध संशोधक डॉ.धर्मानंद कोसंबी यांनी देवरायांचा पुरातत्वशास्त्र , मानववंशशास्त्र,आणि भारतीयविद्या या दृष्टीकोनातून अभ्यास केला आहे.डॉ.वा.द .वर्तक,डॉ.माधव गाडगीळ, कैलास मल्होत्रा अभ्यासकांनी तीस चाळीस वर्षांपासून देवरायांचा विशेष अभ्यास केला आहे.डाॅॅ. [[माधव गाडगीळ]] हे देवराईच्या अभ्यासाचे प्रणेते मानले जातात.
[[पश्चिम घाट|पश्चिम घाटातील]] देवराया म्हणजे [[जैवविविधता|जैवविविधतेच्या]] दृष्टीने अलीबाबाच्या गुहाच आहेत. इतरत्र नष्टप्राय होत असलेल्या वनस्पतींची ही अखेरची विश्रामगृहे समजली जातात. त्यांचा अभ्यास करताना [[वा.द. वर्तक|डॉ. वर्तकांना]] १९८३ साली देवरायांमधील जैवविविधतेचे महत्त्व उमगले आणि त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]तील देवरायांचे पहिले पथदर्शक सर्वेक्षण केले. <ref name="loksatta.com"/>

==रक्षणाचे प्रयत्न==
==रक्षणाचे प्रयत्न==
देवराईतील ‘अरूपाचे रूप‘ दावणाऱ्या देवतांनी काही शतके तरी निसर्गरक्षणाची जबाबदारी पार पाडली. पण हळूहळू माणसाच्या ओरबाडण्याच्या क्रियेमुळे आसपासचा निसर्ग उजाड होत गेला. कालौघात शहरीकरणाची लाट खेड्यापाड्यापर्यंत पोचली. श्रद्धा संपल्या आणि देवरायांवरही कुऱ्हाड कोसळली. त्यातील कित्येकांना जलसमाधी मिळाली, त्यांचं भवितव्य अंधारले.
देवराईतील ‘अरूपाचे रूप‘ दावणाऱ्या देवतांनी काही शतके तरी निसर्गरक्षणाची जबाबदारी पार पाडली. पण हळूहळू माणसाच्या ओरबाडण्याच्या क्रियेमुळे आसपासचा निसर्ग उजाड होत गेला. कालौघात शहरीकरणाची लाट खेड्यापाड्यापर्यंत पोचली. श्रद्धा संपल्या आणि देवरायांवरही कुऱ्हाड कोसळली. त्यांतील कित्येकांना धरणांमध्ये जलसमाधी मिळाली, त्यांचं भवितव्य अंधारले.

मात्र १९९२ च्या ‘वसुंधरा परिषदे‘ने निसर्ग वाचवा अशी हाक दिली. देवरायांना त्याचे देव पावले. जैव विविधता टिकवण्यासाठी, भारतीय उपखंडात दोन मर्मस्थळे ‘हॉट स्पॉट्‌स‘ म्हणून घोषित झाली. पैकी एक ईशान्य [[हिमालय]] आणि दुसरा [[पश्चिम घाट]]. दोन्हीही पर्जन्यवनांचे प्रदेश आहेत.<ref>http://www.pudhari.com/news/kokan/31789.html</ref>

==देवराई कशी ओळखावी?==
==देवराई कशी ओळखावी?==
१. देवरायांचा उदय, अस्तित्व, संवर्धन याला परंपरा आहे. प्रत्येक देवराईची काही विशिष्ट श्रद्धा, संकेत आणि परंपरा आहेत. हजारो वृक्ष आणि त्याच्या शेकडो प्रजातीनी मिळून देवराया बनल्या आहेत. त्यामुळे देऊळ बांधून त्याच्या आजूबाजूला १०-१२ झाडे लावली की त्याला देवराई म्हणता येणार नाही.देवराईच क्षेत्र केवढे असावे याला बंधन नाही ;मात्र संबंधित गावाशी नाळ त्या क्षेत्राशी जोडलेली असली पाहिजे. त्याचं संवर्धन करण्याचे काम गावकरी करत असले पाहिजेत.

१. देवरायांचा उदय, अस्तित्व, संवर्धन याला परंपरा आहे. प्रत्येक देवराईच्या काही विशिष्ट श्रद्धा, संकेत आणि परंपरा आहेत. हजारो वृक्ष आणि त्याच्या शेकडो प्रजातीनी मिळून देवराया बनल्या आहेत. त्यामुळे देऊळ बांधून त्याच्या आजूबाजूला १०-१२ झाडे लावली की त्याला देवराई म्हणता येणार नाही. .देवराईच क्षेत्र केवढे असावे याला बंधन नाही; मात्र संबंधित गावाशी नाळ त्या क्षेत्राशी जोडलेली असली पाहिजे. त्याचे संवर्धन करण्याचे काम गावकरी करत असले पाहिजेत.

२. वन विभागाने पाश्चात्य झाडे लावून वाढवलेल्या जंगलास देवराई म्हणता येणार नाही.

२. वन विभागाने पाश्चात्य झाडे लावून वाढवलेल्या जंगलास देवराई म्हणता येणार नाही.

३. देवराईतील झाडाची फांदीही तोडत नाहीत. सुकलेल्या झाडाची काटकीही घरी घेऊन जात नाहीत. झाडावरचे किंवा झाडावरून खाली पडलेले फूलही देवाला वाहत नाहीत. देवराईत चप्पल घालून जायचे नाही. असे संकेत पाळले जात असतील तरच त्या जंगलाला “देवराई’’ म्हणायचे.
<ref>राजेंद्र जाधव, भवताल द्वैमासिक (दिवाळी अंक ) २०१७ </ref>

३.देवराईतील झाडाची फांदीही तोडायची नाही. सुकलेले झाडही घरी घेवून जायचेनाही. झाडावरील खाली पडलेले फूल देवाला वहायचे नाही. देवराईत चप्पल घालून जायचे नाही असे संकेत पाळले जात असतील तरच त्या जंगलाला “देवराई’’ म्हणायचे.
<ref>जाधव राजेंद्र ,भवताल द्वैमासिक (दिवाळी अंक ) २०१७ </ref>

==महाराष्ट्रातील देवराया==
==महाराष्ट्रातील देवराया==
ओळ ५०: ओळ ४८:

वैशिष्ट्यपूर्ण देवराया-
वैशिष्ट्यपूर्ण देवराया-

१.भीमसेन कुंवारा (रामटेक, नागपूर) { मुरुड शेंगेची विपुल झाडे

१. भीमसेन कुंवारा (रामटेक, नागपूर) : मुरुड शेंगेची विपुल झाडे

२. माय गवस देवराई (हेवळे, सिंधुदुर्ग) : सीतेच्या अशोकाची विपुल झाडे

२. माय गवस देवराई (हेवळे, सिंधुदुर्ग) : सीतेच्या अशोकाची विपुल झाडे

३.स्मृती देवराई (म्हाळुंगे, कोल्हापूर) : पूर्वजांच्या स्मृतीचे जतन

३. स्मृती देवराई (म्हाळुंगे, कोल्हापूर) : पूर्वजांच्या स्मृतीचे जतन

४.जैन पार्श्वनाथ देवराई (इब्राहीमपूर, चंदगड) : बारमाही जलस्रोतांचे रक्षण

४. जैन पार्श्वनाथ देवराई (इब्राहीमपूर, चंदगड) : बारमाही जलस्रोतांचे रक्षण

५.पेमगिरी महावृक्ष (संगमनेर) : पिंपळाच्या जातीची झाडे

५. पेमगिरी महावृक्ष (संगमनेर) : पिंपळाच्या जातीची झाडे

६.भीमाशंकर देवराई (पुणे) : शेकरू या प्राण्याचे संवर्धन
<ref>पलांडे -दातार साईली, भवताल द्वैमासिक (दिवाळी अंक) २०१७ </ref>
६. भीमाशंकर देवराई (पुणे) : शेकरू या प्राण्याचे संवर्धन
<ref>साईली पलांडे -दातार, भवताल द्वैमासिक (दिवाळी अंक) २०१७ </ref>

ओळ ६७: ओळ ६६:
* कुरवंड्याच्या राईत कडूकवठाचे अनेक वृक्ष आजही टिकून आहेत.
* कुरवंड्याच्या राईत कडूकवठाचे अनेक वृक्ष आजही टिकून आहेत.
* जानवळे-पाटपन्हाळेच्या देवरायांत दासवण, कडू कवठ, अर्जुन, बेल असे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतात.
* जानवळे-पाटपन्हाळेच्या देवरायांत दासवण, कडू कवठ, अर्जुन, बेल असे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतात.
* तामनाळ्याच्या देवराईत रालघुपाचे वृक्ष आहेत.
* तामनाळ्याच्या देवराईत [[धूप|राळधुपाचे]] वृक्ष आहेत.
* कुंडे, मार्लेश्वर, उजगाव, कुळे, मासरंग येथील देवरायांत पाण्याची कुंडे आहेत.
* कुंडे, मार्लेश्वर, उजगाव, कुळे, मासरंग येथील देवरायांत पाण्याची कुंडे आहेत.
* विग्रवली, काटवली, कुरघुंडा, बाशी यांसारख्या देवरायांतही जुन्या विहिरी आणि कुंडेही आहेत. अासपासच्या बाकीच्या ठिकाणी भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात असली, तरी देवराईमधल्या जलस्रोतांना भरपूर पाणी असते, आणि उन्हाळ्याच्या दिवसांत गावाचा पाणीपुरवठा इथल्या विहिरींवरच अवलंबून असतो.

* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडोबा, मोचीमाडजवळ एक वैशिष्ट्यपूर्ण देवराई आहे. येथे एकच झाड आहे आणि ते संरक्षित आहे. दुसरीकडे याच भागातील डोंगोबा कोचऱ्याजवळची
* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडोबा, मोचीमाडजवळ एक वैशिष्ट्यपूर्ण देवराई आहे. येथे एकच झाड आहे आणि ते संरक्षित आहे. दुसरीकडे याच भागातील डोंगोबा कोचऱ्याजवळची
देवराई तब्बल १०० एकरवर पसरली आहे.
देवराई तब्बल १०० एकरांवर पसरली आहे.

==प्राणी==
==प्राणी==

२१:१४, ४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन. इंग्रजी भाषेत याला (Sacred grove) सेक्रेड ग्रोव्ह म्हणतात. हे परंपरेने चालत आलेले सरकारच्या वनखात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले ‘अभयारण्य‘च होय. अशा वनांना अनेकदा ‘शरणवन’ किंवा ‘अभयस्थान’ असेही म्हटले जाते. देवराया जशा भारतभर विखुरलेल्या आहेत तशा त्या भारताबाहेरही आहेत. काही भागांत देवरायांना ‘चर्च फॉंरेस्ट’ असेही म्हटले जाते.[१]

निलेश्वरम येथील देवराई
कन्नूर येथील वडाचे झाड

इतिहास

देवराईचे मूळ वैदिक संस्कृतीपासून सुरू झाल्याचे दिसून येते. देवराई या संकल्पनेचा उगम कसा झाला याविषयी अनेक मतप्रवाह आहेत. या संकल्पनेचा मूळ गाभाच श्रद्धा या नाजूक विषयावर बेतला असल्याने तोच मूळ उद्देश असावा असे अनेक जाणकार मानतात.अश्मयुगीन काळात जेंव्हा शेतीसाठी जंगलतोड सुरू झाली तेंव्हा जंगलाचे महत्त्व देखील लक्षात आले असेल. त्यातून मानवाच्या देवावरील श्रद्धायुक्त भीतीचा योग्य वापर जंगलाच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी केला गेला.[२]

देवराईसाठी इतर भारतीय भाषांमध्ये वापरले जाणारे शब्द:

1. कर्नाटक: देवरकडू, नागबन, नागकुडू
2. राजस्थान: जोगमाया, शरणवन, अभयस्थान
3. बिहार : सरण्य
4. ओरिसा : जाहेर
5. महाराष्ट्र : राय,राई

याखेरीज देवरहाटी, देवरकंंड, सिद्दरवनम, ओरांंस अशा वेगवेगळ्या संंज्ञा देवराईसाठी आहेत.[३]

देवराईतील देवता

देवराई म्हणजे एक समृद्ध असा जंगलाचा तुकडा. देवराई ही एक परिपूर्ण परिसंस्था असते असे मानण्यास काही अडचण नाही. या सर्व राज्यावर देखरेख करणारी एक सामर्थ्यशाली देवता देवराईत असते. ही शक्तिमान देवता बहुतेक तांदळा म्हणजे निराकार पाषाणाची असते. ५० ते ६० टक्के या देवता मातृदेवता असतात. काही ठिकाणी एकेकट्या तर काही ठिकाणी समूहाने असतात. डॉ.कोसंबी यांनी नमूद केल्याप्रमाणे या मातृदेवतांचे वैशिष्ट्य म्हणजे या देवतांपैकी कुणालाही पुरुष सहचर नाही. शिरकाई, वरदाई अशी यांची नावे असतात. पुरुष देवता जेथे आहेत तेथे त्यांची नावे चेलोबा, म्हसोबा, बाजीबुवा, भैरोबा अशी दिसून येतात.[४]

देवराईचे पर्यावरणीय महत्त्व

देवाच्या नावाने राखून ठेवले असल्याने या वनाला एकप्रकारचे संरक्षण कवच असते. भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलांचे हे पुंजके आढळतात. जगभरातही अशी वने आहेतच. ही वने अत्यंत निबिड असतात. देवराईमध्ये उंचउंच वृक्ष, जाडजाड खोडे असलेल्या व कधीकधी जमिनीवर लोळण घेणाऱ्या महालता, पाऊल बुडेल असा पाचोळ्याचा थर, त्यातून धावणारे नानाविध प्राणी, मधूनच दिसणारे विविध पक्षिगण आणि प्राणी आढळू शकतात. देवराईतील पाण्याचा बारमाही झरा आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांसाठी, गुराढोरांसाठी वरदानच असतो. या देवराया अनेक औषधी वनस्पतींचे भांडार असतात.

वनस्पतिशास्त्रच्या विद्यार्थ्यांना देवराई म्हणजे बिनभिंतींचे संग्रहालय होय. या देवरायांत विविध प्रकारची शैवाले, भूछत्रे, कवकवर्गी नेच्यांचे अनेकविध नमुने, आेंबळसारखी अनावृत्तबीजी महावेल, आणि अनेक पुष्पवंत वनस्पतींचा खजिना, त्यात लागवडीखाली असलेल्या पिकांचे वन्य भाईबंद व माकडासारखी झाडाच्या फांद्यांवर वाढणारी सुगंधी ऑर्किड्‌स असू शकतात.[५]

देवराईच्या अभ्यासाचे महत्त्व

पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील सुप्रसिद्ध संशोधक डॉ. धर्मानंद कोसंबी यांनी देवरायांचा पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र, आणि भारतविद्या शास्त्र या दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. डॉ. वा.द .वर्तक, डॉ. माधव गाडगीळ, कैलास मल्होत्रा आदी अभ्यासकांनी विसाव्या शतकाच्या मध्यापासून देवरायांचा विशेष अभ्यास केला आहे. डाॅॅ. माधव गाडगीळ हे देवरायांचे तज्ज्ञ मानले जातात.

पश्चिम घाटातील देवराया म्हणजे जैवविविधतेच्या दृष्टीने अलीबाबाच्या गुहाच आहेत. इतरत्र नष्टप्राय होत असलेल्या वनस्पतींची ही अखेरची विश्रामगृहे समजली जातात. त्यांचा अभ्यास करताना डॉ. वर्तकांना १९८३ साली देवरायांमधील जैवविविधतेचे महत्त्व उमगले आणि त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील देवरायांचे पहिले पथदर्शक सर्वेक्षण केले. [६]

रक्षणाचे प्रयत्न

देवराईतील ‘अरूपाचे रूप‘ दावणाऱ्या देवतांनी काही शतके तरी निसर्गरक्षणाची जबाबदारी पार पाडली. पण हळूहळू माणसाच्या ओरबाडण्याच्या क्रियेमुळे आसपासचा निसर्ग उजाड होत गेला. कालौघात शहरीकरणाची लाट खेड्यापाड्यापर्यंत पोचली. श्रद्धा संपल्या आणि देवरायांवरही कुऱ्हाड कोसळली. त्यांतील कित्येकांना धरणांमध्ये जलसमाधी मिळाली, त्यांचं भवितव्य अंधारले.

मात्र १९९२ च्या ‘वसुंधरा परिषदे‘ने निसर्ग वाचवा अशी हाक दिली. देवरायांना त्याचे देव पावले. जैव विविधता टिकवण्यासाठी, भारतीय उपखंडात दोन मर्मस्थळे ‘हॉट स्पॉट्‌स‘ म्हणून घोषित झाली. पैकी एक ईशान्य हिमालय आणि दुसरा पश्चिम घाट. दोन्हीही पर्जन्यवनांचे प्रदेश आहेत.[७]

देवराई कशी ओळखावी?

१. देवरायांचा उदय, अस्तित्व, संवर्धन याला परंपरा आहे. प्रत्येक देवराईच्या काही विशिष्ट श्रद्धा, संकेत आणि परंपरा आहेत. हजारो वृक्ष आणि त्याच्या शेकडो प्रजातीनी मिळून देवराया बनल्या आहेत. त्यामुळे देऊळ बांधून त्याच्या आजूबाजूला १०-१२ झाडे लावली की त्याला देवराई म्हणता येणार नाही. .देवराईच क्षेत्र केवढे असावे याला बंधन नाही; मात्र संबंधित गावाशी नाळ त्या क्षेत्राशी जोडलेली असली पाहिजे. त्याचे संवर्धन करण्याचे काम गावकरी करत असले पाहिजेत.
२. वन विभागाने पाश्चात्य झाडे लावून वाढवलेल्या जंगलास देवराई म्हणता येणार नाही.
३. देवराईतील झाडाची फांदीही तोडत नाहीत. सुकलेल्या झाडाची काटकीही घरी घेऊन जात नाहीत. झाडावरचे किंवा झाडावरून खाली पडलेले फूलही देवाला वाहत नाहीत. देवराईत चप्पल घालून जायचे नाही. असे संकेत पाळले जात असतील तरच त्या जंगलाला “देवराई’’ म्हणायचे.
[८]

महाराष्ट्रातील देवराया

कोकणच्या रत्‍नागिरी व सिंधुदुर्ग या दोनच जिल्ह्यांत मिळून सुमारे २,५०० हजार देवरायांची नोंद केली गेली आहे. त्यापैकी १६०० सिंधुदुर्गात तर उर्वरित रत्‍नागिरी जिल्ह्यात आहेत. ह्या जिल्ह्यांत सुमारे नऊशे ते हजार वेगवेगळ्या वनस्पती आढळतात. त्यांपैकी शंभराहून जास्त दुर्मीळ आणि लुप्तप्राय वनस्पती यांतील बऱ्याच देवरायांमध्ये आहेत. देवरायांच्या बाबतीत रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग इतके समृद्ध आहेत की जवळ जवळ प्रत्येक गावात एक किंवा दोन देवराया आहेत. देवराई ही बहुधा देवळाभोवती असते. त्यामुळे तिथले अजस्र बुंध्याचे शेकडो वर्षे वयाचेष जुने वृक्ष, महाकाय वेली टिकून आहेत. तिथे आनंदाने विहरणारे माडगरुडासारखे पक्षी हे देवरायांचे खरे वैभव होय.[९] बहुतेक देवरायांमध्ये गुळवेलची आणि खूप विस्तारलेल्या बेहड्याची झाडे आढळतात. कॅन्सर सारख्या दुर्धर रोगावरच्या औषधांत वरदान असलेल्या ‘अमृता’सारख्या वनस्पती काही देवरायांमध्ये दिसतात. कॅन्सर सारख्या दुर्धर रोगावरच्या औषधात वरदान असलेल्या अमृता सारख्या वनस्पती काही देवराहाट्यामध्ये दिसतात. आजीबाईंच्या बटव्यातील अनंतमूळ, काडेचिरायत, अशा नेहमीच्या वापरातील औषधी झाडपाला आणि सीतेचा अशोक वृक्ष देवरायांमध्ये खात्रीने सापडतो. अनेक देवरायांमध्ये जुने वटवृक्ष, हजारो फुले ओघळवणारे बकुळीचे पुरातन वृक्ष, तसेच गच्च केवड्याची बने आहेत. बहुतेक देवरायांमध्ये वड, बेल, पिंपळ, आपटा, दासवण, काजरा, कडूकवठ, अशोक, चांदफळ हे वृक्ष आहेत.

महाराष्ट्रातही सुमारे तीन हजार देवराया आहेत. काळूबाई, रानजाई, भैरोबा, म्हसोबा, सोनजाई, आंबेश्वर अशा अनेक देवतांच्या नावाने त्या त्या देवतांची जंगलातील मंदिरे व त्या भोवतालचा परिसर तेथील आदिवासी, गांवकरीच जतन करीत असतात. महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम घाटात अनेक देवराया आढळतात. पुणे जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी या तालुक्यात देवरायांची संख्या अधिक आहे. या देवरांयामध्ये झाडावरचे फूलही निसर्गतःच खाली पडल्याशिवाय देवाला वाहिले जात नाही. देवरायांच्या परिसरात वृक्षतोड, चराई यांनाही बंदी असते. देवराया या जंगलातील आदिवासींनीच जतन केलेले संरक्षित क्षेत्र असल्याने विविध प्रकारचे वनस्पती, प्राणी, कीटक तेथे आश्रय घेतात. कित्येक दुर्मीळ सजीव केवळ देवरायांच्या परिसरात आढळतात. वनस्पतींची येथे कोणतीही हानी होत नसल्याने वनस्पतींच्या जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यातही शेकडो कीटक, कवक, गांडूळ यांच्या जाती तेथे सापडतात. कर्नाटकातील काही देवरायांमध्ये पामच्या दुर्मीळ जाती आढळतात. देवरायांमुळे मातीची सुपीकता तर वाढतेच, पण जमिनीखालच्या पाण्याचेही संवर्धन होत असते.

वैशिष्ट्यपूर्ण देवराया-

१. भीमसेन कुंवारा (रामटेक, नागपूर) : मुरुड शेंगेची विपुल झाडे

२. माय गवस देवराई (हेवळे, सिंधुदुर्ग) : सीतेच्या अशोकाची विपुल झाडे

३. स्मृती देवराई (म्हाळुंगे, कोल्हापूर) : पूर्वजांच्या स्मृतीचे जतन

४. जैन पार्श्वनाथ देवराई (इब्राहीमपूर, चंदगड) : बारमाही जलस्रोतांचे रक्षण

५. पेमगिरी महावृक्ष (संगमनेर) : पिंपळाच्या जातीची झाडे

६. भीमाशंकर देवराई (पुणे) : शेकरू या प्राण्याचे संवर्धन
[१०]

कोकणातील काही देवराया-

• कुंडीची देवराई : या देवराईत तीस फूट घेराचा भला मोठा दासवनाचा वृक्ष आहे.
• कुरवंड्याच्या राईत कडूकवठाचे अनेक वृक्ष आजही टिकून आहेत.
• जानवळे-पाटपन्हाळेच्या देवरायांत दासवण, कडू कवठ, अर्जुन, बेल असे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतात.
• तामनाळ्याच्या देवराईत राळधुपाचे वृक्ष आहेत.
• कुंडे, मार्लेश्वर, उजगाव, कुळे, मासरंग येथील देवरायांत पाण्याची कुंडे आहेत.
• विग्रवली, काटवली, कुरघुंडा, बाशी यांसारख्या देवरायांतही जुन्या विहिरी आणि कुंडेही आहेत. अासपासच्या बाकीच्या ठिकाणी भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात असली, तरी देवराईमधल्या जलस्रोतांना भरपूर पाणी असते, आणि उन्हाळ्याच्या दिवसांत गावाचा पाणीपुरवठा इथल्या विहिरींवरच अवलंबून असतो.
• सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडोबा, मोचीमाडजवळ एक वैशिष्ट्यपूर्ण देवराई आहे. येथे एकच झाड आहे आणि ते संरक्षित आहे. दुसरीकडे याच भागातील डोंगोबा कोचऱ्याजवळची

देवराई तब्बल १०० एकरांवर पसरली आहे.

प्राणी

कोकणाचे वैभव असणारे माडगरुडासारखे पक्षी, भेकर, पिसोरी, ससे, मोर , कोल्हे असे पूर्वी सर्वत्र आढळणारे वन्यजीव देवरायांच्या आश्रयाने राहतात.

काही प्रसिद्ध देवराया

साहित्य व माध्यमांंमधे

• 'देवराई' या विषयावर उमाकांत चव्हाण यांचे एक छोटे पुस्तक आहे.
• याच विषयावर 'देवराई' नावाचा सुमित्रा भावे यांनी काढलेला एक पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट आहे.अतुल कुलकर्णी यांंची यात महत्वाची भूमिका आहे.

संकेतस्थळ

महाराष्ट्रातील देवराया

हेही पाहा

संदर्भ

1. ^ डॉ. हेमा साने, डॉ. विनया घाटे, भवताल द्वैमासिक (दिवाळी विशेषांक) २०१७
2. ^ दीपक जाधव, भवताल द्वैमासिक (दिवाळी विशेषांक (२०१७)
3. ^ साईली पलांंडे दातार, भवताल दिवाळी विशेषांंक (देवराई) 2017
4. ^ डॉ.हेमा साने, डॉ. विनया घाटे, भवताल द्वैमासिक (दिवाळी विशेषांक) २०१७
5. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/pune/articleshow/32436016.cms
6. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; loksatta.com नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
7. ^ http://www.pudhari.com/news/kokan/31789.html
8. ^ राजेंद्र जाधव, भवताल द्वैमासिक (दिवाळी अंक ) २०१७
9. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/edit/ravivar-mata/biodiversity-kokan/articleshow/52604351.cms
10. ^ साईली पलांडे -दातार, भवताल द्वैमासिक (दिवाळी अंक) २०१७