"साँगक्रन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ८: ओळ ८:


अमेरिकेतल्या [[शिकागो]]त असलेले थाई उपासक थाई पद्धतीप्रमाणे हा नववर्षाचा उत्सव साजरा करतात.
अमेरिकेतल्या [[शिकागो]]त असलेले थाई उपासक थाई पद्धतीप्रमाणे हा नववर्षाचा उत्सव साजरा करतात.

==हे सुद्धा पहा==
* [[बौद्ध सणांची यादी]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}



{{बौद्ध सण}}
{{बौद्ध सण}}

१४:०७, ४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

साँगक्रन उत्सव हा थाई नववर्ष व बौद्ध सण असून थायलंड, म्यानमार, लाओस व इतर बौद्ध राष्ट्रांत साजरा केला जातो. हा सण एप्रिल महिन्यात असतो. थायलंड मध्ये एप्रिल महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात.

बौद्ध उपासक आणि उपासिका सकाळीच उठून नजिकच्या विहारात (बौद्ध मंदिरात) जातात. तेथे विहाराबाहेर हातात भिक्षापात्र घेऊन पुष्कळ भिक्खू-भिक्खुणी एका ओळीत उभ्या राहून चालत असतात. बौद्ध उपासक-उपासिका त्यांच्या समोर उभ्या राहून त्यांच्या या भिक्षापात्रात अन्न वाढतात. त्यानंतर मोठ्या शहरातील व वटधम्मराम विहारातील लोक पंचशील ग्रहण करतात, धम्म जाणतात व विहारास पैसे अर्पण करतात. लोकांना धम्मविषयी चर्चा व शिकवण ही भिक्खूंकडून दिली जाते. ती धम्मशिकवण दैनंदिन जीवनाशी निगडीत असते.

दुपारनंतर बुद्धमूर्ती व भिक्खू यांच्यावर उपासक गुलाब पाण्याचा वर्षाव करतात. आदर व्यक्त करण्याचा हा एक संकेत होय. ह्या बदल्यात भिक्खू त्यांना आशीर्वाद देतात. या दिवशी मुलेही पालकांप्रती आदर व्यक्त करतांना त्यांना छोटी भेट वस्तू देतात आणि प्रेम व आदरप दाखवण्यासाठी त्यांच्या अंगावर गुलाब पाणी शिंपडतात. पालक मुलांना आशीर्वाद देतात.

थायलंडमध्ये साँगक्रन दिनाच्या अगोदरच्या दिवशी थाई लोक त्यांची घरे, कपडे व गावातील रस्ते स्वच्छ करतात व अन्न तयार करून नंतर त्याचे भिक्खूंना दान करतात.

अमेरिकेतल्या शिकागोत असलेले थाई उपासक थाई पद्धतीप्रमाणे हा नववर्षाचा उत्सव साजरा करतात.

हे सुद्धा पहा

संदर्भ