"विद्यार्थी दिन (महाराष्ट्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९: ओळ ९:
== हे सुद्धा पहा ==
== हे सुद्धा पहा ==
* [[ज्ञान दिवस (महाराष्ट्र)]]
* [[ज्ञान दिवस (महाराष्ट्र)]]
* [[संविधान दिन (भारत)]]


{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
[[वर्ग:सण आणि उत्सव]]

[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील विशेष दिवस]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील सण आणि उत्सव]]

१५:०९, २९ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळाप्रवेश दिन - ७ नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्रभर साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.[१][२][३]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंग हायस्कूल राजवाडा चौक, जि. सातारा येथे ७ नोव्हेंबर १९०० रोजी शाळेत प्रवेश घेतला होता. हा दिवस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने २८ ऑक्टोबर २०१७ रोजी घेतला. बाबासाहेबांनी शाळेत प्रवेश घेतला, त्या वेळी त्यांचे नाव ‘भिवा’ असे होते. या शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर बाल ‘भिवा’ची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. डॉ. बाबासाहेबांच्या शाळा प्रवेशदिनाचे महत्व आणि तो विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यामागील कारणमिमांसा यासंदर्भातील शासकीय आदेशात स्पष्ट करताना म्हटले आहे, की विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून आदर्श विद्यार्थी निर्माण होणे ही काळाजी गरज आहे. त्यासाठी शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमाची जाण सर्व विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी दरवर्षी ७ नोव्हेंबर हा ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यातील सर्व शाळांमध्ये आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.[४][५]

या दिनाच्या निर्णयासंदर्भात शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात म्हणाल्या, “डॉ. बाबासाहेबांच्या शाळा प्रवेशाने ते सुशिक्षित आणि प्रज्ञावंत, तर झालेच शिवाय ते दलित, वंचितांचे उद्धारकर्तेही झाले. संविधानाचे शिल्पकार ठरले. त्यामुळे देशात समता, बंधूता, न्याय ही मुल्ये रुजली. म्हणून डॉ. आंबेडकरांचा शाळा प्रवेशदिन ही अत्यंत महत्वाची आणि इतिहासाला कूस बदलायला लावणारी घटना ठरते. ते आजीवन विद्यार्थी होते. त्यांनी आपला विद्यार्थी व्यासंग शेवटपर्यंत जपला.”

संदर्भ

हे सुद्धा पहा