"विद्यार्थी दिन (महाराष्ट्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळाप्रवेश दिन - ७ नोव्हेंबर हा '''व...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१४:३७, २९ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळाप्रवेश दिन - ७ नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्रभर साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने दि. २८ ऑक्टोबर २०१७ रोजी घेतला आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंग हायस्कूल राजवाडा चौक, जि. सातारा येथे ७ नोव्हेंबर १९०० रोजी शाळेत प्रवेश घेतला होता. हा दिवस आता शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने शुक्रवारी घेतला. बाबासाहेबांनी शाळेत प्रवेश घेतला, त्या वेळी त्यांचे नाव ‘भिवा’ असे होते. या शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर आजही बाल ‘भिवा’ची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमाची जाण सर्व विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी ७ नोव्हेंबर हा ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सर्व शाळांमध्ये डॉ.आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.