"बावीस प्रतिज्ञा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २६: ओळ २६:

वरील २२ प्रतिज्ञा या [[नवयान]]ी बौद्धांच्या प्रतिज्ञा आहेत ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्म स्वीकारताना आपल्या लक्षावधी अनुयायांना दिल्या होत्या. या प्रतिज्ञा मानवता व बौद्ध धर्मात महत्वाच्या आहेत. सामान्यतः नवयानी बौद्ध या प्रतिज्ञा पाळतात. या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे सार असून [[पंचशील]], [[अंष्टागिक मार्ग]] व [[दहा पारमिता]] अनुसरण्याच्या आहेत.

या बावीस अटी बाबासाहेबांनी केलेल्या आज्ञा नाहित. बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकिद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत.

१७:३६, १५ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध अनुयायांना दिलेल्या २२ प्रतिज्ञांचा दीक्षाभूमीवरील स्तंभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवबौद्धांना दिलेल्या बावीस प्रतिज्ञा खालिलप्रमाणे आहेत.[१] :-

  1. मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  2. मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  3. मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  4. देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
  5. गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो.
  6. मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
  7. मी बौद्धधम्माच्या विरुद्ध व विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
  8. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
  9. सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
  10. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्‍न करीन.
  11. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
  12. तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
  13. मी सर्व प्राणिमात्रांवर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
  14. मी चोरी करणार नाही.
  15. मी व्यभिचार करणार नाही.
  16. मी खोटे बोलणार नाही.
  17. मी दारू पिणार नाही.
  18. ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
  19. माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणार्‍या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणार्‍या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
  20. तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
  21. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
  22. इतःपर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.

वरील २२ प्रतिज्ञा या नवयानी बौद्धांच्या प्रतिज्ञा आहेत ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्म स्वीकारताना आपल्या लक्षावधी अनुयायांना दिल्या होत्या. या प्रतिज्ञा मानवता व बौद्ध धर्मात महत्वाच्या आहेत. सामान्यतः नवयानी बौद्ध या प्रतिज्ञा पाळतात. या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे सार असून पंचशील, अंष्टागिक मार्गदहा पारमिता अनुसरण्याच्या आहेत.

या बावीस अटी बाबासाहेबांनी केलेल्या आज्ञा नाहित. बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकिद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत.

  1. ^ १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी दिलेले भाषण