"डॉ. आंबेडकर हायस्कूल (हंगेरी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''डॉ. आंबेडकर हायस्कूल''' ही हंगेरी देशातील सांजाकोजा शहरातील एक...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१६:४८, १ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

डॉ. आंबेडकर हायस्कूल ही हंगेरी देशातील सांजाकोजा शहरातील एक शाळा आहे. जिप्सी समाजाच्या नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रभावित होऊन या शाळेची स्थापना इ.स. २००७ मध्ये केली.

विद्यालयात बाबासाहेबांची पुस्तके असून त्यांचे विविध चित्रे व विचारही लावण्यात आलेले आहेत. येथे विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे पाठही शिकवले जातात. त्यामध्ये बाबासाहेबांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मिती अमूल्य योगदान या बाबी शिकवल्या जातात. हंगेरी देशाचे शिक्षणमंत्री पालकोवीक्स यांनीही या शाळेला भेट दिलेली आहे.

इतिहास

हंगेरीतील जिप्सी समूहाय हा दलितांप्रमाणे कनिष्ठ मानला गेलेला असून त्यांना शिक्षणापासून व इतर सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. डॉ. आंबेडकरांनी आपल्या दलित-अस्पृश्य समूदायाच्या उत्थानासाठी केलेला संघर्ष हा जिप्सी लोकांना प्रेरक ठरला व त्यांनी जिप्सी लोकांत बाबासाहेबांचे संघर्ष सांगण्याचे व विचार रूजविण्याचे काम केले तसेच बाबासाहेबांचा नवयान बौद्ध धम्माचाही स्वीकार केला. व यातूनच जिप्सी मुलांसाठी येथे उत्कृष्ठ शाळा सुरू करण्यात आली.

संदर्भ