"रांगोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
चित्रे वरती जोडले
ओळ १: ओळ १:
{{काम चालू}}
{{काम चालू}}


[[File:दीपोत्सव आणि रांगोळी.jpg|thumb|right|दीपोत्सव आणि रांगोळी]]
[[File:रांगोळी.jpg|thumb|right|रांगोळी]]
==प्रस्तावना==
==प्रस्तावना==
संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीची उद्देश मानले जातात. रांगोळी म्हणजे रंगांच्या सहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला फार महत्व आहे.रांगोळी काढणे ही एक कला आहे आणि तिचा उगम धर्माच्या अनुबंधानेच झाला आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड सातवा </ref>
संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीची उद्देश मानले जातात. रांगोळी म्हणजे रंगांच्या सहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला फार महत्व आहे.रांगोळी काढणे ही एक कला आहे आणि तिचा उगम धर्माच्या अनुबंधानेच झाला आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड सातवा</ref>


==प्राचीनत्व==
==प्राचीनत्व==

१५:०९, २६ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती


दीपोत्सव आणि रांगोळी
रांगोळी

प्रस्तावना

संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीची उद्देश मानले जातात. रांगोळी म्हणजे रंगांच्या सहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला फार महत्व आहे.रांगोळी काढणे ही एक कला आहे आणि तिचा उगम धर्माच्या अनुबंधानेच झाला आहे.[१]

प्राचीनत्व

रांगोळीचा उल्लेख रामायण, महाभारत तसेच वेदांसोबत अनेक ग्रंथांमध्येही आढळतो. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी वात्सायनाने लिहिलेल्या कामसूत्र या ग्रंथामध्ये स्त्रियांना अवगत असाव्या अशा चौसष्ट कलांमध्ये रांगोळी या कलेचा सामावेश होतो. इसवी सनाच्या तिस-या शतकात धान्याचा उपयोग करून रांगोळी काढीत.सरस्वतीच्या मंदिरात तसेच कामदेव व शिवलिंग यांच्या पूजेसाठी विविधरंगी फ़ुलांनीही आकृतिबंधात्मक रांगोळी काढत.वरांग चरित या ग्रंथात (सातवे शतक) पंचरंगी चूर्ण ,धान्ये व फुले यांनी रांगोळीचे चित्रविचित्र आकृतिबंध तयार करीत असल्याचे उल्लेख सांगितले आहे.नलचम्पू ग्रंथात (दहावे शतक) उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळी काढीत असल्याचे उल्लेख आहेत. गद्यचिंतामणी ,देशीनाममाला,मानसोल्लास या ग्रंथातही रांगोळीचे संदर्भ सापडतात.[२]

उद्देश व प्रतीके

सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश होत.रांगोळीच्या ज्या आकृत्या काढतात त्या प्रतीकात्मक असतात.सरळ रेषेपेक्षा वक्र रेषा ही सौंदर्याची विशेष अनुभूती घडविते.रांगोळीचे त्रिदल हे त्रिभुवन,तीन देव,तीन अवस्था आणि त्रिकाळ यांचे म्हणजेच पर्यायाने त्रिधा विभक्त अशा विश्वतत्वाचे प्रतीक असते.शंख,स्वस्तिक,चंद्र,सूर्य ही आणखी प्रतीके होत.साखळी ही नागयुग्माचे,अष्टदल हे अष्टदिशातत्मक विश्वाचे, कमल हे लक्ष्मीचे व प्रजननशक्तीचे प्रतीक असून वैष्णव उपासनेत त्याला विशेष महत्व आहे.याशिवाय एकलिंगतोभद्र,अष्टलिंगतोभद्र,सर्वतोभद्र अशाही रांगोळ्या धर्मकृत्यात काढल्या जातात.[३]

प्रकार

रांगोळीचे आकृतीप्रधान आणि वल्लरीप्रधान असे दोन भेद मानले जातात. आकृतीप्रधान प्रकारात रेषा, वर्तुळ यांचा समावेश असतो तर वल्लरीप्रधान मध्ये वेळी, पाने, फुले यांचे आकार असतात. सध्याच्या काळात अनेक धार्मिक, सामाजिक व पर्यावरण विषयकही रांगोळ्या काढल्या जातात. पूर्वी सकाळी सडासंमार्जन केल्यावर अंगणात रांगोळी काढली जायची.

महत्त्व

प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे.चैत्र महिन्यात काढले जाणारे चैत्रांगण ही एक विशेष रांगोळी आहे. पारशी धर्मात रांगोळी ही अशुभ निवारक व शुभप्रद मानली गेली आहे. देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशी जवळ रांगोळी काढली जाते. साधारणता रांगोळीमध्ये स्वस्तिक, गोपद्म, शंख, चक्र, गदा, कमळाचे फुल, बिल्वपत्र, लक्ष्मीची पाऊले, सुर्य देवेतेचे प्रतिक, श्री, कासव इ. मांगल्यसुचक व पवित्र रांगोळ्या काढल्या जातात.एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती आणि पुढेही रांगोळी काढतात.दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून त्या विविध रंगांनी भरतात.

रांगोळी भुकटी तयार करण्याची पद्धत

डोलोमाइट नावाचा एक प्रकारचा दगड प्रथम भट्टीत भाजून मग त्यास बारीक कुटुन व त्यास वस्त्रगाळ करून वा चाळुन काढतात.ती बनते रांगोळी.त्यास वेगवेगळ्या प्रकारचे रंग देउन रंगीत रांगोळी तयार करतात.संगमरवराच्या फॅक्टरीतुन ते कापत असतांना जी भुकटी तयार होते तीपण रांगोळी म्हणुन आजकाल वापरतात.

भारताच्या विविध प्रांतात रांगोळीस काय म्हणतात

साहित्य

रांगोळीसाठी रंगीत तांदूळ, कोरडे पीठ, रंगीत वाळू, फुलांच्या पाकळ्या, हळद, कुंकू, गुलाल, यांचाही वापर केला जातो. तबकात पाण्यावर तेलाचा तरंग देऊन त्यावर वरील साहित्य वापरूनही रांगोळी काढली जाते.सध्याच्या काळात शहरांमध्ये गेरूच्या सहाय्याने अगोदर अंगण रंगवून किंवा फरशी बसवली असेल तर त्यावर बाजारात मिळणाऱ्या छापे किंवा कोन यांच्या सहाय्याने रांगोळ्या काढल्या जातात.

धर्मश्रद्धा आणि विश्वास

उदाहरनच घ्यावयाचे झाले तर तामिळनाडू मधील दंतकथा अशी आहे- थीरुमल देवाची अंदाल हिने खूप भक्ती केली त्या भक्तीने तो तिला प्रसन्न झाला आणि त्याने तिच्याशी मार्गशीर्ष महिन्यात लग्न केले ही बाब स्मंरणात घेऊन या महिन्यात तेथील अविवाहित मुली पहाटे पूर्वी उठून थीरुमल देवाचे स्वागतासाठी रांगोळी काढतात. असे पुराणकालीन कितीतरी दाखले देता येतील.[ संदर्भ हवा ]

चित्रदालन

संदर्भ व नोंदी

१. भारतीय संस्कृती कोश खंड सातवा

२. भारतीय संस्कृती कोश खंड सातवा

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड सातवा
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड सातवा
  3. ^ भारतीय संस्कृती कोश खंड सातवा