"चैत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Cave 26, Ajanta.jpg|right|thumb|300px|अजिंठा लेणी क्र.२६ चा चैत्य हॉल]]
[[चित्र:Cave 26, Ajanta.jpg|right|thumb|300px|अजिंठा लेणी क्र.२६ चा चैत्य हॉल]]
'''चैत्य''' किंवा '''चैत्यगृह''' हे एक बौद्ध प्रार्थनास्थळ असून येथ प्रवित्र बौद्ध अवशेष असलेल्या समाधी असतात. हे [[स्तूप]]ाप्रमाणे असते जिथे [[विपस्सना]] सुद्धा शिकवली जाते. चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. चिता किंवा चिती या [[संस्कृत]] शब्दापासून चैत्य हा शब्द बनला आहे.
'''चैत्य''' किंवा '''चैत्यगृह''' हे [[बौद्ध]] धर्मियांचे [[प्रार्थनास्थळ]] आहे. येथे प्रवित्र बौद्ध अवशेष असलेल्या समाधी असतात. हे [[स्तूप]]ाप्रमाणे असते जिथे [[विपस्सना]] सुद्धा शिकवली जाते. चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. चैत्यगृहे ही चापाकार आकाराची असून त्यांच्या गोलाकार भागात अंडाकृती आकाराचा [[स्तूप]] कोरलेला असतो. वरती गजपृष्ठाकृती छप्पर कोरलेले असते. चिता किंवा चिती या [[संस्कृत]] शब्दापासून चैत्य हा शब्द बनला आहे.


==इतिहास==
==इतिहास==

२१:०१, २० सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

अजिंठा लेणी क्र.२६ चा चैत्य हॉल

चैत्य किंवा चैत्यगृह हे बौद्ध धर्मियांचे प्रार्थनास्थळ आहे. येथे प्रवित्र बौद्ध अवशेष असलेल्या समाधी असतात. हे स्तूपाप्रमाणे असते जिथे विपस्सना सुद्धा शिकवली जाते. चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. चैत्यगृहे ही चापाकार आकाराची असून त्यांच्या गोलाकार भागात अंडाकृती आकाराचा स्तूप कोरलेला असतो. वरती गजपृष्ठाकृती छप्पर कोरलेले असते. चिता किंवा चिती या संस्कृत शब्दापासून चैत्य हा शब्द बनला आहे.

इतिहास

बुद्ध व वैदिक काळात सत्पुरुषांचे धन केल्यानंतर त्यांची अस्थी, रक्षा, अवशेष पुरून ठेवीत व त्यावर वेडी किंवा चबुतरा बांधीत. हे स्मारक म्हणजे चैत्य हौय. जैन साहित्यात ज्या पार बांधलेल्या वृक्षाखाली बसले असता तीर्थकरांना केवळ ज्ञान प्राप्त झाले त्या, वृक्षांना चैत्यवृक्ष म्हणतात.[१]


चैत्य हे ठराविक उंचीवर व ठराविक दिशेवरच असतात. जेव्हा सूर्याचे किरण स्तूपावर पडलेले दिसते तेव्हा उजडायला लागते. बोगद्यासारख्या खोदलेल्या चैत्यगृहामध्ये अंधार नसतो, बुद्धांसमोर विपस्सनेसाठी बसल्यावर प्रकाश डोळ्यांवर नव्हे तर पाठीमागून पडतो. कारण साधनेमध्ये बाधा येऊ नये याची पुरेपूर काळजी चात्यात घेण्यात आलेली दिसते.

चैत्यगृहात अनेक स्तंभ दिसतात. विशिष्ट पद्धतीने स्तूपाभोवती फिरणारे एवढे सारे स्तंभ आधारासाठी नसून ते प्रदक्षिणा मार्ग वेगळा करण्यासाठी असतात. बुद्धांना अभिवादन त्यांना प्रदक्षिणा घालूनच पूर्ण व्हायची, तिच परंपरा चैत्यगृहात प्रदक्षिणापथ कायम ठेवून जोपासली गेली आहे.

चित्रदालन

वेरूळची लेणी क्र. १० मधील चैत्यगृह
अजिंठा लेण्यातील चैत्यगृह

संदर्भ

  1. ^ जोशी, सु.ह. – महाराष्ट्रातील लेणी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत