"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७४: ओळ ७४:


[[इ.स. १९५४]] मध्ये भारताने चीनसंदर्भात तयार केलेले [[पंचशील धोरण]] संसदेमध्ये चर्चेसाठी आले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी फार उत्तम प्रकारे त्यावर टीका केली होती. ते असे म्हणतात, “पंचशील धोरण हे बौद्ध धर्माचा अविभाज्य घटक आहे. पण या धोरणाचा चीनकडून अवलंब होताना दिसत नाही. चीन जर [[तिबेट]]ी लोकांवर अन्याय करत असेल तर त्यांना अशा प्रकारचे पंचशील धोरण करण्याचा काय अधिकार आहे असा सवाल त्यांनी केला.”
[[इ.स. १९५४]] मध्ये भारताने चीनसंदर्भात तयार केलेले [[पंचशील धोरण]] संसदेमध्ये चर्चेसाठी आले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी फार उत्तम प्रकारे त्यावर टीका केली होती. ते असे म्हणतात, “पंचशील धोरण हे बौद्ध धर्माचा अविभाज्य घटक आहे. पण या धोरणाचा चीनकडून अवलंब होताना दिसत नाही. चीन जर [[तिबेट]]ी लोकांवर अन्याय करत असेल तर त्यांना अशा प्रकारचे पंचशील धोरण करण्याचा काय अधिकार आहे असा सवाल त्यांनी केला.”

== व्यक्तींवरील विधाने ==
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रसिद्ध व्यक्तींवर केलेली विधाने

===स्वामी विवेकानंद ===
* “अलिकडच्या शतकात भारताने निर्माण केलेला सर्वात मोठा माणूस म्हणजे [[स्वामी विवेकानंद]] आहेत, गांधी नव्हे.”

(पंडीत नेहरूंचे पी.ए. [[एम.ओ. मथाई]] हे बाबासाहेबांच्या निमंत्रणांवरून ते बाबासाहेबांकडे आले, गप्पा रंगल्या, गप्पांच्या ओघात बाबासाहेबांनी विवेकानंद संबंधी वरील उद्गार काढले होते, त्यावर मथाई काहिसे चकित झाले होते. हि चर्चा झाली तेव्हा गांधी हयात नव्हते.)


== प्रेरणादायी सुविचार ==
== प्रेरणादायी सुविचार ==

२२:२६, १६ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे क्रांतिकारी व मानवातावादी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडलेले आहेत.

राजकीय विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार म्हणजे स्वराज्य, राष्ट्रवाद, लोकशाही, मूलभूत हक्क, अल्पसंख्यकाचे हितरक्षण, समाजवाद, साम्यवाद, बौद्ध धर्म इत्यादी संबंधीची विचार होते. डॉ. आंबेडकरांनी भारतातील विविध राजकीय प्रश्नासंबंधी आणि राजकीय तत्त्वज्ञानासंबंधीची मते आपल्या अनेक लेखातून, पुस्तकातून आणि भाषणांतून मांडली आहेत. तेच बाबासाहेबांचे राजकीय विचार आहेत. डॉ. आंबेडकरांचे काही राजकीय विचार हे त्यांनी घटना परिषदेच्या अधिवेशात केलेल्या भाषणातूनही व्यक्त झालेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांचा तत्कालीन राजकारणावर तसेच स्वातंत्र्याच्या राजकारणावर प्रभाव पडला आहे.

स्वराज्यासंबंधी विचार

ब्रिटिश काळात सर्वच भारतीय राजकीय नेते आणि विचारवंताप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्वराज्यासंबंधीचे विचार मांडले आहेत. परंतु ते विचार इतरांपेक्षा वेगळे आहेत.

राष्ट्रवाद

मूलभूत हक्कांसंबंधी विचार

लोकशाहीसंबंधी विचार

समाजवादासंबंधी विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजवादाचा पुरस्कार केला होता. परंतु त्यांना रशिया, चीन व इतर साम्यवादी देशातील एकपक्ष पद्धतीचा समाजवाद मान्य नव्हता. देशातील समाजवादी व्यवस्था, राजकीय तसेच आर्थिक क्षेत्रात लोकशाहीचा स्वीकार करून आणि उद्योगधंद्यावर सरकारची मालकी प्रस्थापित करून समाजवादी व्यवस्था प्रस्थापित होऊ शकते. असे त्यांना वाटत होते.

साम्यवादासंबंधी विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही समाजवादाचा पुरस्कार केला होता. त्यामुळे त्यांना मार्क्सवाद किंवा साम्यवादाचा विचार विचार अपूर्ण आणि सदोष वाटत होता. डॉ. आंबेडकरांनी साम्यवादावर आणि रशियातील साम्यवाद पद्धतीवर जोरदार टीका केली होती. साम्यवादातील दोष दाखविताना त्यांनी म्हटले होते की, १) साम्यवादात केवल आर्थिक किंवा भौतिक जीवनाला महत्त्व दिले जाते. २) साम्यवाद धर्मविरोधी आहे. ३) साम्यवाद स्वातंत्र्यविरोधी आहे. साम्यवाद लोकशाहीच्यै विरोधात आहे. ४) साम्यवादी राष्ट्रांनीसुद्धा साम्राज्यवादी धोरण स्वीकारुन अनेक लहान-लहान राष्ट्रांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवले आहे.

बौद्ध धर्म

अल्पसंख्यकाच्या हिताचे रक्षण

अल्पसंख्याकाच्या हिताचे रक्षण करणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा व कार्याचा केंद्रबिंदू होता. भारतीय समाजजीवनात अल्पसंख्याक लोकांवर होणारे अन्याय लक्षात घेऊन डॉ. आंबेडकरांनी सुरूवातीपासून अल्पसंख्याकाच्या हिताचे रक्षण झाले पाहिजे असा विचार मांडला व त्यासाठीच सतत प्रयत्न केले.

इ.स. १९३१-३२ मध्ये झालेल्या गोलमेज परिषदांमध्येही डॉ. आंबेडकरांनी अल्पसंख्याकाच्या रक्षणाचीच भूमिका घेतली होती आणि मुसलमानांप्रमाणेच अस्पृश्यांनाही स्वतंत्र्य मतदारसंघ असावेत अशी मागणी केली होती. भारताची राज्यघटना तयार करणाऱ्या राज्यघटना समितीत आणि राज्यघटना मसुदा समितीतसुद्धा स्पृश्य हिंदूचे बहुमत होते हे लक्षात घेऊन त्यांनी अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मागण्या केल्या होत्या, त्यापैकी –

  1. अस्पृश्यांना अल्पसंख्यक म्हणून घोषिक करावे.
  2. अस्पृश्यांच्या हिताचे रक्षणासाठी स्वतंत्र्य यंत्रणा स्थापन करावी.
  3. अस्पृश्यांना घटनात्मक तरतूद करून काही सवलती द्याव्यात आणि अशी घटनात्मक तरतूद केवळ बहुमताने बदलता येणार नाही अशी अशी व्यवस्था करावी.

अस्पृश्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या अद्देशानेच भारताच्या राज्यघटनेतील कलम ३३० ते ३४२ यात अस्पृश्यांसाठी आणि मागासलेल्या जाती-जमातीसाठी खास सवलती मान्य केल्या आहेत.

सामाजिक विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकदंर कार्यात सामाजिक सुधारणांना विशेषतः दलितोद्धाराच्या चळवळीला विशेष महत्त्व आहे. एका अस्पृश्य कुटुंबात जन्मल्याने त्यांना अस्पृश्यतेचे अनेक वाईट अनुभव आले होते. म्हणूनच त्यांनी अस्पृश्यता नष्ट करणे आणि अस्पृश्यता नष्ट करणे आणि अस्पृश्यांचा सर्वांगीण विकास करणे हे आपल्या जीवनाचे पहिले ध्येय ठेवले होते.

समाजसुधारणाविषयक विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समाजसुधारणाविषयक दृष्टिकोण एकोणिसाव्या शतकातील नेमस्त सुधारणांपेक्षा गुणात्मकदुष्ट्या भिन्न होता. नेमस्त सुधारकांनी सुचविलेल्या सुधारणा विधवा विवाह, केशवपन, विवाहाची वयोमर्यादा इत्यादी कौटुंबिक सुधारणासंबंधी होत्या. त्यामुळे त्या सुधारणांमधून मूलभूत अशा सामाजिक सुधारणा झालेल्या नाहीत. मूलभूत प्रश्न सुटलेला नाही असे मत डॉ. आंबेडकरांनी या संदर्भात व्यक्त केले आहे. इतर लहान लहान सामाजिक सुधारणा होण्यासाठी मुळात सामाजिक विषमतेचा प्रश्न सुटला पाहिजे असे त्यांना वाटप होते. नेमस्त तो सुधारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचात आणखी एक मुख्यतः फरक म्हणजे नेमस्त सुधारकांनी सुधारणांसाठी प्राचीन धर्मग्रंथांचा आधार घेतला आहे. यावर मात्र डॉक्टर आंबेडकरांना विश्वास नव्हता. अस्पृश्यता मान्य करणाऱ्या ‘मनुस्मृती’ या ग्रंथाची त्यांनी होळी केली होती. त्या काळातील नेमस्त तो सुधारक आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या समाज सुधारणा दृष्टिकोणाबाबतचा आणखी एक फरक म्हणजे नेमस्तक सुधारकांचा हृदय परिवर्तनावर विश्वास होता. डॉ. अंबेडकरांना मात्र हृदय परिवर्तनावर मर्यादा असतात असे वाटत होते.

धार्मिक विचार

धर्माची गरज

समतेला महत्त्व

आर्थिक विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचा मुख्य विषय अर्थशास्त्र होता. या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. आदर्श चलन पद्धती, कृषी उद्योग, खासगी सावकार प्रतिबंधक विधेयक, जातीचे अर्थशास्त्र, आर्थिक पायाभरणी इत्यादी विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार मांडले आहेत. भारताची केंद्रिय बँक - भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेत बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे.

भारताच्या कीर्तिवंत सुपुत्रांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. भारत देशाच्या इतिहासातील पहिले सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. देशाच्या सामाजिक-राजकीय क्षितिजावर त्यांचा उदय इ.स. १९२० च्या दशकात झाला. समाजाच्या, अस्पृश्य म्हणून हिणविल्या गेलेल्या अगदी तळातील वर्गाच्या पुनरुत्थानासाठी सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक पातळीवर तेव्हापासूनच त्यांचा संघर्ष सुरू होता. बाबासाहेब एक थोर विचारवंत होते आणि त्यांनी अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विधिज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, संसद सदस्य आणि या सर्वांच्या पलीकडे जाऊन समाजसुधारक आणि मानवाधिकारांचा रक्षक या नात्याने केलेले कार्य अतुलनीय आहे. देशभरातील अस्पृश्य समाजाला एकवटून, संघटित करून सामाजिक समतेच्या ध्येयाप्रत जाण्याच्या दृष्टीने राजकीय मार्ग कसा अवलंबायचा, याविषयी त्यांनी दिशादर्शन केले.

अस्पृश्य समाजात मध्ये जन्मलेल्या बाबासाहेबांनी देश-विदेशातल्या तीन खंडांतून उच्च शिक्षण प्राप्त केले. कोलंबिया विद्यापीठाची अर्थशास्त्रातील पीएच. डी. (१९१७),  लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी तसेच लंडनमधील ग्रेज इन्ची बार अ‍ॅट लॉ (१९२३) अशा अतिउच्च पदव्या त्यांनी संपादित केल्या. दलित समाजातील विद्यार्थ्याने त्या काळात अशा प्रतिष्ठेच्या पदव्या मिळविणे ही अद्वितीय बाब होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूळ अभ्यासविषय अर्थशास्त्र हाच होता. बाबासाहेबांनी अर्थशास्त्रात विपुल लिखाण केले असून, या विषयावर त्यांची तीन प्रमुख पुस्तके आहेत. : १) अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अॅन्ड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी, २) दि इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया आणि ३) दि प्रॉब्लेम ऑफ द रुपी : इट्स ओरिजिन अॅन्ड इट्स सोल्यूशन. 

पहिली दोन पुस्तके सार्वजनिक वित्तव्यवस्थेवरील असून, त्यातील पहिल्या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीच्या इ स. १७९२ ते इ.स. १८५८ या काळातील वित्तव्यवहारावर भाष्य केले आहे. दुसरे पुस्तक ब्रिटिशांच्या आमदनीतील भारतात वित्तीय व्यवहारांमधील केंद्र आणि राज्य संबंधांवर भाष्य करते. हा कालखंड इ.स. १८३३ ते इ.स. १९२१ असा आहे. त्यांचे तिसरे पुस्तक चलनविषयक अर्थशास्त्रावरील एक उत्कृष्ट ग्रंथ मानला गेला आहे. या पुस्तकात इ.स. १८०० पासून इ.स. १८९३ पर्यंतच्या कालखंडात विनिमयाचे माध्यम म्हणून भारतीय चलनाची कशी उत्क्रांती झाली, हे बाबासाहेबांनी सांगितले आहे. तसेच १९२० च्या दशकाच्या पूर्वार्धात सुयोग्य चलनाची निवड करण्यात आलेल्या अडथळ्यांचीही चर्चा त्यांनी केली आहे. भारतात परतल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रावर एकही पुस्तक लिहिले नाही. मात्र, त्यांच्या कार्याचा आढावा घेतल्यास त्यांच्यातील अर्थतज्ज्ञ वारंवार डोकावत राहतो.

बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेम्ब्लीचे सदस्य असताना (१९२६) ग्रामीण भागातील गरिबांच्या समस्यांविषयीचे त्यांचे समग्र आकलन त्यांनी उभारलेल्या जनआंदोलनांमध्ये प्रतिबिंबित होते. शेतीमधील खोती पद्धतीविरुद्ध त्यांनी केलेल्या यशस्वी आंदोलनामुळे अनेक ग्रामीण गरिबांची आर्थिक शोषणातून मुक्तता झाली. महार वतन या नावाखाली सुरू असलेल्या शुद्ध गुलामगिरीविरुद्ध त्यांनी आवाज उठविल्यानंतर ग्रामीण भागातील गरिबांचा मोठा वर्ग शोषणमुक्‍त झाला. सावकारांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी त्यांनी असेम्ब्लीमध्ये विधेयक आणले. औद्योगिक कामगारांच्या क्षेत्रात डॉ. आंबेडकरांनी इ.स.१९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. त्याकाळी कामगारांचा आवाज बुलंद करणार्‍या अन्य संघटना होत्याच; मात्र त्यांना अस्पृश्य कामगारांच्या मानवाधिकारांशी काहीही देणे-घेणे नव्हते. नव्या राजकीय पक्षाने ही उणीव भरून काढली. त्याचप्रमाणे व्हॉइसरॉयज् एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे कामगार सदस्य या नात्याने १९४२ ते १९४६ या काळात डॉ. आंबेडकर यांनी कामगारविषयक धोरणात आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. त्यात सेवायोजन कार्यालयाची स्थापना ही महत्त्वपूर्ण घटना होती आणि स्वतंत्र भारतातील औद्योगिक संबंधांची तीच पायाभरणी ठरली. बाबासाहेबांनी पाटबंधारे, ऊर्जा आणि इतर सार्वजनिक बांधकामे ही खातीही सांभाळली. देशाचे पाटबंधारे धोरण निश्‍चित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दामोदर व्हॅली प्रकल्पाचा यात प्राधान्याने समावेश करावा लागेल.

जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेसारख्या सामाजिक आजारांचे आर्थिक पैलू उलगडून दाखविणे, हे डॉ. आंबेडकरांचे आणखी एक विद्वत्तापूर्ण कार्य होय. श्रमविभागणीच्या तत्त्वानुसार महात्मा गांधींनीही जाती व्यवस्थेचे अस्तित्व स्वीकारले होते. मात्र, आंबेडकरांनी ‘जातींचे विध्वंसन’ या आपल्या ग्रंथात त्यावर कडाडून टीका केली होती. जाती व्यवस्थेमुळे केवळ श्रमाची विभागणी केली गेली नसून, श्रमिकांचीच विभागणी केली गेली आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. डॉ. आंबेडकरांचा जाती व्यवस्थेवरील हल्ला हे केवळ उच्चवर्णीयांच्या वर्चस्ववादाला दिलेले आव्हान नव्हते, तर आर्थिक विकासाशी त्यांच्या मांडणीचा जवळचा संबंध होता. जाती व्यवस्थेमुळे श्रमाची आणि भांडवलाची गतिशीलता कमी झाली असून, त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि विकासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते.  

स्टेट्स अॅन्ड मायनॉरिटीज नावाने ब्रिटिश सरकारला इ.स.१९४७ साली सादर केलेल्या टिपणामध्ये भारताच्या आर्थिक विकासाची योग्य धोरणे कोणती, हे सांगितले होते. अत्युच्च उत्पादन क्षमतेचा विचार करून लोकांच्या आर्थिक जीवनाचे नियोजन करणे तसेच खासगी उत्पादकांना कोणतीही आडकाठी न करता आणि संपत्तीचे समान वाटप होईल अशारीतीने आर्थिक नियोजन करणे हे सरकारचे दायित्व आहे, असे त्यांनी नमूद केले होते. 

स्वातंत्र्यानंतर डॉ. आंबेडकर भारताचे पहिले कायदामंत्री बनले. इ.स. १९४८-४९ मध्ये घटना समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय राज्यघटनेला आकार देतानाही त्यांच्यातील अर्थतज्ज्ञ आपल्याला दिसून येतो. मानवी अधिकारांचे मूलतत्त्व म्हणून त्यांनी लोकशाही राज्यव्यवस्थेचा ताकदीने पुरस्कार आणि पाठपुरावा केला. समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या तीन लोकशाही तत्त्वांचा केवळ राजकीय हक्‍क असा संकुचित अर्थ लावला जाऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचे ते खंदे पुरस्कर्ते होते आणि सामाजिक-आर्थिक लोकशाहीकडे दुर्लक्षून राजकीय लोकशाही टिकू शकणार नाही, असा इशाराही द्यायला ते विसरले नाहीत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ दि स्टेट पॉलिसी हा अनुच्छेद घटनेत समाविष्ट करून त्यांनी आर्थिक लोकशाहीचा हेतू विषद केला. 

कायदामंत्री या नात्याने डॉ. आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल संमत करण्यासाठी मोठा संघर्ष केला. महिलांचे अधिकार, विशेषतः विवाह आणि पितृसंपत्तीविषयक अधिकार सुरक्षित करणारी ही मोठी सामाजिक सुधारणा होती. हे विधेयक संसदेत संमत होऊ शकले नाही, म्हणून सप्टेंबर इ.स.१९५१ मध्ये त्यांनी राजीनामा दिला.  डॉ. आंबेडकर यांचे व्यक्‍तिमत्त्व अनेक पैलूंनी युक्‍त असले तरी त्यात एक समान धागा होता आणि तो आर्थिक हित पाहणारा होता. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या त्यांनी दिलेल्या मंत्रातूनच त्यांचे आर्थिक विचार सुस्पष्टपणे दिसून येतात. आंबेडकरांचे विचार सामाजिक, धार्मिक आणि नैतिक तत्त्वांवर आधारलेले आहेत. शोषक आणि शोषित हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. दबलेल्यांना उभारी देणे आणि शोषितांची जोखडातून मुक्‍तता करणे हाच त्यांच्या विचारांचा मूलाधार आहे. सर्वांना स्वातंत्र्य, समता आणि न्याय मिळावा, हाच त्यांच्या वैचारिक मांडणीचा प्रमुख हेतू आहे. याच हेतूसाठी लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला.

शैक्षणिक विचार

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की, तो किंवा ती पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावी. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाजहितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्‍यांनी ध्यानी घ्यावे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेजऔरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.[१]

साम्यवादावरील विचार

गांधीवादावरील विचार

चीनबाबत विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चीनबाबत धोक्याचा इशारा दिलेला आहे. अमेरिका, आग्नेय आशियाई राष्ट्रे यांबरोबरच चीनसंदर्भातही डॉ. आंबेडकरांचे धोरण अतिशय स्पष्ट होते. चीन हे अतिशय धूर्त राष्ट्र आहे आणि अशा राष्ट्राबाबत भारताने गाफील राहून चालणार नाही. तसेच आदर्शवादी दृष्टीकोनातून चीनशी मैत्री करण्याचे प्रयत्न भारताने करू नये, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते.

त्या काळामध्ये जवाहरलालनेहरूंचे धोरण हे काहीसे चीनचे लांगुलचालन करणारे होते. त्यामुळेच इ.स. १९४९ मध्ये कम्युनिस्ट चीनला संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्त्व मिळावे यासाठी भारताने जोरदार मागणी केली होती. साहिजकच, त्यावर बाबासाहेबांनी टीका केली होती.

इ.स. १९५४ मध्ये भारताने चीनसंदर्भात तयार केलेले पंचशील धोरण संसदेमध्ये चर्चेसाठी आले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी फार उत्तम प्रकारे त्यावर टीका केली होती. ते असे म्हणतात, “पंचशील धोरण हे बौद्ध धर्माचा अविभाज्य घटक आहे. पण या धोरणाचा चीनकडून अवलंब होताना दिसत नाही. चीन जर तिबेटी लोकांवर अन्याय करत असेल तर त्यांना अशा प्रकारचे पंचशील धोरण करण्याचा काय अधिकार आहे असा सवाल त्यांनी केला.”

व्यक्तींवरील विधाने

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रसिद्ध व्यक्तींवर केलेली विधाने

स्वामी विवेकानंद

  • “अलिकडच्या शतकात भारताने निर्माण केलेला सर्वात मोठा माणूस म्हणजे स्वामी विवेकानंद आहेत, गांधी नव्हे.”

(पंडीत नेहरूंचे पी.ए. एम.ओ. मथाई हे बाबासाहेबांच्या निमंत्रणांवरून ते बाबासाहेबांकडे आले, गप्पा रंगल्या, गप्पांच्या ओघात बाबासाहेबांनी विवेकानंद संबंधी वरील उद्गार काढले होते, त्यावर मथाई काहिसे चकित झाले होते. हि चर्चा झाली तेव्हा गांधी हयात नव्हते.)

प्रेरणादायी सुविचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

  1. तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.

  2. आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका.

  3. स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !

  4. लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे 'हुकूमशाही' आणि माणसां-माणसांत भेद मानणारी 'संस्कृती'.

  5. शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.

  6. लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे.

  7. मी नदीच्या प्रवाहालाच वळवणार्‍या भक्कम खडकासारख आहे.

  8. मी संघर्ष करून अस्पृश्यांत जाज्वल स्वाभिमान निर्माण केला आहे.

  9. देववर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.

  10. अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण आहे.

  11. स्वत:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.

  12. सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततः भारतीय ही भूमिका घ्यावी.

  13. चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने.

  14. उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.

  15. माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.

  16. करूणेशिवाय विद्या बाळगणार्‍याला मी कसाई समजतो.

  17. शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.

  18. पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते.

  19. ग्रंथ हेच गुरू.

  20. वाचाल तर वाचाल.

  21. इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.

  22. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.

  23. तिरस्कार माणसाचा नाश करतो.

  24. माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल.

  25. एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.

  26. भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.

  27. धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय.

  28. लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.

  29. द्वेषाला सहानूभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.

  30. बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.

  31. बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान.

  32. धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.

  33. मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते.

  34. शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !

  35. सार्‍या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते.

  36. शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.

  37. विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याची विचार केला पाहिजे.

  38. सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर आहे हेच सर्वात मोठे चूक आहे. धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार.

  39. सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही.

  40. अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.

  41. मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.

  42. जगात म्हणे, सहा विद्वान आहेत. त्यापैकी डॉ. आंबेडकर एक आहेत असे एक युरोपियन म्हणाले होते.

  43. ज्यांच्या अंगी धैर्य नाही. तो पुढारी होऊ शकत नाही.

  44. बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. कारण तो केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे.

  45. भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.

  46. सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता जगात झालाच नाही.

  47. बौद्ध धर्म हा जागतिक ऐक्याच्या एकमेव असा धर्म आहे.

  48. बुद्ध हेच खरे विचारवंत होते. त्यांच्यासारखा थोर विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही.

  49. शक्तिचा उपयोग वेळ - काळ पाहून करावा.

  50. महामानव असला तरी त्याच्या चरणी व्यक्ति-स्वातंत्र्याची फुले वाहू नका.

  51. शंका काढण्यास देखील ज्ञान लागले.

  52. आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?

  53. हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.

  54. नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.

  55. जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.

  56. वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.

  57. मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते.

  58. माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.

  59. पती- पत्नि मधील नातं हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे.

  60. जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.

  61. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

  62. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात.

  63. मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो.

  64. जर या देशात शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता.

  65. प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.

  66. मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.

  67. तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.

  68. सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरूकिल्ली म्हणजे राजकिय शक्ती हीच होय.

  69. जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.

  70. स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.

  71. माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.

  72. कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही.

  73. बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.

  74. एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.

  75. शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.

  76. अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.

  77. काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.

  78. जो प्रतीकुल लोकमताला घाबरून जात नाही, दुसर्‍यांचे हातचे बाहुले न होण्याइतपत बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो.

  79. जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.

  80. माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.

  81. मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते.

  82. शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र  क्षेत्र आहे.

  83. सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.

हेही पहा

संदर्भ

बाह्य दुवे