"गौतम बुद्धांचे कुटुंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: बुद्धांचा जन्म इ.स.पू. ५६३ साली लुंबिनी, नेपाळमधील क्ष...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२३:०१, १२ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

बुद्धांचा जन्म इ.स.पू. ५६३ साली लुंबिनी, नेपाळमधील क्षत्रिय वर्णांच्या कुटुंबात झाला. त्यांना बालपणी सिद्धार्थ गौतम म्हणून ओळखले जाई. कपिलवस्तु राज्यात त्यांचे वडील शुद्धोधन हे शाक्य वंशांचे राजे होते, शेजारील कोशल राज्याची राजकुमारी त्यांची आई राणी महामाया होती. सिद्धार्थ बाळाचा जन्म झाल्यापासून सात दिवसांनी त्यांच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या आईची छोटी बहिण, महाप्रजापती गौतमी यांनी त्यांना वाढवले.

त्यानंतर सिद्धार्थाने यशोधराशी विवाह केला आणि नंतर त्यांना एक मुलगा झाला, त्याचे नाव राहुल होते. यशोधरा आणि राहुल हे दोघंही नंतर बुद्ध शिष्य बनले.