"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम (बारामती)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम''' हे पुणे...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१७:३०, ९ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हे पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात असलेले क्रिकेटचे स्टेडियम आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रयत्नांनी या स्टेडियमचे काम पूर्णत्वाला गेले असून स्टेडियमचा लोकार्पण सोहळा क्रिकेट सम्राट सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते ६ एप्रिल २०१६ रोजी संपन्न झाला आहे व तेव्हा प्रदर्शनीय क्रिकेट सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संघ आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन संघ यांच्यामध्ये खेळला गेलेला आहे. डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीच्या पूर्वसंध्येला स्टेडियमचा लोकार्पण सोहळा झाला आहे. डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी वर्षात स्टेडियमचे काम सुरू झाले होते. येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी उपलब्ध व्हावे यासाठी विशेष लक्ष दिलेले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नदीम मेमन यांच्या देखरेखीखाली काम सुरू करण्यात आले. या स्टेडियमसाठी दक्षिण अफ्रिकेतून लॉन आणण्यात आले आहे.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम २५ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत होते. अखेर यामध्ये शरद पवार यांनी लक्ष घातले व त्यामुळे स्टेडियमच्या कामाला गती आली आहे. आंतरराष्ट्रीय सामने येथे होतात. या ठिकाणी क्रिकेटपे्रमींसाठी ८ पिच सरावासाठी बनविली आहेत. दोन पिच मुख्य स्टेडियममध्ये सामन्यासाठी बनविली आहेत.

या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने होणार आहेत, या दृष्टीने २२ हजार प्रेक्षकांसाठी खुर्च्या बसविण्यात आल्या आहेत. उर्वरित गॅलरी, पॅव्हेलियनसह अन्य कामे नगरपालिकेच्या माध्यमातून केली गेली. त्यामध्ये व्हीआयपी कक्ष, व्यायामशाळा, स्टेडियमच्या सर्व गॅलरींना आच्छादन आदींची व्यवस्था आहे.