"बौद्ध मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''बौद्ध मंदिर''' हे बौद्ध धर्माचे अनुयायी असलेल्या बौद्ध|बौद्धा...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१९:३८, १ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

बौद्ध मंदिर हे बौद्ध धर्माचे अनुयायी असलेल्या बौद्धांचे एक उपासना स्थळ आहे. यामध्ये विहार, स्तूप, चैत्य, वॅट आणि पॅगोडा हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व भाषांमध्ये समाविष्ट होतात. बौद्ध धर्मातील मंदिर म्हणजे बुद्धांचे शुद्ध क्षेत्र किंवा शुद्ध वातावरण होय. पारंपारिक बौद्ध मंदिरे आंतरिक आणि बाह्य शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेली आहेत. त्याची रचना आणि वास्तुविशेषता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बदललेली आढळते. सहसा, मंदिरामध्ये केवळ इमारतींचाच नव्हे तर सभोवतालचे पर्यावरणही असते. बौद्ध मंदिरे ५ घटक चिन्हांकित करण्यासाठी डिझाइन केले आहेत: अग्नी, वायु, पृथ्वी, पाणी आणि शहाणपण.