"भारतीय रिपब्लिकन पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६६: ओळ ६६:


==हे सुद्धा पहा ==
==हे सुद्धा पहा ==
*[[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]]
* [[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]]
*[[बहिष्कृत हितकारिणी सभा]]
*[[समता सैनिक दल]]
*[[स्वतंत्र मजूर पक्ष]]
*[[डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी]]
*[[पीपल्स एज्युकेशन सोसायटी]]
*[[द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट]]
*[[भारतीय बौद्ध महासभा]]


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१९:१४, ३० ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

भारतीय रिपब्लिकन पक्ष (इंग्रजी: Republican Party of India) हा भारतातील राजकीय पक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन या संघटनेतून इ.स. १९५७ मध्ये हा पक्ष उदयास आला. या पक्षाचे मुख्य बलस्थान महाराष्ट्रात आहे. शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन हाही एक निवडणुकीत उतरणारा राजकीय पक्ष होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर ३ ऑक्टोबर १९५७ रोजी त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेल्या या पक्षाचा संपूर्ण इतिहासच फाटाफुटींनी भरलेला आहे. ‘भारतीय रिपब्लिकन पक्ष’ ह्याचे ५० वर राजकीय पक्ष (गट) स्थापन झालेले आहेत.

पहिल्यांदा हा पक्ष इ.स. १९५८ साली फुटला होता. म्हणजे पक्षस्थापनेनंतर एक वर्षांच्या आतच. तेव्हाही नेतृत्व कुणी करायचे, यावरूनच पक्ष फुटला होता. त्यातून खोब्रागडे-गायकवाड आणि कांबळे-रूपवते असे दोन गट निर्माण झाले. इ.स. १९६४ मध्ये गायकवाड गटातून आर. डी. भंडारे बाहेर पडले तर इ.स. १९६५ मध्ये कांबळे गटात फूट पडून रूपवते बाहेर पडले आणि गायकवाड गटाशी त्यांचे ऐक्य झाले (म्हणजे ज्यांना विरोध केला त्यांच्याकडेच गेले). त्यानंतर आजपर्यंतचा या पक्षाचा संपूर्ण प्रवास फाटाफूट आणि ऐक्य यांनी रंगलेला आहे. वारंवार झालेल्या या फाटाफुटी व ऐक्यामुळे ‘फूट’ आणि ‘ऐक्य’ या दोन्ही शब्दांचे रिपब्लिकन चळवळीच्या संदर्भातले गांभीर्यच नष्ट झाले आहे. आत्तापर्यंत या पक्षाची ५०हून अधिक छकले झाली आहेत, आणि अशा प्रत्येक छकलाचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष झाला. त्यांतल्या काही छकलांची नावे : -

भारतीय रिपब्लिकन पक्ष (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)चे तुकडे
यांपैकी १९ पक्षांची मान्यता आयकर विवरणपत्रे न भरल्याने रद्द झाली.(१६-१२-२०१६ रोजी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राजकीय पक्षांना आयकरापासून मुक्ती देण्यात आली. मान्यता रद्द झालेले हे सर्व पक्ष आता मान्यताप्राप्त होतील!)
  • आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी
  • आर.पी.आय.(आठवले)
  • इंडियन रिपब्लिकन पार्टी (दलित पँथर) - नामदेव ढसाळ यांची पार्टी
  • उत्तर प्रदेश रिपब्लिकन पार्टी (
  • ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी (दिलीपदादा जगताप)
  • खोब्रागडे रिपब्लिकन पार्टी डेमॉक्रॅटिक गट (खोरिप, उपेंद्र शेंडे) : आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
  • दलित कोब्रा (भाई विवेक चव्हाण)
  • राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष (अण्णासाहेब कटारे राष्ट्रीय अध्यक्ष)[१]
  • दलित पँथर
  • भारतीय दलित पँथर पार्टी - दयाळ बहादुरे यांचा पक्ष
  • भारतीय युथ पँथर
  • युवा दलित पँथर
  • दलित सेना
  • नॅशनल रिपब्लिकन पार्टी - अण्णासाहेब कटारे यांची पार्टी
  • पँथर्स रिपब्लिकन पार्टी - गंगाधर गाडे यांची पार्टी
  • पॉलिटिशियन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), उत्तर प्रदेश
  • पीपल’स रिपब्लिकन पक्ष - जोगेंद्र कवाडे यांची पार्टी
  • प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी -शाम तांगडे व सतीश गायकवाड यांची पार्टी
  • बहुजन भीम पँथर
  • बहुजन महासंघ - मखराम पवार यांची पार्टी
  • बहुजन रिपब्लिकन पार्टी
  • बहुजन रिपब्लिकन युनायटेड - सुलेखा कुंभारे
  • बहुजन समाज पार्टी (आंबेडकर-फुले)
  • भारतीय युथ पँथर
  • भीमशक्ती पार्टी
  • भारतीय दलित पँथर पार्टी - दयाळ बहादुरे यांचा पक्ष
  • भारतीय रिपब्लिकन पक्ष
  • भारिप बहुजन महासंघ - प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष
  • भीमशक्ती रिपब्लिकन सेना () : आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
  • महाराष्ट्र डावी लोकशाही समिती (मडालोस)
  • युनायटेड रिपब्लिकन फ्रंट (गंगाराम इंदिसे)
  • यूथ रिपब्लिकन (मनोज संसारे)
  • राजगृह रिपब्लिकन पार्टी
  • रिपब्लिकन जनशक्ती पक्ष (पक्षप्रमुख अर्जुन डांगळे; पक्षाचे पुण्यातील शहराध्यक्ष शैलेंद्र मोरे)
  • रिपब्लिकन टायगर फोर्स
  • रिपब्लिकन पँथर्स -
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राज घाडगे)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) : आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) (अध्यक्ष - रामेश्वर सूर्यभान गवई)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कवाडे)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रेटिक (टी.एम. कांबळे) : आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (बी.सी. कांबळे-आक्काताई बापूसाहेब कांबळे)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (महाराष्ट्र)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (मोघा)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (तळवलकर)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राजा ढाले)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (युनायटेड)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आर्‌‍के. (आर्‌‍के म्हणजे राजाराम खरात)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-ई. - (ई म्हणजे एकतावादी)
  • रिपब्लिकन लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ़्रंट (रिपब्लिकनांची डावी लोकशाही समिती - रिडालोस - RIDALOS) (इ.स. २०१४च्या निवडणुकांसाठी हिचे रूपांतर मडालोस (महाराष्ट्र डावी लोकशाही समिती) असे झाले आहे.)
  • रिपब्लिकन संघर्ष दल (संस्थापक संजय भीमाले)
  • रिपब्लिकन सेना (अनुज आनंदराज)
  • सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी (कार्ल मार्क्स, फुले आणि आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानांवर आधारित पक्ष - स्थापनकर्ते कॉम्रेड शरद पाटील)
  • हरियाणा रिपब्‍लिकन पार्टी

अन्य तत्सम पक्ष आणि त्यांचे अध्यक्ष

लक्ष्मण माने (भटके विमुक्त संघटना), लक्ष्मण गायकवाड (भटके विमुक्त जाती जमाती संघटना), प्रा. मोतीराम राठोड (राष्ट्रीय बंजारा दल), बाळकृष्ण रेणके (भटके विमुक्त जमाती), एकनाथ आव्हाड (राष्ट्रीय मानवाधिकार संघटना), प्रफुल्ल पाटील, रोहिदास समाज पंचायत संघ (अध्यक्ष भागुराम कदम), व्ही. जी. गायकवाड, रविंद्र बागडे, कत्रुलाल जैन, अविनाश कुट्टी, इ.

हे सुद्धा पहा

  1. ^ www.nrporg.in