"लखनभैया चकमक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या हा मुंबईतील गुन्हेगारी जगताती...
(काही फरक नाही)

२१:२९, २४ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या हा मुंबईतील गुन्हेगारी जगतातील माफिया, छोटा राजन याचा हस्तक असल्याचा संशय होता. पोलीस अधिकारी चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या पोलिसांनी ११ नोव्हेंबर २००६ रोजी मुंबईत वर्सोवा येथील नाना-नानी पार्कजवळ लखनभैयाचा एन्काउंटर केला.

लखनभैयाचे छोटा राजनसोबत संबंध असल्याचे अनेक पुरावे पोलिसांकडे होते. एवढेच नाही तर लखनवर गुन्हेही दाखल होते. मात्र एन्काउंटर होण्यापूर्वी लखनचे वाशीतून अपहरण करण्यात आले असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळाली होती. त्यानुसार लखनभैयाचे भाऊ अॅडव्होकेट रामप्रसाद गुप्ता यांनी मुंबईच्या, ठाण्याच्या आणि नवी मुंबईच्या पोलिसांना फॅक्सद्वारे लखनच्या जिवाला धोका आहे अशी माहिती दिली होती. मात्र ही माहिती मिळूनसुद्धा लखनचा एन्काउंटर करण्यात आला.

लखनची हत्याच करण्यात आली असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला. त्यांनी न्यायालयात यासंबंधात याचिका दाखल केली. लखनची हत्या करण्यात आली होती हे अंधेरी कोर्टाने मान्य केले. मात्र पुढील निर्णयासाठी त्या कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाकडे अहवाल सुपूर्द केला.

उच्च न्यायालयाने रामप्रसाद गुप्तांची तक्रार जबाब म्हणून नोंदवून एसआयटी मार्फत चौकशीचे आदेश दिले. न्यायालयाच्या निर्णयानंतर एसआयटीने या प्रकरणी अपहरण, हत्या अशा गुन्ह्याची नोंद केली. यानंतर ७ जानेवारी २०१० रोजी एसआयटीने प्रदीप शर्मांसह १३ पोलिसांना अटक केली. तीन वर्षानंतर या खटल्याची सुनावणी झाली. ५ जुलै २०१३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पोलीस इन्स्पेक्टर प्रदीप शर्मांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली, तर १३ पोलिसांसह २१ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

हा एन्काउंटर 'लखनभैया बनावट चकमक' म्हणून मुंबईच्या इतिहासात नोंदला गेला.