"वामन कर्डक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५३: ओळ ५३:
}}
}}
'''वामन तबाजी कर्डक''' ([[१५ ऑगस्ट]], [[इ.स. १९२२]] - [[१५ मे]], [[इ.स. २००४]], '''वामनदादा''' नावाने प्रसिद्ध, हे मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते.<ref>{{cite web | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/lucrative-milk-production-2-174222/ | शीर्षक=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत: १५ ऑगस्ट | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | दिनांक=३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ | ॲक्सेसदिनांक=३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ | लेखक=संजय वझरेकर | भाषा=मराठी}}</ref> कर्डकांनी डॉ. आंबेडकरांवर १०,००० हून अधिक गीते रचली आहेत.
'''वामन तबाजी कर्डक''' ([[१५ ऑगस्ट]], [[इ.स. १९२२]] - [[१५ मे]], [[इ.स. २००४]], '''वामनदादा''' नावाने प्रसिद्ध, हे मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते.<ref>{{cite web | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/lucrative-milk-production-2-174222/ | शीर्षक=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत: १५ ऑगस्ट | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | दिनांक=३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ | ॲक्सेसदिनांक=३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ | लेखक=संजय वझरेकर | भाषा=मराठी}}</ref> कर्डकांनी डॉ. आंबेडकरांवर १०,००० हून अधिक गीते रचली आहेत.

==जीवन परिचय ==
भारतरत्न डॉक्टर [[बाबासाहेब आंबेडकर]] यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखणीतून महाराष्ट्राच्या घराघरात खेड्यापाड्यात, वाडी तांड्यात पोहचवण्याचे काम आंबेडकरी चळवळीचे पाईक लोककवी, लोकशाहीर वामन कर्डक यांनी केले. बुद्ध, फुले, आंबेडकर यांचा विचार हा वामनदादांचा श्वास होता, ऊर्जाकेंद्र होते. हे विचार प्रभावीपणे प्रसारित करत वामनदादा जीवनाचा शेवटापर्यंत फिरत राहिले. याने समाज जागृत होत राहिला.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर


== जीवन ==
== जीवन ==

०९:५५, ७ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

वामन कर्डक
जन्म १५ ऑगस्ट १९२२ (1922-08-15)
देशवंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक
मृत्यू १५ मे, २००४ (वय ८१)
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे वामनदादा
नागरिकत्व भारतीय
धर्म नवयान बौद्ध धर्म
जोडीदार शांताबाई वामन कर्डक
अपत्ये मीरा (जगू शकली नाही), दत्तक पुत्र -रवींद्र कर्डक
वडील तबाजी कर्डक
आई सईबाई तबाजी कर्डक
नातेवाईक सदाशिव (थोरला भाऊ), सावित्राबाई (धाकटी बहीण)

वामन तबाजी कर्डक (१५ ऑगस्ट, इ.स. १९२२ - १५ मे, इ.स. २००४, वामनदादा नावाने प्रसिद्ध, हे मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते.[१] कर्डकांनी डॉ. आंबेडकरांवर १०,००० हून अधिक गीते रचली आहेत.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखणीतून महाराष्ट्राच्या घराघरात खेड्यापाड्यात, वाडी तांड्यात पोहचवण्याचे काम आंबेडकरी चळवळीचे पाईक लोककवी, लोकशाहीर वामन कर्डक यांनी केले. बुद्ध, फुले, आंबेडकर यांचा विचार हा वामनदादांचा श्वास होता, ऊर्जाकेंद्र होते. हे विचार प्रभावीपणे प्रसारित करत वामनदादा जीवनाचा शेवटापर्यंत फिरत राहिले. याने समाज जागृत होत राहिला.

जीवन

वामन कर्डकांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांचे वडील मोळ्या विकणे, टेंभुर्णीच्या पानाच्या विड्या करून विकणे हे आणि हेडीचा व्यवसाय करीत होते.

कर्डकांनी लहानपणी गुरे चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे, शिवडी येथे गिरणी कामगाराची नोकरी करणे, मातीकाम, सिमेंट काँक्रीटचे काम, चिक्की विकणे, आईसफ्रूट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑईल मिलमध्ये नोकरी, इत्यादी कामे केली. त्यांना वाचनाचा छंद होता तसेच त्यांनी लल्लाट लेख या नाटकात घुमा या पात्राची भूमिका केली होती.

गीतकार

वामनदादा कर्डक यांनी ३ मे १९४३ रोजी पहिले विडंबन गीत लिहिले व त्यानंतर २००४ पर्यंत गीतलेखन व गायनाचा कार्यक्रम चालू ठेवला. त्यांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजारावर गीतरचना आहे. त्यांनी काही चित्रपट गीतेही लिहिलेली आहेत. कर्डक हे डॉ. आंबेडकर टांचे अनुयायी होते, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना इ.स. १९४० साली नायगांव येथे पहिल्यांदा पाहिले व त्यानंतर चाळीसगांव, मनमाड, टिळकनगर येथे त्यांनी आंबेडकरांच्या भाषणांत गायन केले.

काव्यसंग्रहृ

  1. ‘वाटचाल’ (गीतसंग्रह) १९७३
  2. ‘मोहळ’ (गीतसंग्रह) १९७६
  3. ‘हे गीत वामनाचे’ (गीतसंग्रह) १९७७
  4. ‘माझ्या जीवनाचं गाणं’ (आत्मकथन) १९९६

ध्वनिफिती व चित्रपट गीते

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट
  2. भीमज्योत
  3. जय भीम गीते
  4. सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला (चित्रपट - सांगत्ये ऐका)
  5. चल गं हरणे तुरू तुरू (चित्रपट - पंचारती)

अन्य गीतरचना

  1. ह्यो ह्यो पाहुणा, शकुचा मेहुणा, तुझ्याकडे बघून हसतोय गं, काही तरी घोटाळा दिसतोय गं (संगीत- मधुकर पाठक; स्वर- श्रावण यशवंते)

पुरस्कार व सन्मान

वामन कर्डकांना मिळालेले पुरस्कार व सन्मान खालीलप्रमाणे आहेत.

  1. दिल्लीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप.
  2. महाराष्ट्र राज्य शासनाचा दलित मित्र पुरस्कार.
  3. महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे तीन वर्ष सदस्यत्व.
  4. महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्यत्व.
  5. औरंगाबाद येथे पहिला भव्य नागरी सत्कार (१९८७).
  6. प्रा. ऋषिकेश कांबळे संपादित पहिल्या लोकशाहीर वामन कर्डक गौरव अंकाचे प्रकाशन (१९८७).
  7. मधुकर भोळे संपादित वामन दादा कर्डक गौरव ग्रंथाचे प्रकाशन (२००१)
  8. प्रा. डॉ. परशुराम गिमेकर संपादित ‘वामनदादा कर्डक यांची गीत रचना’ लेख संग्रहाचे प्रकाशन.
  9. नाशिक, बुलढाणा येथे नाणेतुला
  10. परभणी येथे प्रख्यात उर्दू शायर बशर नवाज यांचे सोबत वहीतुला. नंतर या वह्यांचे गरीब मुलांना वाटप करण्यात आले.
  11. साहित्य, संस्कृती मंडळाची ‘उत्कृष्ट कविरत्‍न’ ही गौरववृत्ती.
  12. ’युगांतर प्रतिष्ठान’तर्फे ‘युगांतर पुरस्कार’ (१९९७).
  13. जामखेडच्या भाई फुटाणे प्रतिष्ठानचा ‘संत नामदेव पुरस्कार’
  14. मुंबईच्या बौद्ध कलावंत संगीत अकादमीचा ‘भीमस्मृती पुरस्कार’
  15. भोपाळ येथे ताम्रपट मिळाला..
  16. भुसावळ येथे चांदीचे मानपत्र मिळाले.
  17. हिंगोली जिल्ह्यातील बसमत येथे संजय मोहड यांनी आयोजित केलेल्या ‘स्वरार्हत संगीत संगीती’ या कार्यक्रमात नागरी सत्कार आणि गायन
  18. मराठवाडा ‘अस्मितादर्श पुरस्कार’
  19. इ.स. १९९३ मध्ये, वर्धा येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  20. औरंगाबादच्या वामनदादा कर्डक प्रतिष्ठान या संस्थेने भरविलेले पहिले अखिल भारतीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन, १५ मे २००८ रोजी औरंगाबाद येथे झाले. डॉ. यशवंत मनोहर संमेलनाध्यक्ष होते.

कर्डकांवर लिहिलेली पुस्तके

  • ‘एका कवीचे जीवनगाणे’ ही वामन कर्डक यांची चरित्रकथा असून त्याचे लेखक बबन लोंढे हे आहेत.
  • आंबेडकरी प्रतिभेचा महाकवी : वामनदादा कर्डक - लेखक: डॉ. अशोक जोंधळे व डॉ. शत्रुघ्न जाधव, प्रतिभास प्रकाशन - परभणी, पृष्ठे ८०[२]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ संजय वझरेकर. http://www.loksatta.com/navneet-news/lucrative-milk-production-2-174222/. ३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ आंबेडकरी प्रतिभेचा महाकवी : वामनदादा कर्डक


बाह्य दुवे

  1. वामन कर्डकांवरील लघुपट (हिंदी)
  2. http://www.youtube.com/watch?v=oKvOHun5pa8
  3. http://yashwantmanohar.com/samikshechi-pustake/ambedkarvadi-mahageetkar-wamandada-kardak/