"सांचीचा स्तूप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१: ओळ ३१:


</gallery>
</gallery>
==हेही पहा ==
*[[सांची]]
*[[धमेक स्तूप]]
*[[चौखंडी स्तूप]]

==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Sanchi|{{लेखनाव}}}}

{{युनेस्को||524}}
{{युनेस्को||524}}
{{भारतातील जागतिक वारसा स्थाने}}
{{भारतातील जागतिक वारसा स्थाने}}

१४:२९, १ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

सांचीचा स्तूप
सांची येथील स्तूपाचे प्रवेशद्वार, त्यावरील बौद्ध धार्मिक चिन्हे: श्रीवत्स, त्रिरत्न, चक्र आणि तोरण
सांची स्तूपावरील कोरीव कामाचे बारकावे
उत्तरेकडील द्वारावरील शोभिवंत कोरीवकाम

सांचीचा स्तूप हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातील सांची गावातील एक बौद्ध स्तूप आहे. सांची हे भोपाळपासून ४५ कि.मी. तर विदिशापासून ९ कि.मी. अंतरावर आहे. सांचीचा स्तूप हा मौर्य सम्राट अशोकांनी बांधलेला आहे.

इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात अशोक राजाने बांधलेले, संपूर्णपणे विटांचे बांधकाम असलेले हे स्थापत्य फारच सुंदर आहे. हा स्तूप म्हणजे एक स्मारक होय. गौतम बुद्धाच्या अस्थी किंवा त्याचे काही अवशेष एका पेटीमध्ये जपून ठेवले जात असत, आणि त्या पेटीवर स्मारक म्हणून भव्य अशा स्तूपाचे बांधकाम केले जाई. सांचीचा स्तूप हे पण असेच एक स्मारक आहे.

या सांचीच्या स्तूपाच्या माथ्यावर छत्रावली आहे. इ.स.पूर्व पहिल्या शतकात सातवाहन साम्राज्याच्या कालखंडात या स्तूपाच्या बाजूने भव्य शिल्पांकित अशी तोरणे बांधली गेली आणि त्या स्तूपाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक सुंदर प्रदक्षिणापथ तयार करण्यात आला. इथल्या तोरणांवर गौतम बुद्धांच्या आयुष्यातील विविध प्रसंग कोरलेले आहेत. सांची इथली ही तोरणे आणि त्यावर केलेले शिल्पकाम उत्तमप्रकारे केलेले आहे. या तोरणांवर असलेल्या ब्राह्मी लिपीमधील शिलालेखानुसार महाराष्ट्रातील कोणा आनंद नावाच्या व्यापाऱ्याने यासाठी देणगी दिल्याचा उल्लेख आढळतो.

चित्रदालन

हेही पहा

बाह्य दुवे