"महाराष्ट्रातील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २५: ओळ २५:


*[http://zeenews.india.com/news/india/buddhism-is-the-fastest-growing-religion-among-scheduled-castes_1883362.html Buddhism is the fastest growing religion among Scheduled Castes]
*[http://zeenews.india.com/news/india/buddhism-is-the-fastest-growing-religion-among-scheduled-castes_1883362.html Buddhism is the fastest growing religion among Scheduled Castes]
* [http://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF/ धर्मांतराने दलितांना काय दिले]


[[वर्ग:महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म]]
[[वर्ग:महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म]]

१४:०६, २९ जुलै २०१७ ची आवृत्ती


महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून महाराष्ट्र हे भारतीय राज्यांपैकी सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेले राज्य आहे. बौद्ध धर्म हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार सातवाहन काळात फार मोठ्या प्रमाणात झाला. नाग लेकांनी धर्मप्रचारास प्राणांची बाजी लावून दिली होती. हजारो लेणी कोरल्या गेल्या. सिद्धांच्या माध्यमातून नाथांपर्यंत आणि नाथांपासून वारकरी संप्रदायापर्यंत बौद्धधम्म झिरपत गेला. बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता.

२०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार सबंध भारतात सुमारे ८५ लाख बौद्धांपैकी ६५ लाखापेक्षा अधिक म्हणजेच ७७.३६% बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत.[१] महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म हा हिंदूइस्लाम नंतर तृतीय क्रमांकाचा धर्म आहे. आणि महाराष्ट्रातील लोकसंख्येत बौद्धांचे प्रमाण सुमारे ६% आहे. भारतातील सुमारे ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्रातील आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशभरातील आपल्या लाखो अनुयायांसह १९५६ च्या विजयादशमीच्या दिवशी बुद्धधर्मात प्रवेश केला. हा दीक्षा समारंभ नागपूर येथे झाला. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडाकोकण येथील दलित समाजाने यात मोठ्या प्रमाणात भाग घेतला. यामुळेच महाराष्ट्रामध्ये बौद्धांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आढळते.

इतिहास

पुरातन वास्तू व प्राचीन लिखाण यांचा शोध घेतला असता बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता. पर्सी ब्राऊन या विद्वानाच्या मते भारतातील बौद्ध शिल्पांपैकी अर्ध्याहून अधिक शिल्पे (लेणी) महाराष्ट्रात सापडतात, ही गोष्ट बौद्ध धर्माला महाराष्ट्रात त्या काळी असलेली लोकप्रियता दर्शविते. अशा तऱ्हेची डोंगरात खोदून काढलेली वास्तु-शिल्पे त्याकाळी महाराष्ट्र बौद्ध धर्माचे अधिपत्य दर्शविते. .

बौद्ध लेणी

१९५१ ते २०११ दरम्यानची स्थिती

बौद्ध धर्मांतरे

बौद्ध चळवळी

तीर्थस्थळे

हेही पहा

संदर्भ आणि नोंदी


बाह्य दुवे