"महाराष्ट्रामधील धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४४: ओळ ४४:


== ख्रिश्चन धर्म ==
== ख्रिश्चन धर्म ==
{{मुख्य|मराठी ख्रिश्चन}}
२०११ भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार, महाराष्ट्राची १०,८०,०७३ (०.९६%) एवढी लोकसंख्या [[ख्रिस्ती]] आहे. यातील बहुतेक ख्रिश्चन [[कॅथलिक]] आणि [[प्रोटेस्टंट]] आहेत. तसेच गोवा, मंगलोरियन, केरिलिट आणि तामिळी ख्रिश्चन देखील [[मुंबई]] आणि [[पुणे]] या शहरी भागात आहेत. महाराष्ट्रात दोन जातीय ख्रिश्चन समुदाय आहेत.
२०११ भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार, महाराष्ट्राची १०,८०,०७३ (०.९६%) एवढी लोकसंख्या [[ख्रिस्ती]] आहे. यातील बहुतेक ख्रिश्चन [[कॅथलिक]] आणि [[प्रोटेस्टंट]] आहेत. तसेच गोवा, मंगलोरियन, केरिलिट आणि तामिळी ख्रिश्चन देखील [[मुंबई]] आणि [[पुणे]] या शहरी भागात आहेत. महाराष्ट्रात दोन जातीय ख्रिश्चन समुदाय आहेत.


* [[ईस्ट इंडियन]] - बहुतेक कॅथोलिक ख्रिस्चन हे मुंबई, [[ठाणे]] आणि शेजारील [[रायगड]] जिल्ह्यांमध्ये केंद्रित आहेत. इ.स.पू. पहिल्या शतकात [[सेंट बर्थोलोमई]] यांनी या भागाच्या स्थानिक लोकांत धर्म प्रचार केला होता.
* [[ईस्ट इंडियन]] - बहुतेक कॅथोलिक ख्रिस्चन हे मुंबई, [[ठाणे]] आणि शेजारील [[रायगड]] जिल्ह्यांमध्ये केंद्रित आहेत. इ.स.पू. पहिल्या शतकात [[सेंट बर्थोलोमई]] यांनी या भागाच्या स्थानिक लोकांत धर्म प्रचार केला होता.

* [[मराठी ख्रिश्चन]] -१८ व्या शतकात अहमदनगर आणि सोलापूरमध्ये विशेषतः बहुसंख्य प्राध्यापकांना अमेरिकेच्या आणि अँग्लिकन मिशनर्यांनी प्रोटेस्टंट धर्मात आणले. मराठी ख्रिश्चनांनी मुख्यत्वे त्यांच्या पूर्व-ख्रिश्चन सांस्कृतिक पद्धती ठेवल्या आहेत.

१९ व्या शतकाच्या सुरुवातीला काही जणांनी [[अहमदनगर]] आणि [[मिरज]]मधील दुष्काळग्रस्तांच्या काळात ख्रिस्ती धर्म परिवर्तन केले. ते अमेरिकन मराठी मिशन, चर्च मिशन सोसायटी आणि युनायटेड सोसायटी फॉर द प्रोस्पेजेशन ऑफ द गॉस्पेल यांनी चर्च ऑफ इंग्लँडने अहमदनगर येथे इव्हॅन्जेलॅज झाल्यानंतर धर्मपरिवर्तन केले. अहमदनगरमध्ये, मिशनरी स्थानिकांना [[बायबल]]चे स्पष्टीकरण देण्यासाठी गावांमध्ये प्रवास करीत होते. तथापि, या ख्रिश्चन धर्मातर चळवळी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या उदयाने आणि बौद्ध धर्मातील मोठ्या प्रमाणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणावर झाली.


== शिख धर्म ==
== शिख धर्म ==

२१:४०, २६ जुलै २०१७ ची आवृत्ती

महाराष्ट्रातील धर्म (२०११)[१]

  इस्लाम (11.5%)
  इतर (0.5%)

महाराष्ट्रामधील धर्म हे धार्मिक श्रद्धा आणि प्रथांमधून आपली विविधता दर्शवितात. महाराष्ट्रात जगातील सहा प्रमुख धर्मांचे अनुयायी आहेत; ते म्हणजे हिंदू धर्म, इस्लाम, बौद्ध धर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म आणि शिख धर्म होय. संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात धर्म हा राज्याच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे.

भारताचे संविधान राज्याला एक धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित करते, ज्यामुळे नागरीकांना कोणत्याही धर्माचा किंवा विश्वासाचा उपासना करणे आणि त्याचा प्रसार करण्याचे स्वतंत्र वा मूभा आहे.[२][३] भारताचे संविधान देखील धर्म स्वातंत्र्याचा अधिकार मौलिक अधिकार असल्याचे घोषित करते.

हिंदू धर्म

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार हिंदू राज्याच्या एकूण लोकसंख्येत सुमारे ८०% (७९.८३%) आहेत आणि हिंदू धर्म महाराष्ट्रीयन लोकांच्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतो. गणेश हा मराठी हिंदूंचा सर्वात लोकप्रिय देवता आहे, त्यानंतर ते विठ्ठल रूपातील कृष्ण ते शंकर आणि पार्वतीसारख्या शिव कौटुंबिक देवतेची उपासना करतात. वारकरी परंपरेची महाराष्ट्रातील स्थानिक हिंदूंवर मजबूत पकड आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव अतिशय लोकप्रिय आहे. मराठी हिंदूंना संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी, संत तुकाराम, संत नामदेवसंत चोखामेळा, संत तुकडोजी महाराज (संत आणि तत्त्वज्ञ), संत गाडगे महाराज (संत आणि तत्त्वज्ञ) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (धर्मवेत्ते व बौद्ध आणि दलितांचे आध्यात्मिक नेते) हे सन्माननिय आहेत.

इस्लाम

इस्लाम हा राज्यात दुसरा सर्वात मोठा धर्म आहे, २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, महाराष्ट्रात १,२९,७१,१५२ लोक मुस्लिम असून त्यांचे लोकसंख्येमधील प्रमाण सुमारे १२% (११.५४ %) आहे. ईद-उल-फित्र (रमजान ईद) आणि ईद-उल-अधा (बकरी ईद) हे राज्यातील दोन सर्वात महत्त्वाचे मुस्लिम सण आहेत. राज्यातील मुस्लिम बहुसंख्य लोक सुन्नी आहेत. राज्यातील मुस्लिम लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात शहरात वसलेली आणि विविध क्षेत्रांमध्ये पसरलेली आहे. सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या मराठवाडा, खानदेश, आणि मुंबई-ठाणे पट्ट्यात आढळते. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या क्षेत्रात देखील मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये २५.०६% लोक मुस्लिम आहेत, तर उपराजधानी नागपूर शहरात ११.९५% लोक मुस्लिम आहेत. औरंगाबाद शहरामध्ये मुस्लिम लोकसंख्या ही ३०.७९% आहे. मालेगाव आणि भिवंडीसारख्या शहरांमध्येही मुस्लिम बहुसंख्य आहेत.

बौद्ध धर्म

बौद्ध धर्म हा महाराष्ट्र राज्यातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, बौद्ध धर्म हा महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ६% (५.८१%) असून ६५,३१,२०० लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी सुमारे ७७% बौद्ध एकट्या महाराष्ट्र राज्यात राहतात. बहुतांश मराठी बौद्ध हे नवयान बौद्ध धर्माचे (नवबौद्ध धर्म) अनुयायी आहेत, १९ व्या व २० व्या शतकात दलित बौद्ध चळवळ या भारतातील बौद्ध पुनरुत्थान मोहिमेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेकडून सर्वात महत्त्वाची प्रेरणा प्राप्त झाली. डॉ. आंबेडकरांपासून प्रेरित होऊन बौद्ध बनणाऱ्या भारतातील धर्मांतरित बौद्ध व्यक्तींना ‘नवबौद्ध’ म्हणजेच ‘नवयानी बौद्ध' म्हटले जाते. भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येत ८७% बौद्ध हे नवयानी आहेत. आणि या एकूण नवयानी बौद्ध अनुयायांपैकी जवळजवळ ९०% अनुयायी महाराष्ट्रात आहेत.

जैन धर्म

जैन धर्म हा महाराष्ट्रामधील एक प्रमुख धर्म असून राज्यात चौथा सर्वात मोठा धर्म आहे. २०११ च्या भारतीय जगनगणेच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील जैन समाजाची लोकसंख्या १४,००,३४९ (१.२५%) आहे. महाराष्ट्रातील जैन हे राजस्थान मधील मारवाडी प्रांत आणि गुजरात राज्यातून आलेले आहेत. महाराष्ट्रात एक लहान देशी मराठी जैन समुदाय आहे. राष्ट्रकूट आणि चालुक्यसारख्या ख्रिश्चन युगाच्या पहिल्या हजार वर्षांपासून महाराष्ट्रातील शासक जैन धर्माचे अनुयायी होते. प्राचीन वेरूळ लेणी कॉम्पलेक्समध्ये हिंदू आणि बौद्ध लेणींच्या बाजूला अनेक जैन लेणी आहेत.

ख्रिश्चन धर्म

२०११ भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार, महाराष्ट्राची १०,८०,०७३ (०.९६%) एवढी लोकसंख्या ख्रिस्ती आहे. यातील बहुतेक ख्रिश्चन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट आहेत. तसेच गोवा, मंगलोरियन, केरिलिट आणि तामिळी ख्रिश्चन देखील मुंबई आणि पुणे या शहरी भागात आहेत. महाराष्ट्रात दोन जातीय ख्रिश्चन समुदाय आहेत.

  • ईस्ट इंडियन - बहुतेक कॅथोलिक ख्रिस्चन हे मुंबई, ठाणे आणि शेजारील रायगड जिल्ह्यांमध्ये केंद्रित आहेत. इ.स.पू. पहिल्या शतकात सेंट बर्थोलोमई यांनी या भागाच्या स्थानिक लोकांत धर्म प्रचार केला होता.
  • मराठी ख्रिश्चन -१८ व्या शतकात अहमदनगर आणि सोलापूरमध्ये विशेषतः बहुसंख्य प्राध्यापकांना अमेरिकेच्या आणि अँग्लिकन मिशनर्यांनी प्रोटेस्टंट धर्मात आणले. मराठी ख्रिश्चनांनी मुख्यत्वे त्यांच्या पूर्व-ख्रिश्चन सांस्कृतिक पद्धती ठेवल्या आहेत.

१९ व्या शतकाच्या सुरुवातीला काही जणांनी अहमदनगर आणि मिरजमधील दुष्काळग्रस्तांच्या काळात ख्रिस्ती धर्म परिवर्तन केले. ते अमेरिकन मराठी मिशन, चर्च मिशन सोसायटी आणि युनायटेड सोसायटी फॉर द प्रोस्पेजेशन ऑफ द गॉस्पेल यांनी चर्च ऑफ इंग्लँडने अहमदनगर येथे इव्हॅन्जेलॅज झाल्यानंतर धर्मपरिवर्तन केले. अहमदनगरमध्ये, मिशनरी स्थानिकांना बायबलचे स्पष्टीकरण देण्यासाठी गावांमध्ये प्रवास करीत होते. तथापि, या ख्रिश्चन धर्मातर चळवळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदयाने आणि बौद्ध धर्मातील मोठ्या प्रमाणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणावर झाली.

शिख धर्म

झोराष्ट्रियन

ज्यू धर्म

हेही पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Population by religious community - 2011". 2011 Census of India. Office of the Registrar General & Census Commissioner. Archived from the original on 25 August 2015. 25 August 2015 रोजी पाहिले.
  2. ^ The Constitution of India Art 25-28. Retrieved on 22 April 2007.
  3. ^ "The Constitution (Forty-Second Amendment) Act, 1976". 2007-04-22 रोजी पाहिले.


बाह्य दुवे