"वेरूळ (लेणी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २९: ओळ २९:
* [[अजिंठा-वेरुळची लेणी]]
* [[अजिंठा-वेरुळची लेणी]]
* [[अजिंठा]] (औरंगाबाद जिल्ह्यातील गाव)
* [[अजिंठा]] (औरंगाबाद जिल्ह्यातील गाव)

== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Erola Caves|वेरूळ लेणी}}
{{महाराष्ट्रातील लेणी}}
{{भारतीय बौद्ध लेणी}}


[[वर्ग:औरंगाबाद जिल्हा]]
[[वर्ग:औरंगाबाद जिल्हा]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील उत्खनन स्थळे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील उत्खनन स्थळे]]
[[वर्ग:पर्यटन]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील पर्यटन]]
[[वर्ग:शिल्पकला]]
[[वर्ग:शिल्पकला]]
[[वर्ग:बौद्ध लेणी]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील लेणी]]

१८:१२, २० जुलै २०१७ ची आवृत्ती

  • टिप: मराठी विकिपीडियावर अजिंठा (लेणी) आणि वेरूळ (लेणी) स्वतंत्र लेख आहेत कारण लेख स्वतंत्र ठेवण्यासाठी पुरेसा ज्ञानकोशीय मजकुर उपलब्ध होऊ शकतो. आणि संदर्भातील गल्लत टाळणे बरे पडते. अजिंठा-वेरुळची लेणी हा एकत्र लेख त्या दोन लेखांवर बेतलेला असणे अभिप्रेत आहे. अजिंठा-वेरुळची लेणी लेख पुर्वी मासिक सदर होऊन गेला आहे, तेव्हा तिन्ही लेखांचे संपादन खुले असले तरी या लेखांचे स्थानांतरण कनफ्यूजन्स टाळण्याच्या दृष्टीने सुरक्षीत केले गेले आहे.


औरंगाबाद शहरापासून अवघ्या ३० कि. मी. अंतरावर ही जगप्रसिद्ध लेणी आहेत. या परिसरात एकूण ३४ गुंफा आहेत. सह्याद्रीच्या सातमळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात कोरलेल्या या लेण्यांचे खोदकाम पाचव्या ते आठव्या शतकात पूर्ण झाले असावे तसा तज्ज्ञांचा अंदाज आहे. येथील प्रमुख ३४ गुंफापैकी १७ गुंफा हिंदू धर्म शैलीच्या आहेत, १२ बौद्ध पंथाच्या तर ५ जैन पंथिंयाचा प्रभाव असलेल्या आहेत. अलिकडच्या काळात आणखी २२ गुंफांचा शोध लागला असून त्यावर शैव संपद्रायाचा प्रभाव आहे.


या गुंफांमधील कैलास लेणे म्हणजे स्थापत्य आणि शिल्पकलेचा हृदयंगम मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसच होय. `आधी कळस, मग माया' ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे. कैलास लेणे हे एका सलग पाषाणखंडात कोरलेलं अतिशय भव्य आणि विस्तारित खूप मोठं लेणं आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेलं आहे.

भव्य द्वार मंडप, दोन अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारं इतकं अप्रतिम आणि जिवंत आहे की ही लेणी पाहताना माणूस हतबद्ध होतो. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत. हे लेणं इतकं विस्तृत आहे की ते पाहतानाच वेळ कसा निघून जातो ते कळत नाही.

दहाव्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यात खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्य विहार आणि स्तूप असून स्तुपात बैठी बुद्धमूर्ती आहे. या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. क्र.११ ची गुंफा म्हणजे तिमजली मठ आहे. क्र. २१ ची गुंफा रामेश्वर गुंफा या नावाने प्रसिद्ध आहे. घारापुरी येथील एलिफंटा लेण्यातील शिल्पकलेशी साधर्म्य असलेली क्र. २९ ची लेणी शिव शिल्पांनी व्यापलेली आहे. क्र. ३२ ची गुंफा जैन पंथियांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्याच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेली आहे. सिंहारूढ यक्षीचे शिल्पही या गुंफेत आहे. ही गुंफाही दुमजली आहे.


चित्रदालन

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे