"नवबौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''नवयानी बौद्ध''' किंवा '''नवबौद्ध''' ([[इंग्रजी]]: '''Navayana Buddhist's''' / ''''Neo-Buddhist's''') हे एक [[नवयान]] बौद्धांसाठीचे संबोधन असून ते [[इ.स. १९५६]] च्या [[नागपूर]] येथील धर्मांतर सोहळ्यानंतर [[बौद्ध धर्म]] स्वीकारलेल्या व्यक्तींना विशेषतः पूर्वाश्रमीच्या [[दलित]]ांना लागू होते. ‘नवबौद्ध’चा शब्दश् अर्थ ‘नवीन बौद्ध’ असा घेतला जातो पण याचा अर्थ ‘नवयानी बौद्ध’ असा होय. डॉ. आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना [[महायान]] व [[थेरवाद]] बौद्ध धर्मांची दीक्षा न देता त्यापासून दूर राहण्यास सांगितले त्यांना अंधश्रद्धांची भेसळ काढून शुद्ध स्वरूपाचा ‘[[नवयान बौद्ध धर्म]]’ (नव बौद्धधर्म) दिला. नवयानी किंवा नवबौद्ध हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी स्थापन केलेल्या ''[[नवयान]]'' या [[बौद्ध धर्माचे संप्रदाय|बौद्ध धर्माच्या संप्रदाय]]ाचे अनुयायी असतात.
'''नवयानी बौद्ध''' किंवा '''नवबौद्ध''' ([[इंग्रजी]]: '''Navayana Buddhist's''' / ''''Neo-Buddhist's''') हे एक [[नवयान]] [[बौद्ध धर्म]]च्या अनुयायांसाठीचे संबोधन असून ते [[इ.स. १९५६]] च्या [[नागपूर]] येथील धर्मांतर सोहळ्यानंतर [[बौद्ध धर्म]] स्वीकारलेल्या व्यक्तींना विशेषतः पूर्वाश्रमीच्या [[दलित]]ांना लागू होते. ‘नवबौद्ध’चा शब्दश् अर्थ ‘नवीन बौद्ध’ असा घेतला जातो पण याचा सांप्रदायिक व मूळ अर्थ ‘नवयानी बौद्ध’ असा होय. डॉ. आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना [[महायान]] व [[थेरवाद]] या बौद्ध धर्माच्या संप्रदायाची दीक्षा न देता त्यापासून दूर राहण्यास सांगितले. आणि बौद्ध धम्मातील अंधश्रद्धा व इतर भेसळ काढून शुद्ध स्वरूपाचा ‘[[नवयान बौद्ध धर्म]]’ (नव बौद्धधम्म) दिला. नवयानी किंवा नवबौद्ध हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी स्थापन केलेल्या ''[[नवयान]]'' या [[बौद्ध धर्माचे संप्रदाय|बौद्ध धर्माच्या संप्रदाय]]ाचे अनुयायी होय.


== लोकसंख्या ==
== लोकसंख्या ==

१२:१०, १९ जुलै २०१७ ची आवृत्ती

नवयानी बौद्ध किंवा नवबौद्ध (इंग्रजी: Navayana Buddhist's / 'Neo-Buddhist's) हे एक नवयान बौद्ध धर्मच्या अनुयायांसाठीचे संबोधन असून ते इ.स. १९५६ च्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना विशेषतः पूर्वाश्रमीच्या दलितांना लागू होते. ‘नवबौद्ध’चा शब्दश् अर्थ ‘नवीन बौद्ध’ असा घेतला जातो पण याचा सांप्रदायिक व मूळ अर्थ ‘नवयानी बौद्ध’ असा होय. डॉ. आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना महायानथेरवाद या बौद्ध धर्माच्या संप्रदायाची दीक्षा न देता त्यापासून दूर राहण्यास सांगितले. आणि बौद्ध धम्मातील अंधश्रद्धा व इतर भेसळ काढून शुद्ध स्वरूपाचा ‘नवयान बौद्ध धर्म’ (नव बौद्धधम्म) दिला. नवयानी किंवा नवबौद्ध हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या नवयान या बौद्ध धर्माच्या संप्रदायाचे अनुयायी होय.

लोकसंख्या

इ.स. २०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार भारतातील एकूण अधिकृत बौद्ध (व नवबौद्ध) लोकसंख्येमधील तब्बल ८७% बौद्ध हे धर्मांतरित बौद्ध, म्हणजेच नवयानी बौद्ध आहेत आणि उर्तवरित १३% बौद्ध हे हिमालयीन ईशान्य भारतातील असून ते मूळचे बौद्ध अाहेत. भारतातील ८०% पेक्षा जास्त नवयानी बौद्ध लोकसंख्या महाराष्ट्र राज्यात आहेत.

‘नवबौद्ध’ बद्दल गैरसमज

डॉ. आंबेडकर यांच्यापासून प्रभावित होऊन बौद्ध बनलेले नवयान बौद्ध अनुयायी आज मात्र स्वतःला नवबौद्ध म्हणवून घेत नाहित कारण त्यांनी नवबौद्धचा नवयानी बौद्ध असा संप्रदायीक अर्थ न घेता केवळ ‘नवयानी बौद्ध ’ असा शाब्दिक अर्थ घेतला. वास्तवात मात्र ‘नवयानी बौद्ध’ व ‘नवयान बौद्ध धर्म’ याचे संक्षिप्त रूप अनुक्रमे ‘नव-बौद्ध’ व ‘नव बौद्ध धर्म’ असे आहे..

धम्मचक्रप्रवर्तन दिन

इ.स. १९५६ मधे १४ ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे ५ लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन भारतात बौद्ध धर्माची पुनर्स्थापना केली. हा धर्म अंगिकारून तथाकथित अस्पृश्य हे बौद्धधम्मात आले. भारतातील करोडो अस्पृश्यांना यामुळे अधिक संधी उपलब्ध झाल्या आणि हजारो वर्षांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरीमधून त्यांची मुक्तता झाली. या ऐतिहासिक सोहळ्याला "धम्मचक्रप्रवर्तन दिन" म्हणून संबोधले जाते. या घटनेनंतर बौद्धधम्म पुनःस्वीकारलेल्या समाजाला नवबौद्ध किंवा नवयानी संबोधले जाते.

बावीस प्रतिज्ञा

धम्म दीक्षेबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या धर्मांतरीत नवयानी बौद्ध अनुयायांना बौद्ध धम्माचे सार असलेल्या बावीस प्रतिज्ञा दिल्या. या बौद्ध प्रतिज्ञ्यात बौद्ध धर्माचा सार आहे.


१ ) मी, ब्रह्म, विष्णु आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

२ ) मी, रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

३) मी, गौरी-गणपती इत्यादी हिन्दू धर्मातील देव देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही

४) देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही.

५ ) बुद्ध हा विष्णुचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो.

६) मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही.

७) मी बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचरण करणार नाही.

८) मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करवून घेणार नाही.

९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.

१०) मी समता स्थापन्याचा प्रयत्न करीन.

११) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा आवलंब करीन.

१२) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमितांचे पालन करीन.

१३) मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.

१४) मी चोरी करणार नाही.

१५) मी खोटे बोलणार नाही.

१६) मी व्यभिचार करणार नाही.

१७) मी नशायुक्त कोणत्याही पदार्थाचे सेवन करणार नाही.

१८) प्रज्ञा , शील, व करूणा या बौद्धधम्माच्या तिन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालविन.

१९) मी, माझ्या जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कार्शाला हानिकारक असनाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानना-या हिन्दू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो.

२०) बुद्धधम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.

२१) आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.

२२) इत:पर बुद्धाच्या शिकवनुकी प्रमाने वागेन अशी प्रतिज्ञा करतो.


संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे