"मांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''मातंग''' किंवा '''मांग''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक मागासवर्गीय [[दलित]] जात आहे. [[केतकी|केतकीपासून]] (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मांगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज [[झाडू]] बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची [[तोरण|तोरणे]] बनवणे हे देखील त्यांचे पारंपरिक व्यवसाय होते. पण काळाच्या ओघात पारंपरिक व्यवसाय बंद पडून मांगांचे रोजगार बंद झाले. मातंग [[भारतीय संविधान]]ाच्या कायद्याप्रमाणे [[अनुसूचित जाती]] मध्ये मोडले जातात.
'''मातंग''' किंवा '''मांग''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक मागासवर्गीय [[दलित]] जात आहे. [[केतकी|केतकीपासून]] (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मांगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज [[झाडू]] बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची [[तोरण|तोरणे]] बनवणे हे देखील त्यांचे पारंपरिक व्यवसाय होते. पण काळाच्या ओघात पारंपरिक व्यवसाय बंद पडून मांगांचे रोजगार बंद झाले. मातंग [[भारतीय संविधान]]ाच्या कायद्याप्रमाणे [[अनुसूचित जाती]] मध्ये मोडले जातात.


मांग जातीत किमान १२ पोटजाती असून हा समाज बारा [[बलुतेदार|बलुतेदारांपैकी]] एक समजला जातो. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार २० लाख लोकसंख्या मातंगांची होती. मातंग समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र आढळते. मातंग समाजाची कुलदेवता खंडोबा असून ते त्याची मनोभावे आराधना करतात.
मांग जातीत किमान १२ पोटजाती असून हा समाज बारा [[बलुतेदार|बलुतेदारांपैकी]] एक समजला जातो. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार २० लाख लोकसंख्या मातंगांची होती. मातंग समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र आढळते. मातंग समाजाचा एक मोठा पारंपारिक वर्ग समाजाची कुलदेवता असलेल्या खंडोबाची आराधना करतात तर दुसरा एक वर्ग [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांमुळे प्रभावीत होऊन त्यांनी [[बौद्ध धर्म]] स्वीकारला आहे.


== इतिहास ==
== इतिहास ==

२०:४६, १८ जुलै २०१७ ची आवृत्ती

मातंग किंवा मांग ही महाराष्ट्रातील एक मागासवर्गीय दलित जात आहे. केतकीपासून (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मांगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज झाडू बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची तोरणे बनवणे हे देखील त्यांचे पारंपरिक व्यवसाय होते. पण काळाच्या ओघात पारंपरिक व्यवसाय बंद पडून मांगांचे रोजगार बंद झाले. मातंग भारतीय संविधानाच्या कायद्याप्रमाणे अनुसूचित जाती मध्ये मोडले जातात.

मांग जातीत किमान १२ पोटजाती असून हा समाज बारा बलुतेदारांपैकी एक समजला जातो. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार २० लाख लोकसंख्या मातंगांची होती. मातंग समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र आढळते. मातंग समाजाचा एक मोठा व पारंपारिक वर्ग समाजाची कुलदेवता असलेल्या खंडोबाची आराधना करतात तर दुसरा एक वर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे प्रभावीत होऊन त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे.

इतिहास

भूतकाळातील प्रथा

ग्रहणाच्या वेळी मांग लोक 'दे दान सुटे गीरण' अशी साद घालत गावातून दान मागायचे. सूर्य-चंद्रांना गिळणारे राहू-केतू मांगांचे पूर्वज आहेत अशी यामागची लोककथा आहे. राहू-केतू यांच्यापासून सूर्य-चंद्रांचे ग्रहण सुटावे म्हणून मांगांना ग्रहणकाळात ग्रामस्थांकडून दान दिले जात असे.

शिवकाळ ते स्वातंत्र्यपूर्व काळ

मातंग समाज हा मुळचा रांगडा, आक्रमक तरीही प्रामाणिक तसेच गावचा संरक्षण करता समाज. त्यामुळेच शिवकाळात देखील गडांचे घेरे, चौक्या, पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदारीची जबाबदारीही मातंग समाजाकडे होती. शिवकाळात मातंगांच्या शौर्याची काही उदाहरणे सापडतात यात शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे 'सर्जेराव मांग' व बाजी पासलकर या महाराजांच्या शिलेदाराची उमदी घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी 'येल्या मांग' हे आहेत. शिवकालीन बखरीत व पोवाड्यात यांचा उल्लेख आढळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी मातंग, रामोशी अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरवलं. त्यांना गावांतून तडीपार केले, त्यांच्यावर खोटे आरोप लावले, तेव्हा मातंग समाजाने इंग्रजांच्या विरोधात गांवागांवातून संघर्ष केला. मातंग समाजातील आद्यगुरू श्री. लहुजी साळवे यांनी आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर, वि. दा. सावरकर, महात्मा फुले, वा. ब. फडके इत्यादींना दिले, यामंडळींच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले.

मातंगांची हलगीवादनाची कला

वर्षानुवर्षांपासून गावातील वाद्यवृंद म्हणूनदेखील मातंग समाजाची वेगळी ओळख आहे. 'कुणब्याघरी दाणं अन मांगाघरी गाणं' म्हणजे कुणब्यांकडे धान्य व मातंगांकडे गाणे,अशी ग्रामीण भागात म्हण प्रचलित आहे. गावातील यात्रा, मिरवणुका, हर्षसोहळे यात वादन व त्यातही हलगीवादन मातंगांकडूनच केले जाते. हलगीवादनाचे सादरीकरण आजही गावागावांत मातंगांकडून होते. ही कला आता सातासमुद्रापारही गेली आहे. हलगी, संबळ, दिमडी, डफ हि पारंपारिक विशेषकरून मातंगांची लोकवाद्ये आता प्रसिद्धीच्या झोतात आली आहेत.

सद्यस्थिती

मातंग समाजातील बांधव आज त्यांचा परंपरागत दोरखंड तयार करणे, झाडू तयार करणे इत्यादी. व्यवसायांपासून अलिप्त होऊन शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत होऊ लागला आहे. परंपरागत शेतजमीन असलेली मातंग मंडळी आपली शेती सांभाळत आहेत. याखेरीज सरकारी, खाजगी नोकऱ्यांमध्ये तसेच उद्योजकतेकडे मातंग समाज बांधव वाटचाल करू लागला आहे. एकेकाळी बेडर आणि रांगडा असलेला हा समाज इतर क्षेत्रांतही आपले रांगडेपण सिद्ध करतोय. 

पोटजाती

मातंग समाजातील उपजाती/पोटजाती:-

दखने, खानदेशी, वर्‍हाडे, घोडके, डफळे, उचले, पिंढारी, होलर, गारुडी, ककरकाढे, मांगेला, मदारी, वगैरे.

उल्लेखनिय व्यक्ती

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी