"बराबर लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८: ओळ ८:
== रचना ==
== रचना ==
बाराबारमधील बहुत्क सर्वच लेण्यांत दोन खोल्या आहेत, ज्या पूर्णपणे ग्रॅनाईट या दगडात कोरलेल्या आहेत आणि आतील पृष्ठभागाला उत्तमपणे पॉलिश केलेले आहे. पहिली खोली म्हणजे [[उपासक-उपासिका]] यांना एकत्रपणे बसता यावे, असे मोठे आयताकृती दालन आहे आणि दुसरी खोली त्याहून थोडी लहान, गोलाकार, घुमटासारखे छत असलेली आहे. या आतल्या खोलीत काही ठिकाणी छोट्या स्तूपासारखी रचना आहे. मात्र आज या सगळ्या लेण्या ओस पडलेल्या आहेत.
बाराबारमधील बहुत्क सर्वच लेण्यांत दोन खोल्या आहेत, ज्या पूर्णपणे ग्रॅनाईट या दगडात कोरलेल्या आहेत आणि आतील पृष्ठभागाला उत्तमपणे पॉलिश केलेले आहे. पहिली खोली म्हणजे [[उपासक-उपासिका]] यांना एकत्रपणे बसता यावे, असे मोठे आयताकृती दालन आहे आणि दुसरी खोली त्याहून थोडी लहान, गोलाकार, घुमटासारखे छत असलेली आहे. या आतल्या खोलीत काही ठिकाणी छोट्या स्तूपासारखी रचना आहे. मात्र आज या सगळ्या लेण्या ओस पडलेल्या आहेत.

==यातील काही लेण्या ==
* [[लोमस ऋषींची लेणी]]
* [[सुदामा लेणी]]
* [[वादिथी-का-कुभा लेणी]]
* [[वापिय-का-कुभा लेणी]]
* [[कर्ण-चौपार लेणी]]


==हेही पहा==
==हेही पहा==

१६:३७, १७ जुलै २०१७ ची आवृत्ती

बाराबार लेणी भारतातल्या बिहार राज्यातील जेहानाबाद जिल्ह्यातील मखदूमपूर जवळ असलेली लेणी आहेत. डोंगर खडकामधील ही लेणी भारतातील अजूनही टिकून असलेल्या सर्वात प्राचीन लेण्यांपैकी एक आहेत. ही लेणी मौर्य काळापासून (इ.स.पू. ३२२ ते १८५) अस्तित्वात आहेत. गयेच्या उत्तरेकडे १८ कि.मी. अंतरावर या गुहा आहेत आणि त्यातील काही भिंतीवर सम्राट अशोकांनी कोरून घेतलेला काही मजकूर आहे.

इतिहास

या लेण्या बाराबार आणि नागार्जुनी या जुळ्या डोंगरांवर खोदलेल्या (कोरलेल्या) असून ख्रिस्तपूर्व ३ ऱ्या शतकात, मौर्य कार्यकाळातील आहेत. मौर्य सम्राट अशोक आणि त्यांचा मुलगा दसरश हे दोघे स्वतः बौद्धधर्मीय होते; पण धार्मिक सहिष्णुतेच्या त्यांचा धोरणामुळे त्यांनी वेगवेगळ्या वैदिक (हिंदू) व जैन संप्रदायांना ही आपल्या राज्यात स्थिरावण्यास, परवानगी दिली होती. त्यामुळे आजीविका संप्रदायातले सन्यासी या गुहा (लेण्या) वापरत असत. हा आजीविका संप्रदाय मख्खली गोसाला यांनी स्थापन केला होता. गोसाला हे बौद्ध धर्म संस्थापक गौतम बुद्ध व २४ वे जैन तीर्थंकर वर्धमान महावीर यांचे समकालीन होते. या लेण्यात दगडांना कोरून बनवलेली बौद्ध व हिंदू शिल्पेही आहेत.

पॅसेज टू इंडिया

ई. एम. फॉर्स्टर यांनी लिहिलेल्या ‘पॅसेज टू इंडिया’ या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर या लेण्याच्या परिसराचे चित्र आहे. आणि पुस्तकात अनेक महत्त्वाची चित्रे समाविष्ट केलेली आहेत. लेखकाने स्वतः या ठिकाणास भेट देऊन तिथली छायाचित्रे काढून ‘बाराबार लेण्या’ या नावाचे त्यांच्या पुस्तकात वापरली आहेत.

रचना

बाराबारमधील बहुत्क सर्वच लेण्यांत दोन खोल्या आहेत, ज्या पूर्णपणे ग्रॅनाईट या दगडात कोरलेल्या आहेत आणि आतील पृष्ठभागाला उत्तमपणे पॉलिश केलेले आहे. पहिली खोली म्हणजे उपासक-उपासिका यांना एकत्रपणे बसता यावे, असे मोठे आयताकृती दालन आहे आणि दुसरी खोली त्याहून थोडी लहान, गोलाकार, घुमटासारखे छत असलेली आहे. या आतल्या खोलीत काही ठिकाणी छोट्या स्तूपासारखी रचना आहे. मात्र आज या सगळ्या लेण्या ओस पडलेल्या आहेत.

यातील काही लेण्या

हेही पहा

संदर्भ आणि नोंदी