"बुतकारा स्तूप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''बुतकारा स्तूप''' हा पाकिस्तानच्या स्वात प्रांतातील स्तूप अ...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१९:२८, ८ जुलै २०१७ ची आवृत्ती

बुतकारा स्तूप हा पाकिस्तानच्या स्वात प्रांतातील स्तूप असून हे बौद्धांचे एक महत्त्वाचे पवित्र स्थळ आहे. या स्तूपाचे मूळ निर्मान वा बांधकाम मौर्य सम्राट अशोकांनी केलेले आहे. पण सामान्यतः असेही समजले जाते की, अशोकांनंतर काही काळाने म्हणजे इ.स.पू. २ ऱ्या शतकात ह्याला बांधलेले आहे.

त्यानंतरच्या काही शतकांमध्ये या स्तूपाचा आकार पाच वेळा वाढविण्यात आला. प्रत्येक वेळी आधीच्या बांधकामाच्या बाहेरील बाजूने बांधकाम करत त्यात आधीचे बांधकाम जणू गुंडाळून ठेवावे, असे करत करत स्तूपाचा आकार वाढवला गेला.

उत्खनन

बुतकारा स्तूपाचे उत्खनन एका इटालियन गटाने केले होते. इ.स. १९५५ पासून हे उत्खनन करणाऱ्या या गटाचे नेतृत्व पुराणवस्तुसंशोधक पिअरफ्रान्सिस्को कॅलिएरी यांच्याकडे होते आणि या स्तूपाच्या बांधकामाचे व आकार वाढण्याच्या बद्दलचे विविध टप्पे जाणून घेणे, हा या उत्थननामागचा हेतू होता. या गटाने निर्विवादपणे असे सिद्ध केले सिद्ध केले की, इ.स.पू. २ ऱ्या शतकात, ग्रीक शिल्पशास्त्रानुसार केलेल्या सजावटीची भर घालून हा खूपच मोठा, विशाल केला गेला. ग्रीक-बौद्ध शिल्पशास्त्रात प्रगती करण्यामध्ये, त्या काळात भारताच्या उत्तर-पश्चिमी भागावर राज्य करणाऱ्या इंडो-ग्रीक राजांचा थेट सहभाग होता.

इथे इंडो-कॉरिन्थियन पद्धतीने, पाला-पाचोळ्यात दडलेले एखाद्या बौद्ध विभूतीचे एक छोटे स्मारक सापडले आहे, ज्याच्या तळामध्ये अवशेष (अस्थी) ठेवण्यासाठी वापरली जाणारी पेटी आणि अॅझेस दुसरा यांच्या काळातही काही नाणी पुरून ठेवली होती. जवळच्याच बारिकोट येथील ग्रीक धाटणीची तटबंदीही याच काळातली असावी, असे मानले जाते.

हेही पहा

संदर्भ आणि नोंदी