"नवबौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:


[[इ.स. २०११]] च्या भारतीय जनगणनेनुसार संबंध भारतातील एकूण अधिकृत बौद्ध (व नवबौद्ध) लोकसंख्येपैकी ७७% बौद्ध [[महाराष्ट्र]] राज्यात आहेत.
[[इ.स. २०११]] च्या भारतीय जनगणनेनुसार संबंध भारतातील एकूण अधिकृत बौद्ध (व नवबौद्ध) लोकसंख्येपैकी ७७% बौद्ध [[महाराष्ट्र]] राज्यात आहेत.

नवयान बौद्ध अनुयायी आज मात्र स्वतःला नवबौद्ध (नवीन बौद्ध) म्हणवून घेत नाहित कारण त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून सहा दशके लोटली आहे. तसेच इतर धर्मांतील धर्मांतरित व्यक्तीला जसे, नवमुस्लिम, नवख्रिश्चन, नवहिंदू असे म्हटले जात नाही म्हणून बौद्ध धर्मांतरीताला नवबौद्ध न म्हणता केवळ ‘बौद्ध’ संबोधले पाहिजे असे त्यांचे मत आहे. भारतातील धर्मांतरित बौद्ध व्यक्ती स्वतःला नवबौद्ध म्हणण्यात इच्छूक नसून तो स्वतः बौद्ध किंवा नवयान बौद्ध (आंबेडकरवादी बौद्ध) म्हणवतो.


==धम्मचक्रप्रवर्तन दिन==
==धम्मचक्रप्रवर्तन दिन==

१६:४३, ३ जुलै २०१७ ची आवृत्ती

नवबौद्ध (इंग्रजी: Neo-Buddhist) हे एक बौद्ध संबोधन असून ते इ.स. १९५६ च्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना विशेषतः पूर्वाश्रमीच्या दलितांना लागू होते. ‘नवबौद्ध’चा शब्दश् अर्थ ‘नवीन बौद्ध’ असा होय. नवबौद्ध हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या नवयान बौद्ध संप्रदायाचे अनुयायी असतात.

इ.स. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार संबंध भारतातील एकूण अधिकृत बौद्ध (व नवबौद्ध) लोकसंख्येपैकी ७७% बौद्ध महाराष्ट्र राज्यात आहेत.

नवयान बौद्ध अनुयायी आज मात्र स्वतःला नवबौद्ध (नवीन बौद्ध) म्हणवून घेत नाहित कारण त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून सहा दशके लोटली आहे. तसेच इतर धर्मांतील धर्मांतरित व्यक्तीला जसे, नवमुस्लिम, नवख्रिश्चन, नवहिंदू असे म्हटले जात नाही म्हणून बौद्ध धर्मांतरीताला नवबौद्ध न म्हणता केवळ ‘बौद्ध’ संबोधले पाहिजे असे त्यांचे मत आहे. भारतातील धर्मांतरित बौद्ध व्यक्ती स्वतःला नवबौद्ध म्हणण्यात इच्छूक नसून तो स्वतः बौद्ध किंवा नवयान बौद्ध (आंबेडकरवादी बौद्ध) म्हणवतो.

धम्मचक्रप्रवर्तन दिन

इ.स. १९५६ मधे १४ ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे ५ लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन भारतात बौद्ध धर्माची पुनर्स्थापना केली. हा धर्म अंगिकारून तथाकथित अस्पृश्य हे बौद्धधम्मात आले. भारतातील करोडो अस्पृश्यांना यामुळे अधिक संधी उपलब्ध झाल्या आणि हजारो वर्षांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरीमधून त्यांची मुक्तता झाली. या ऐतिहासिक सोहळ्याला "धम्मचक्रप्रवर्तन दिन" म्हणून संबोधले जाते. या घटनेनंतर बौद्धधम्म पुनःस्वीकारलेल्या समाजाला नवबौद्ध किंवा नवयानी संबोधले जाते.

बावीस प्रतिज्ञा

धम्म दीक्षेबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या धर्मांतरीत नवयानी बौद्ध अनुयायांना बौद्ध धम्माचे सार असलेल्या बावीस प्रतिज्ञा दिल्या. या बौद्ध प्रतिज्ञ्यात बौद्ध धर्माचा सार आहे.


१ ) मी, ब्रह्म, विष्णु आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

२ ) मी, रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

३) मी, गौरी-गणपती इत्यादी हिन्दू धर्मातील देव देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही

४) देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही.

५ ) बुद्ध हा विष्णुचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो.

६) मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही.

७) मी बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचरण करणार नाही.

८) मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करवून घेणार नाही.

९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.

१०) मी समता स्थापन्याचा प्रयत्न करीन.

११) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा आवलंब करीन.

१२) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमितांचे पालन करीन.

१३) मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.

१४) मी चोरी करणार नाही.

१५) मी खोटे बोलणार नाही.

१६) मी व्यभिचार करणार नाही.

१७) मी नशायुक्त कोणत्याही पदार्थाचे सेवन करणार नाही.

१८) प्रज्ञा , शील, व करूणा या बौद्धधम्माच्या तिन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालविन.

१९) मी, माझ्या जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कार्शाला हानिकारक असनाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानना-या हिन्दू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो.

२०) बुद्धधम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.

२१) आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.

२२) इत:पर बुद्धाच्या शिकवनुकी प्रमाने वागेन अशी प्रतिज्ञा करतो.


संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे