"जातिव्यवस्थेचे निर्मूलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''एनाहिलेशन ऑफ कास्ट''' (जातींचे विध्वंसन) हे डॉ. बाबासाहेब आंबेडक...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१४:४७, १७ जून २०१७ ची आवृत्ती

एनाहिलेशन ऑफ कास्ट (जातींचे विध्वंसन) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे बहुचर्चित पुस्तक आहे, याचे प्रकाशन इ.स. १९३६ मध्ये झाले. जात-पात तोडक मंडळाद्वारे आयोजित त्याच्या वार्षिक अधिवेशनात लाहोरमध्ये मार्च १९३६ साली डॉ. आंबेडकरांना अध्यक्षीय भाषण देण्यासाठी आमंत्रित केले गेले होते, परंतु मंडळाच्या सदस्यांनी जेव्हा कार्यक्रमाच्या आधी बाबासाहेबांच्या भाषणाला पाहिले तेव्हा त्यांना ते आपत्तिजनक वाटते. मंडळाच्या सदस्यांनी या भाषणात बदल करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी विनंती केली, मात्र डॉ. बाबासाहेबांनी भाषणात कोणतेही परिवर्तन करण्यास स्पष्ट नकार दिला. शेवटी या मंडळाच्या वार्षिक अधिवेशनाच्या कार्यक्रमाला रद्द केले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच भाषणाला तसाचतशे इ.स. १९३६ मध्ये ‘एनाहिलेशन ऑफ कास्ट’ नावाने पुस्तक रूपात प्रकाशित करून टाकले जेणेकरून जास्तीत जास्त लोक याविषयी जानू शकेल. हा ग्रंथ खूपच गंभीर ग्रंथ आहे. यात डॉ. आंबेडकरांनी जाती-व्यवस्थेच्या आधारावर त्याच्या उन्मूलन संबंधात गंभीर चर्चा केली आहे. जाती व्यवस्थेच्या उन्मूलन संबंधात त्यांनी लिहिले की, ‘‘जर तुम्ही जाती व्यवस्थेत छेद करू पाहत असाल तर तर यासाठी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत वेदांना आणि श्रास्त्रांना डायनामाईट लावावे लागेल, कारण वेद आणि शास्त्र कोणत्याही तर्काने वेगळे करतात आणि वेद व शास्त्र कोणत्याही नैतिकतेपासून वंचित करतात. तुम्ही ‘श्रुति’ आणि ‘स्मृति’ च्या धर्माला नष्ट करायलाच पाहिजे. याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही.’’

हे ही पहा