"उपसंपदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: श्रामणेर अथवा श्रामणेरी यांना भिक्खू करण्याचा एक दीक्षा सं...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१२:१३, १७ जून २०१७ ची आवृत्ती

श्रामणेर अथवा श्रामणेरी यांना भिक्खू करण्याचा एक दीक्षा संस्कार विधी केला जातो त्यास उपसंपदा दीक्षा संस्कार विधी असे म्हणतात. जोपर्यंत प्रवज्जकाचा (श्रामणेराचा) उपसंपदा दीक्षा संस्कार केला जात नाही तोपर्यंत त्यास ‘भिक्खू’ ही उपाधी मिळत नाही. उपसंपदा झाल्यावरच तो भिक्खू संज्ञाला पात्र होतो.

उपसंपदा विधी प्रसंगी आठ वस्तु असतात – चीवर, संघाटी, अन्तरवास, भिक्षापात्र, वस्तरा, सुईदोरा, कमरबंध आणि पाणी गाळण्याचा कपडा. ह्या आठ वस्तूशिवाय प्रवज्जा आणि उपसंपदा दीक्षा संस्कार केला जात नाही. या विधीसाठी कमीत कमी १० भिक्खूगणाची गरज असते. या भिक्खूगणामध्ये १ भिक्खू महास्थवीर असायलाच पाहिजे, त्यांना उपाध्याय नेमतात. बाकीचे नऊ भिक्खूगण स्थवीर (थेरो) असतात. या ९ भिक्खूगणांपैकी दोनजण कम्म वाचाचे कार्य करतात, त्यांना कम्म वाचाचे आचार्य म्हणतात. हे भिक्खूगण श्रामणेराचा उपसंपदा दीक्षा संस्कार करतात.