"मानववंशशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७: ओळ ७:


== द अनटचेबल्स ==
== द अनटचेबल्स ==
[[द अनटचेबल्स]] (अस्पृश्य मूळचे कोण?) या अत्यंत प्रक्षोभक अशा ग्रंथात बाबासाहेबांनी ‘अस्पृश्य मूळचे कोण?’, ते गावाबाहेर का राहतात?, [[गोमांस]] भक्षणामुळे [[अस्पृश्यता|अस्पृश्यतेचा]] उदय झाला आहे का? ब्राह्मण [[शाकाहारी]] कधी झाले? व का झाले? या आणि अशा जून्याच प्रश्नांची एक संपूर्णपणे नवीन मांडणी करून नवीन सिद्धांत त्यांनी मांडले.
[[द अनटचेबल्स]] (अस्पृश्य मूळचे कोण?) या अत्यंत प्रक्षोभक अशा ग्रंथात बाबासाहेबांनी ‘अस्पृश्य मूळचे कोण?’, ते गावाबाहेर का राहतात?, [[गोमांस]] भक्षणामुळे [[अस्पृश्यता|अस्पृश्यतेचा]] उदय झाला आहे का? ब्राह्मण [[शाकाहारी]] कधी झाले? व का झाले? या आणि अशा जून्याच प्रश्नांची एक संपूर्णपणे नवीन मांडणी करून नवीन सिद्धांत त्यांनी मांडले. त्यावेळी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स सुविधा उपलब्ध नव्हती परंतु आपल्या युक्तीवादाच्या समर्थनार्थ [[रामायण]], [[महाभारत]], [[वेद]], [[श्रृती]], [[स्मृती]], [[पुराणे]] या सगळ्यांचा सखोल अभ्यास करून योग्य तो [[संस्कृत]] [[श्लोक]] त्यांनी प्रत्येकवेळी उद्धुत केला आहे.


== संदर्भ ==
== संदर्भ ==

२०:४८, ७ जून २०१७ ची आवृत्ती

मानववंशशास्त्रज्ञ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा एक पैलू आहे. बाबासाहेब हे मानववंशशास्त्रज्ञ होते व या विषयावर त्यांनी महत्त्वपूर्ण लिखान सुद्धा केलेले आहे.

विद्यार्थी दशेत अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी. चा अभ्यास करित असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कास्ट्स इन इंडिया: देअर जेनिसिस, मॅकेनिझम अँड डेव्हलप्मेंट हा मानवशंशास्त्रीय निबंध लिहिला होता. २२ वर्षीय भीमरावांनी लिहिलेला हा अत्यंत बोलका नि महत्त्वपूर्ण रिसर्च पेपर होता. त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे मानववंशशास्त्रावर लिखाण केले नाही. नंतर त्यांनी इ.स. १९४८ च्या सुमारास एकापाठोपाठ एक असे दोन ग्रंथ लिहिले, जे मानववंशशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ होते. त्यातील पहिला ग्रंथ – व्हू वेअर शुद्राज? व दुसरा – द अनटचेबल्स: व्हू वेअर दे अँड व्हाय डिड दे बिकन अनटचेबल्स. हे दोन्ही अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ असतांनाही तितकेच दुर्लक्षित केले गेलेले ग्रंथ होय.

व्हू वेअर शुद्राज

व्हू वेअर शुद्राज? (शूद्र पूर्वी कोण होते?) या ग्रंथात बाबासाहेबांनी चिकात्सा नि मिमांसा केलेली आहे. तसेच ग्रंथात त्यांनी पुरूषसुत्ताची समाजशास्त्रीय पद्धतीने छाननी केली आहे. सुरूवातीला चार वर्ण होते – ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्यशूद्र. नंतरच्या काळात शुद्रांना चातुर्वर्ण व्यवस्थामधून बाहेर काढले व त्यात तीनच वर्ण शिल्लक राहिले. संख्येने बहुसंख्य असणाऱ्या शुद्रांना ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णांचे अधिकार का नाकारण्यात आले? यावर त्यांनी संशोधन नि सखोल अभ्यास केला. चातुर्वर्णात शुद्र हे आत पण अतिशुद्र हे बाहेर, हे का? शुद्र हे सवर्ण पण अतिशूद्र हे अवर्ण, हे का? अशा प्रकारच्या अत्यंत कुट प्रश्नांवर खूप विस्ताराने त्यांनी चर्चा केलेली आहे व वेगवेगळ्या प्रकारचे उतारे नि संदर्भ देऊन त्यांनी त्याची आधुनिक प्रकारे मांडणी केलेली आहे.

द अनटचेबल्स

द अनटचेबल्स (अस्पृश्य मूळचे कोण?) या अत्यंत प्रक्षोभक अशा ग्रंथात बाबासाहेबांनी ‘अस्पृश्य मूळचे कोण?’, ते गावाबाहेर का राहतात?, गोमांस भक्षणामुळे अस्पृश्यतेचा उदय झाला आहे का? ब्राह्मण शाकाहारी कधी झाले? व का झाले? या आणि अशा जून्याच प्रश्नांची एक संपूर्णपणे नवीन मांडणी करून नवीन सिद्धांत त्यांनी मांडले. त्यावेळी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स सुविधा उपलब्ध नव्हती परंतु आपल्या युक्तीवादाच्या समर्थनार्थ रामायण, महाभारत, वेद, श्रृती, स्मृती, पुराणे या सगळ्यांचा सखोल अभ्यास करून योग्य तो संस्कृत श्लोक त्यांनी प्रत्येकवेळी उद्धुत केला आहे.

संदर्भ

बाह्य दुवे