"सविता भीमराव आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २६: ओळ २६:
}}
}}


'''डॉ. सविता भीमराव आंबेडकर''' ([[जानेवारी २७|जानेवारी २७]] [[इ.स. १९०९|१९०९]] - [[मे २९|मे २९]] [[इ.स. २००३|२००३]]) ह्या भारतीय एमबीबीएस डॉक्टर आणि [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या द्वितीय पत्‍नी होत्या. सविता आंबेडकर या '''माई''' किंवा '''माईसाहेब''' नावाने प्रसिद्ध आहेt.
'''डॉ. सविता भीमराव आंबेडकर''' ([[जानेवारी २७|जानेवारी २७]] [[इ.स. १९०९|१९०९]] - [[मे २९|मे २९]] [[इ.स. २००३|२००३]]) ह्या भारतीय एमबीबीएस डॉक्टर आणि [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या द्वितीय पत्‍नी होत्या. सविता आंबेडकर या '''माई''' किंवा '''माईसाहेब''' नावाने प्रसिद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या [[भारतीय संविधान]] लिखाणाच्या काळात, [[हिंदू कोड बिल]] आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या.


== जीवन ==
== जीवन ==

०१:२०, ५ जून २०१७ ची आवृत्ती

सविता भीमराव आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. सविता आंबेडकर यांचे दिल्लीमधील विवाहानंतरचे छायाचित्र, १५ एप्रिल, इ.स. १९४८
टोपणनाव: माई, माईसाहेब, शारदा
जन्म: जानेवारी २७, इ.स. १९०९
मृत्यू: २९ मे, २००३ (वय ९४)
धर्म: नवयान बौद्ध धर्म
प्रभाव: गौतम बुद्ध
वडील: कृष्णराव कबीर
पती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर


डॉ. सविता भीमराव आंबेडकर (जानेवारी २७ १९०९ - मे २९ २००३) ह्या भारतीय एमबीबीएस डॉक्टर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वितीय पत्‍नी होत्या. सविता आंबेडकर या माई किंवा माईसाहेब नावाने प्रसिद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधान लिखाणाच्या काळात, हिंदू कोड बिल आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या.

जीवन

डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे माहेरचे नाव शारदा कबीर होते. त्यांचे घराणे राजापूर तालुक्यातील दोरला गावचे. त्यांचे वडील कृष्णराव कबीर इंडियन मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रार होते. कृष्णरावांना पाच मुली व तीन मुले होती. या एकूण आठ मुलांपैकी ६ भावंडांचा विवाह आंतररजातीय झाला, इतके ते त्या काळातही पुरोगामी विचाराचे होते. याबद्दल माईंना मोठा अभिमान वाटे.

माईसाहेब ह्या विद्यार्थीदशेत अत्यंत हुशार होत्या. त्यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यात घेतले व नंतर मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरीसाठीची एम.बी.बी.एस ही पदवी मिळवली. त्या महाविद्यालयाच्या वसतिगृहात असतांना अभ्यास नि आपण एवढीच त्यांची दिनचर्य होती. या वसतिगृहासमोरच असलेल्या ‘मणिभवन’ येथे १४ ऑगस्ट १९३१ रोजी बाबासाहेब आंबेडकरांची महात्मा गांधींशी मोठी खडाजंगी झाली होती. पण त्या भेटीसंबंधी त्यांना वसतिगृहात असूनही काहीच माहिती नव्हती. त्यांचे एम.डी.च्या परीक्षेचे पेपर्स अत्युत्तम गेले. पण ऐन प्रॅक्टिकल परिक्षेच्या वेळी त्या टाईफाईड, डिहायड्रेशन, बॉईल्स अशा आजाराने खिळल्या व एम.डी. राहून गेले. याच काळाच त्यांनी वैचारिक पुस्तकांचे वाचन केले.

बाबासाहेबांशी भेट

गुजरातमध्ये काही काळ चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून एका हॉस्पिटलमध्ये काम केल्यानंतर शारदा कबीर मुंबईत आल्या आणि निष्णात फिजिओथेरपिस्ट, नामवंत सल्लागार व तज्ज्ञ डॉक्टर अशा मालवणकरांबरोबर काम करू लागल्या. तिथेच इ.स. १९४७ साली त्यांची आणि रक्तदाबाच्या आणि मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली. डॉ. आंबेडकरांची पहिली पत्‍नी रमाबाई आंबेडकर यांचे २७ मे १९३५ रोजी निधन झाले होते. त्यानंतर बाबासाहेबांनी प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टर असलेल्या शारदा कबीर यांचेकडून वैद्यकीय सेवा घेतली.

मुंबईच्या विलेपार्लेमध्ये राहणारे डॉ. एस. राव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घनिष्ठ संबंध होते. तसेच डॉ. शारदा कबीर यादेखील डॉ. राव यांच्या घरी येत जात असत. कारण त्यांच्या मुली आणि शाअदा मैत्रिणी होत्या. त्यांच्याच घरी इ.स. १९४७ मध्ये शारद कबीर आणि बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट झाली, त्यावेळी राव यांनी त्या दोघांची एकमेकांशी ओळख करून दिली..

त्यानंतर आंबेडकर जेव्हा जेव्हा मुंबईला येत तेव्हा ते डॉ. मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर प्रकृतीच्या तपासणीसाठी जात. मालवणकरंनी आंबेडकरांन अनेक पथ्ये आणि औषधांबाबत अनेक सूचना दिल्या होत्या. आंबेडकराना या गोष्टी जमण्यासारख्या नसल्याने डॉ. कबीर यांनी ‘एखादी नर्स ठेवा किंवा मी तुमच्याकडे काही दिवस राहून बाईंना (सौ.आंबेडकरांना) सर्व समजावून सांगेन’, असा सल्ला दिला. डॉ. शारदा कबीर यांना तेव्हा रमाबाईंच्या निधनाबाबत माहिती नसावी.

पुढे बाबसाहेब आंबेडकर एकदा डॉक्टर मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर आले असताना डॉ. कबीर त्यांना पथ्यपाण्याबाबत सांगू लागल्या. अखेर त्यांना बाबासाहेब म्हणाले, ‘अहो पण माझ्या घरात बाईमाणूस नाही, मी अगदी एकटा आहे, हे सर्व कोणाला सांगू?’. त्यावेळी डॉ. शारदा यांना आंबेडकरांच्या एकाकीपणाबाबत समजले.

त्यानंतर दोघांची पुन्हापुन्हा भेट हॊऊ लागली. डॉक्टर आणि पेशंट म्हणून डॉ. आंबेडकरांशी त्यांचे नाते घट्ट झाले होते. त्यावेळी ‘कोणी मला माझे बाबासाहेबांशी लग्न होईल, असे सांगितले असते, तर मी ते कधीही मान्य केले नसते’, असे डॉ. माईसाहेब स्पष्टपणे कबूल करतात. त्यांचा मनात बाबासाहेंबांविषयी अत्यंतिक आदर आणि सहानुभूती होती.

एकदा इ.स. १९४७ च्या डिसेंबरमध्ये बाबासाहेब डॉ. मालवणकरांच्या कन्सलिग रूमवर गेले असताना बाबासाहेबांनी सविता यांना म्हणाले, ‘चला मी तुम्हाला घरी सोडतो, मलाही राजगृहाला जायचे आहे.’ त्यापूर्वीही अनेकदा बाबासाहेब आणि सविता एकत्र बसून बोलायचे. अनेक विषयांवर त्यांच्या चर्चा व्हायच्या.

या भेटींमुळे बाबासाहेबांबद्दल सविता यांना बरीच सखोल माहिती मिळाली होती. त्यातून त्यांच्या मनातील आदर अधिकच वाढला होता. एक दिवस आंबेडकर डॉ. सविता यांना म्हणाले. माझे सहकारी मला सहचारिणी (लग्न) करण्याचा आग्रह करत आहेत. पण मला माझ्या आवडी्ची, योग्यतेची स्त्री मिळणे फार कठीण आहे. तरीही माझ्या कोट्यवधी बांधवांसाठी मला जगायला हवे. त्यामुळे माझी काळजी घ्यायला कोणीतरी असायला हवे. त्यामुळे माझ्यासाठी सुयोग्य स्त्रीचा शोध मी तुमच्यापासून सुरू करतो. अशा प्रकारे बाबासाहेबांनी त्यांना लग्नाची मागणी घातली. पण त्यावर काय उत्तर द्यायचे हे न समजल्याने डॉ. सविता गप्पच राहिल्या.

त्यानंतर डॉ. आंबेडकर दिल्लीला निघून गेले आणि सविताही त्यांच्या कामात गुंतल्या. त्या दिवसाबाबतही त्या विसरून गेल्या. पण एक दिवस अचानक सविता यांना एक पार्सल मिळाले. पार्सलसोबतच्या पत्रात बाबासाहेबांनी डॉ. सविता यांना मागणी घातली होती. पत्रात लिहिले होते, ‘अर्थात तू तयार असशील तरच. तरी तू विचार करून मला कळव. तुझ्या आणि माझ्या वयांतील फरक आणि माझी प्रकृती या कारणांनी तू मला नकार दिलास तरी मला बिलकुल दुःख होणार नाही’.

पत्र वाचल्यानंतर मात्र डॉ. सविता यांना बाबासाहेबांच्या मनातील भावना समजल्या.. त्या बाबासाहेबांच्या मोठेपणाने दिपून गेल्या.. त्यांच्याबाबत आदर असला तरी त्यांची जीवनसाथी होण्याचा विचार त्यांच्या मनात नक्कीच नव्हता. त्यामुळे या विषयावर त्यांच्या मनात बराच खल झाला. एवढ्या मोठ्या महापुरुषाला नकार कसा द्यायचा आणि होकार तरी कसा द्यायचा असे द्वंद्व त्यांच्या मनात सुरू होते. अखेर डॉक्टर मालवणकरांचा सल्ला घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

दुसऱ्याच दिवशी डॉ. सविता डॉ. मालवणकरांशी या विषयावर बोलण्यासाठी गेल्या. धैर्य एकवटून त्यांनी मालवणकरांना बाबासाहेबांनी लिहिलेले ते पत्र दाखवले. त्यावर क्षणभर विचार करत मालवणकर म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी प्रस्ताव ठेवला आहे. त्यांनी काही जबरदस्ती केलेली नाही. त्यामुळे सर्व गोष्टींचा शांतपणे विचार करा आणि योग्य काय तो निर्णय तुम्हीच घ्या.

डॉ. मालवणकरांच्या सल्ल्यानंतर डॉ. सविता अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत घरी आल्या. त्यांनी त्यांच्या मोठ्या भावांना विश्वासात घेऊन काय करावे असे विचारले. त्यांना मोठा भाऊ म्हणाला म्हणजे तू भारताची कायदेमंत्रीण होणार. अजिबात नकार देऊ नकोस. एक भाऊ तर त्यांना चिडवू लागला. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी आंबेडकरांवर जीवापाड प्रेम करतात. ही डॉक्टरीणबाई नकार देते आहे हे कळलं तर तुझी खैर नाही, असे तो गमतीत बोलला.

अखेर रात्रभर विचार करून डॉ. सविता यांनीही होकारच द्यायचा निर्णय घेतला. त्यामागे दोन कारणे होती, एक तर डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे व सेवा करण्यासाठी त्या प्रवृत्त झाल्या आणि शिवाय त्यांच्या भावनांनीही होकार दिलेला होता. एवढ्या मोठ्या माणसाला त्यांना नकार देताच आला नाही. त्यांनी पत्र लिहून आंबेडकरांना होकार कळवला. कोणत्याही परिस्थितीत आंबेडकरांची प्रकृती सुधरवायची म्हणजे त्यांना देशाची घटना लिहिण्याचे ऐतिहासिक काम करता येईल असे त्यांनी ठरवले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. सविता यांच्या लग्नासाठी १५ एप्रिल १९४८ ही तारीख ठरली. दिल्लीला विवाह उरकणार होता. त्यानंतर मधल्या काळात बाबासाहेब आणि सविता यांच्यात बराच पत्रव्यव्हार झाला. त्यातून त्यांचे नाते अधिकच खुलत गेले. बाबासाहेबांनी विवाहासाठी डॉ. मालवणकरांसह अगदी मोजक्या लोकांना आमंत्रित केले होते. कारण तेव्हा देशात दंगली, तणावाचे वातावरण होते.

यावेळी डॉ आंबेडकर दिल्लीच्या १ हार्डिंग्ज अॅव्हेन्यू या सरकारी बंगल्यात राहत होते. १५ एप्रिलला विमानतळावरून डॉ. सविता कुटुंबीयांसह बाबासाहेबांच्या बंगल्यावर गेल्या. बंगल्यावर जातात बाबासाहेबांनी सर्वांची विचारपूस केली. सर्वांच्या ओळख भेटीचा कार्यक्रमही झाला. त्यानंतर त्याठिकाणी असलेल्या श्री. चित्रे यांच्या सूनबाई सविता यांनी आत घेऊन गेल्या. त्यांनी सविता यांना साजशृंगार करण्यास मदत केली. रजिस्ट्रार ऑफ मेरेजेसचे अधिकारीही त्याठिकाणी उपस्थित होते. मोजक्या आप्‍तेष्ठांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आणि डॉ.सविता यांच्या वतीने त्यांना भाऊ वसंत कबीर आणि कमलाकांत चित्रे यांनी तर डॉक्टरसाहेबांच्या वतीने नागपूरचे रावसाहेब मेश्राम यांच्यासह आणखी एकाने सही केली. १५ एप्रिल इ. स. १९४८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी सरकारी पद्धतीने विवाहबद्ध होऊन त्या शारदा कबीरच्या सविता आंबेडकर झाल्या.[१]

आरोप

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांच्या काही अनुयायांनी सविताबाईंवर आंबेडकरांची दुखण्यामध्ये योग्य काळजी घेतली नसल्याचे आणि त्यांनी आंबेडकरांना विषप्रयोगाने मारल्याचे आरोप केले. या आरोपांची चौकशी करण्यासाठी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तज्ज्ञांची एक समिती नेमली. समितीने माई आंबेडकरांना सर्व आरोपांतून मुक्त केले.

त्यानंतर डॉ. माईसोबत आंबेडकर दिल्लीत मेहरोलीच्या फार्म हाऊसमध्ये राहू लागल्या. दलित पँथरच्या काही लोकांच्या आणि रामदास आठवले, गंगाधर गाडे यांच्यासारख्या काही रिपब्लिकन पार्टीच्या तरुण सदस्यांच्या आग्रहाने माईसाहेब [[दलित चळवळ|दलित चळवळीच्या] मुख्य प्रवाहात येत होत्या. मात्र वाढत्या वयामुळे व ढासळत्या प्रकृतीमुळे त्यांना ते फार काळ जमले नाही.

बाबासाहेबांसाहेवरील चित्रपट

डॉ. सविता आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या आठवणी लिहिल्या आहेत. त्याचा आधार घेऊन आणि माईंच्या सक्रिय मदतीच्या आधारे डॉ. जब्बार पटेल यांनी आंबेडकरांच्या आयुष्यावर एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाचा चित्रपट तयार केला आहे.

निधन

डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे दीर्घ आजाराने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात २९ मे इ.स. २००३ रोजी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. तत्कालीन पंतप्रधान, अटल बिहारी वाजपेयी दुःख व्यक्त करताना म्हणाले की, ‘माई आंबेडकर या बाबासाहेबांच्या स्फूर्तीचा स्रोत होत्या. त्या स्वत:च एक मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या.’[२]

बुद्ध आणि त्यांचा धम्म

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘द बुद्ध अॅन्ड हिज् धम्म’ किंवा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. बाबासाहेबांनी त्यांना ८ वर्ष अधिक जगविण्याचे श्रेय डॉ. सविता आंबेडकरांना दिले होते. हे पुस्तक बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीने प्रसिद्ध केले. ती प्रस्तावना जर छापली असती तर दलित चळवळ डॉ. सविता आंबेडकरांच्या हातात गेली असती, असे दलित नेत्यांना वाटले, त्यामुळे ती प्रस्तावना पुस्तकातून गाळण्यात आली, असे रावसाहेब कसबे यांचे म्हणणे, त्यांनी त्यांच्या ‘भक्ती आणि धम्म’ या पुस्तकात मांडले आहे.

माईंनी लिहिलेले पुस्तक

  • डॉ. आंबेडकरांच्या सहवासात

डॉ. माईसाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ हे प्रत्येक भारतीय स्त्रीने आणि प्रत्येक बौद्ध व्यक्तींनी वाचावे इतके चांगले आहे. पुस्तकात बाबासाहेबांप्रती माईसाहेबांचे निस्सीम प्रेम, त्यांचा असीम त्याग, डॉ. बाबासाहेबांना त्यांचे कार्य पूर्ण करता यावे यासाठी त्यांनी बाबासाहेबांच्या आरोग्याची घेतलेली काळजी, हिंदू कोड बिलाच्या मसुद्याकरिता बाबासाहेबांना आवश्यक नोट्स तयार करून देण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, पाली शब्दकोशाचे लेखन करण्यासाठी बाबासाहेबांना नोट्स लिहून देणे अशा अनेक बाबीं नमूद केल्या आहेत. बाबासाहेबांच्या जीवनात माईसाहेबांचे योगदान अनमोल आहे. निवडणुकीतील पराभवाने खचून गेलेल्या बाबासाहेबांना सावरण्यासाठी पत्‍नी म्हणून केलेली धडपड म्हणजे त्यांच्या निस्सीम प्रेमाचे उदाहरण आहे. एवढे सर्व करुनही त्यांच्या वाट्याला उपेक्षा आणि आरोपच आले. तरीही मृत्यूपर्यंत त्यांनी याबाबत कधी त्या काही बौद्ध जनतेविरुद्ध तक्रार केली नाही. कोणताही राग मनांत ठेवला नाही. माईसाहेब आंबेडकरांचे बाबासाहेबांच्या जीवनातील स्थान आणि योगदान अतुलनीय आहे.

माईंच्या नावे योजना

महाराष्ट्र सरकारने आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याची डॉ. सविता आंबेडकर यांच्या नावाची योजना आखली आहे. या योजनेनुसार अशा दांपत्याला १५ हजार रुपये रोख आणि अपत्यांच्या नावाने बँकेत १ लाख रुपये ठेवले जातील आणि मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल. पती सवर्ण आणि पत्‍नी मागासवर्गीय (अनुसूचित जाती-जमाती किंवा इतर मागासवर्गीय) असेल तर हल्ली न मिळणार्‍या या प्रकारच्या सवलतीदेखील देण्याचा विचार आहे.

हेसुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ डॉ. आंबेडकरांच्या सहवासात, लेखिका - डॉ. सविता भीमराव आंबेडकर, विनिमय प्रकाशन, दिव्य मराठी
  2. ^ http://www.thehindu.com/2003/05/30/stories/2003053002081300.htm

बाह्य दुवे