"झिबिग्न्यू ब्रेझिन्स्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: झिबिग्न्यू ब्रेझिन्स्की (Zbigniew Brzezinski) (जन्म : वॉर्सा-पोलंड, २८ मार्च, इ....
(काही फरक नाही)

०५:०६, ४ जून २०१७ ची आवृत्ती

झिबिग्न्यू ब्रेझिन्स्की (Zbigniew Brzezinski) (जन्म : वॉर्सा-पोलंड, २८ मार्च, इ.स. १९२८; मृत्यू : अमेरिका, २६ मे, इ.स. २०१७) हे अमेरिकी परराष्ट्र धोरणाला अनेक नवी वळणे देणारे मुत्सद्दी होते.

ब्रेझिन्स्की हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांचे सुरक्षा सल्लागार होते, एकोणीसशे ऐंशीच्या दशकात जागतिक राजकारणात झालेल्या अनेक उलथापालथींचे साक्षीदार वा निर्माते होते आणि ज्यांच्याविषयी अतिशय आदर बाळगावा असे अभ्यासू लेखक होते.

आधीचे आयुष्य

ब्रेझिन्स्की यांचे वडील पोलंडमधील उमराव होते. कॅनडात राजनैतिक अधिकारी असतान पोलंडवर आधी जर्मनीने आणि मग सोव्हिएट रशियाने त्या देशाचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्‍न केला. परिणामी ब्रेझिन्स्की कुटुंब परत पोलंडात गेलेच नाही. त्यांनी अमेरिकेत आश्रय घेणे पसंत केले.

तरुण झिबिग्न्यू कॅनडातून पदवीधर झाले व नंतर अमेरिकेत स्थलांतर झाल्याने त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. तेथे तत्कालीन सोव्हिएट रशियाचे गाढे अभ्यासक मर्ल फेन्सोड हे त्यांचे मार्गदर्शक होते. त्यामुळे नकळतपणे ब्रेझिन्स्की यांचाही रशिया हा अभ्यासाचा विषय बनला.