"जगन्नाथ वाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५: ओळ १५:
पुढे त्यांच्या पत्‍नीला झालेल्या स्किझोफ्रेनियासारख्या दाहक अनुभवातून धडा घेऊन, या आजाराबद्दल ते अधिक माहिती मिळवू लागले. त्यांनी १९८०मध्ये 'स्किझोफ्रेनिया सोसायटी ऑफ अल्बर्टा' या संस्थेची स्थापना केली. कॅलगरी विद्यापीठात 'स्किझोफ्रेनिया' या विषयावर संशोधन व अध्यासनाची निर्मिती व शिष्यवृत्तीची आर्थिक तरतूदही केली गेली. त्याच धर्तीवर डॉ. जगन्नाथ वाणी यांनी भारतामध्ये १९९७ साली 'स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन' (सा) या संस्थेची स्थापना केली. आजारी व्यक्ती व कुटुंबीयांसाठी स्व-मदत गट, जनजागृती कार्यक्रम आणि धायरी (पुणे) येथे प्रशस्त वास्तुनिर्मिती करून डॉ. जगन्नाथ वाणींनी तिथे पुनर्वसन केंद्राची स्थापना केली. त्यांनीच 'देवराई' या चित्रपटाची निर्मिती करून 'स्किझोफ्रेनियाविषयीची जनजागृती घरांघरांत पोहोचवली.

डॉ. जगन्नाथ वाणी इ.स. १९६५सालापासून कॅनडाचे नागरिक आहेत. त्यांना ''कॅनडा सरकारने ३१ डिसेंबर २०१२ ला 'ऑर्डर ऑफ कॅनडा' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार, प्रदान केला. समाजकार्य, संगीत, आरोग्य, मानसिक आजारांविषयी जनजागृती, शिक्षण, अपंग पुनर्वसन अशा अनेकविध क्षेत्रांतील त्यांचे कार्य लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.
डॉ. जगन्नाथ वाणी इ.स. १९६५सालापासून कॅनडाचे नागरिक आहेत. त्यांना कॅनडा सरकारने ३१ डिसेंबर २०१२ ला 'ऑर्डर ऑफ कॅनडा' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. समाजकार्य, संगीत, आरोग्य, मानसिक आजारांविषयी जनजागृती, शिक्षण, अपंग पुनर्वसन अशा अनेकविध क्षेत्रांतील त्यांचे कार्य लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.

डॉ.जगन्नाथ वाणी यांनी मानसिक आरोग्य, तत्त्वज्ञान, शिक्षण, भारतीय संगीत, यासंबंधित क्षेत्रांमधे १८ सामाजिक संस्था स्थापन केल्या आहेत.
डॉ.जगन्नाथ वाणी यांनी मानसिक आरोग्य, तत्त्वज्ञान, शिक्षण, भारतीय संगीत, यासंबंधित क्षेत्रांमधे १८ सामाजिक संस्था स्थापन केल्या आहेत.
ओळ २८: ओळ २८:
* १९८४च्या ऑगस्टमधे कॅनडात महाराष्ट्र सेवा समिती ही धर्मादाय संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे त्यांनी कॅनडातील विविध सरकारी योजनांमधून, भारतामधे शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी, भारतातील निराधार, अपंग मतिमंद अनाथ, आदिवासी, कुष्ठरोगी, भटक्या जातीचे, गांजलेले शेतकरी भूकंपातील आपद्‌ग्रस्त आणि अनेक गरजूंच्या साहाय्यासाठी व पुनर्वसनासाठी आतापर्यंत कोट्यवधीची आर्थिक मदत पाठविली आहे.

* १९९४सालापासून सुरू असलेल्या विज्ञान वाहिनी या फिरत्या प्रयोगशाळेच्या सुरुवातीच्या खर्चासाठी आर्थिक मदत. आज ही प्रयोगशाळा असलेली बस दरवर्षी १४० ग्रामीण शाळांना भेट देते.
* १९९४सालापासून सुरू असलेल्या विज्ञान वाहिनी या फिरत्या प्रयोगशाळेच्या सुरुवातीच्या खर्चासाठी आर्थिक मदत. आज ही प्रयोगशाळा असलेली बस दरवर्षी १४० ग्रामीण शाळांना भेट देते.

==डॉ. जगन्‍नाथ वाणी यांनी जनजागृतीसाठी निर्माण केलेल चित्रपट==
* एक कप चाय (माहिती अधिकाराच्या प्रचारासाठी)
* डॉक्टर, बाळ बोलत नाही (जन्मतःच मूक-बधिर असलेल्या मुलांवर)
* देवराई (स्मृतिभ्रंशाच्या आजारावरील)

==डॉ. जगन्नाथ वाणी यांनी लिहिलेली पुस्तके==
==डॉ. जगन्नाथ वाणी यांनी लिहिलेली पुस्तके==

२२:४७, १० मे २०१७ ची आवृत्ती

डॉ. जगन्नाथ वाणी (जन्म : नाशिक, १० सप्तेंबर, इ.स. १९३४; मृत्यू : कॅलगरी-कॅनडा, ५ मे, इ.स. २०१७) हे स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (SAA) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते.

जगन्नाथ वाणी यांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई केवळ १४ वर्षांची होती. त्यांना स्वतःच्या वयाच्या दहाव्या वर्षी, आणखी तीन लहान भावंडे होती. प्राथमिक शाळेत, इयत्ता तिसरीत शिकत असतांना कुटुंबीयांच्या काही मित्रमंडळींनी जगन्नाथाच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्या काळात, वाणी परिवारात आणि त्यांच्या सभोवतालच्या समाजात बालविवाह सर्रास चालत. सुदैवाने जगन्नाथ वाणींच्या वडिलांनी अशा प्रथेस खंबीरपणे विरोध केला आणि मुलांच्या शिक्षणावर भर दिला.

१९५४ साली मुंबई बोर्डात मॅट्रिक परीक्षेस बसणार्‍या विद्यार्थ्यांमधे मराठी, कानडी, गुजराथी असे विद्यार्थी असत. त्या वर्षींच्या शालान्त परीक्षेत मुंबई इलाख्यातून एक लाख विद्यार्थ्यांतून उत्तीर्ण झालेल्यांमधे पहिल्या १५ क्रमांकाच्या गुणवत्ता यादीत १४ विद्यार्थी कानडी व गुजराती भाषक होते. एकमेव मराठी भाषक नांव ९व्या क्रमांकावर असलेल्या जगन्नाथ वाणींचे होते.

शालान्त परीक्षेतील भरघोस यशानंतरही नातलग व गावकर्‍यांमार्फत जगन्नाथ वाणींच्या लग्नासाठी अधूनमधून प्रस्ताव येत होतेच. परंतु त्यांच्या शाळेतील शिक्षकांनीच ही लगीनघाई रोखली. १९५५-१९५९ या कालावधीत वाणी फर्ग्युसन महाविद्यालय व पुणे विद्यापीठातून बी.एस्‌सी. ऑनर्स झाले. त्यानंतर त्यांचे लग्न धुळे जिल्ह्यातील नामपूर गांवचे नरहर गोपाळशेट यांची कन्या कमलिनी (पूर्वाश्रमीची कृष्णा) हिच्याशी ३१मे १९५९मधे झाले. १९६०च्या एप्रिलमधे त्यांनी पुणे विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयात एम.एस्‌‌सी.ची पदवी संपादन केली.

नोकरीचे प्रयत्‍न

जगन्नाथ वाणी यांनी सुरुवातीच्या काळात धुळे जिल्ह्यातील शेतकी महाविद्यालयात गणित विषयांची अर्धवेळ प्राध्यापकी आणि खाजगी शिकवण्याही केल्या, पण मनासारखी नोकरी मिळेना. काही ठिकाणी वशिलेबाजी, अंतर्गत राजकारणही नोकरी मिळण्याच्या आणि नोकरी टिकण्याच्या मार्गात आड येई. अशा काळात राष्ट्र सेवादलातील शिबिरांच्या निमित्ताने भेटलेला मित्र जी.पी.पाटील कामी आला. तो त्यांच्या अगोदर, मॅट्रिक परीक्षेत गुणवत्ता यादीत पहिल्या दहांत येऊन पुढे संख्याशास्त्र विषयात एम्‌.एस्‌‌सी. पदवी घेऊन कॅनडातील मॅकगिल विद्यापीठात संख्याशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाला होता. त्याच्या मदतीने जगन्नाथ वाणींना त्याच विद्यापीठात गणितीय संख्याशास्त्र (मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स)मधे पीएच.डी. करण्यासाठी प्रवेश व आर्थिक मदत मिळाली.

इ.स. १९६७मध्ये पीएच.डी. झाल्यावर जगन्नाथ वाणी पुढे कॅनडातील कॅलगरी विद्यापीठात प्राध्यापक झाले आणि तेथूनच १९९५मध्ये निवृत्त झाले. त्या विद्यापीठात त्यांनी विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रम, शिका व कमवा योजना, विविध शिष्यवृत्त्यांची निर्मिती, कॅलगरी विद्यापीठाचा पुणे विद्यापीठस्थित परदेश सत्र अभ्यासक्रम, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भारतातील पहिल्या विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या स्थापनेसाठी चालना, असे काही शैक्षणिक प्रकल्प सुरू केले होते.

पुढे त्यांच्या पत्‍नीला झालेल्या स्किझोफ्रेनियासारख्या दाहक अनुभवातून धडा घेऊन, या आजाराबद्दल ते अधिक माहिती मिळवू लागले. त्यांनी १९८०मध्ये 'स्किझोफ्रेनिया सोसायटी ऑफ अल्बर्टा' या संस्थेची स्थापना केली. कॅलगरी विद्यापीठात 'स्किझोफ्रेनिया' या विषयावर संशोधन व अध्यासनाची निर्मिती व शिष्यवृत्तीची आर्थिक तरतूदही केली गेली. त्याच धर्तीवर डॉ. जगन्नाथ वाणी यांनी भारतामध्ये १९९७ साली 'स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन' (सा) या संस्थेची स्थापना केली. आजारी व्यक्ती व कुटुंबीयांसाठी स्व-मदत गट, जनजागृती कार्यक्रम आणि धायरी (पुणे) येथे प्रशस्त वास्तुनिर्मिती करून डॉ. जगन्नाथ वाणींनी तिथे पुनर्वसन केंद्राची स्थापना केली. त्यांनीच 'देवराई' या चित्रपटाची निर्मिती करून 'स्किझोफ्रेनियाविषयीची जनजागृती घरांघरांत पोहोचवली.

डॉ. जगन्नाथ वाणी इ.स. १९६५सालापासून कॅनडाचे नागरिक आहेत. त्यांना कॅनडा सरकारने ३१ डिसेंबर २०१२ ला 'ऑर्डर ऑफ कॅनडा' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. समाजकार्य, संगीत, आरोग्य, मानसिक आजारांविषयी जनजागृती, शिक्षण, अपंग पुनर्वसन अशा अनेकविध क्षेत्रांतील त्यांचे कार्य लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.

डॉ.जगन्नाथ वाणी यांनी मानसिक आरोग्य, तत्त्वज्ञान, शिक्षण, भारतीय संगीत, यासंबंधित क्षेत्रांमधे १८ सामाजिक संस्था स्थापन केल्या आहेत.

जगन्नाथ वाणींचे इतर समाजकार्य

  • वेदान्त सोसायटी ऑफ कॅलगरी या संस्थेची १९७३मधे स्थापना करून पौर्वात्य धर्माचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठात शिष्यवृत्तीची तरतूद.
  • भारतीय संगीत व नृत्याचा कॅलगरीतील रसिकांनी लाभ घ्यावा ह्यासाठी १९७५मधे ’म्युझिक सोसायटी ऑफ कॅलगरी’ची स्थापना.
  • रागमाला परफॉर्मिंग आर्ट्‌स ऑफ कॅनडा’ची १९८२मधे स्थापना करून त्यातून उत्तर अमेरिकेत भारतीय संगीत व नृत्याचा प्रचार. आणि प्रसाराच्या हेतूने शिष्यवृत्त्या, संगीत मैफिलींचे आयोजन. विद्यापीठांतून जागतिक संगीत अभ्यासक्रमांची सुरुवात.
  • भारतीय शास्त्रीय संगीत व नृत्य या विषयांना वाहून घेतलेल्या उत्तर अमेरिकेतल्या ’बांसुरी’ ह्या इंग्रजी नियतकालिकाचे १९८४मधे संस्थापक आणि १९९३ पर्यंत संपादक.
  • साउंड्‌स ऑफ इंडिया ब्रॉडकास्टिंग असोशिएशन, अल्बर्टा कल्चरल हेरिटेज कौन्सिल, अल्लाउद्दीन स्कूल ऑफ म्युझिक, चेंबर म्युझिक सोसायटी ऑफ कॅलगरी, कॅमरोझ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट या संघटनांच्या कार्यकारी मंडळांचे सदस्य.
  • धुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी अन्नछत्राच्या समितीवर त्यांनी काम केले आहे.
  • १९८४च्या ऑगस्टमधे कॅनडात महाराष्ट्र सेवा समिती ही धर्मादाय संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे त्यांनी कॅनडातील विविध सरकारी योजनांमधून, भारतामधे शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी, भारतातील निराधार, अपंग मतिमंद अनाथ, आदिवासी, कुष्ठरोगी, भटक्या जातीचे, गांजलेले शेतकरी भूकंपातील आपद्‌ग्रस्त आणि अनेक गरजूंच्या साहाय्यासाठी व पुनर्वसनासाठी आतापर्यंत कोट्यवधीची आर्थिक मदत पाठविली आहे.
  • १९९४सालापासून सुरू असलेल्या विज्ञान वाहिनी या फिरत्या प्रयोगशाळेच्या सुरुवातीच्या खर्चासाठी आर्थिक मदत. आज ही प्रयोगशाळा असलेली बस दरवर्षी १४० ग्रामीण शाळांना भेट देते.

डॉ. जगन्‍नाथ वाणी यांनी जनजागृतीसाठी निर्माण केलेल चित्रपट

  • एक कप चाय (माहिती अधिकाराच्या प्रचारासाठी)
  • डॉक्टर, बाळ बोलत नाही (जन्मतःच मूक-बधिर असलेल्या मुलांवर)
  • देवराई (स्मृतिभ्रंशाच्या आजारावरील)

डॉ. जगन्नाथ वाणी यांनी लिहिलेली पुस्तके

  • अंधारातील प्रकाशवाटा (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे)
  • Probability and Statistical Inference
  • Triumphs and Tragedies (का.स. वाणी मेमोरियल ट्रस्ट प्रकाशन, धुळे)

पुरस्कार

  • कॅनडा सरकारचा ऑर्डर ऑफ कॅनडा हा पुरस्कार
  • इतर अनेक अन्य पुरस्कार