"कल्पना सरोज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८२: ओळ ८२:


== बाह्य दुवे==
== बाह्य दुवे==
*[http://www.achhikhabar.com/2016/01/25/kalpana-saroj-suceess-story-in-hindi-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C/ कल्पना सरोजच्या यशाची कथा (हिंदी)]

== संदर्भ==
== संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

०८:२७, ८ मे २०१७ ची आवृत्ती

कल्पना सरोज
जन्म डिसेंबर, १९६१ (1961-00-00) (वय: ६३)
निवासस्थान मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा उद्योजक
धर्म बौद्ध धर्म
संकेतस्थळ
www.kalpanasaroj.com

कल्पना सरोज भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक महिला उद्योजक आहे. तसेच ह्या मुंबईत कामणी-ट्यूबच्या अध्यक्ष आहेत.

मूळ "स्लमडॉग मिलियनेयर" म्हणून ओळखले जाणाऱ्या कल्पना सरोजांनी कामणी टुबेस् कंपनीच्या त्रासदायक मालमत्तेची खरेदी केली आणि यशस्वीपणे कंपनीला नफा मिळवून दिला.

जीवन

विदर्भातील रोपरखेडा ता. मुर्तीजापुर जि. अकोला येथील एका बौद्ध कुटुंबात कल्पना सरोज ह्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पोलीस कॉन्स्टेबल असल्यामुळे त्यांचे कुटुंब पोलीस क्वार्टर मध्ये राहत. त्याच्या कुटुंबात तिघी बहिणी व दोन भाऊ, त्यामध्ये कल्पना सर्वात मोठया होत. मुलीने खूप शिकावे ही त्यांच्या वडीलांची इच्छा होती, परंतु नातेवाईकांच्या आग्रहामुळे त्यांचे लग्न बालवयात म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षी झाले.

उद्योजक होण्यापूर्वी

कल्पनाच्या लग्नामुळे त्यांच्या वडीलांना आनंद झाला लग्नानंतर काही दिवसांनी ते कल्पना यांच्या परंतु कल्पना यांच्या घरी गेले. आणि साधारपण परंतु अन्नधान्यांने परिपूर्ण असलेल्या माहेरी वाढल्या परंतु सासरी मोठे कुटुंब असल्यामुळे घरच्या सर्व कामाचा भार तसेच घरकामे न झाल्यास मारहाण यामुळे त्यांची शारीरिक अवस्था कृष्य व बिकट झाली होती. सासरी कामाचा अधिक भार असल्यामुळे त्यांना जेवनही वेळेवर मिळत नसे. म्हणून कल्पना यांच्या वडिलांनी त्यांना कायमचे त्यांच्या घरी आणले.

वडिलांनी कल्पना यांना घरी आणल्या नंतर त्यांच्या जवळील नातेवाईकांनी त्यांना सासर सोडल्या बद्दल दूषणे देण्यास सुरूवात केली. यातुनच त्यांनी नैराश्यातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या त्यातून बचावल्या. त्या नंतर मात्र त्यांनी स्वतःला खंबीर व जिद्दी बनविले.

मुंबईत वास्तव्य

कल्पना सरोज, दिलीप आणि मन्नन गोरे खैरलांजी चित्रपट चित्रिकरणावेळी अकोला येथे

पुढे काही दिवसांनी त्यांनी मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला त्यासाठी वडीलांची विनवनी करून त्यांना राजी केलं. आता झुकायचं नाही तर लढायच असा पक्का निर्धार केला. त्या मुंबईत दादरला आपल्या काकाकडे रहायला आल्या. एका गारमेंट्स च्या कंपनीत कामाला लागल्या. त्यावेळी त्यांना दरदिवशी रोज होता फक्त दोन रूपये व वय होतं अवघं १६ वर्षे. तेवढ्यातच काही कारणास्तव वडीलांची नोकरी गेली त्यामुळे घरची थोरली ह्या नात्याने घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली. पैशाची चनचन वाढली म्हणुन त्यांनी घरी कपडे शिवायचं काम सुरू केले. आता त्या दररोज १६-१६ तास काम करायच्या व कसबस्या घर भागवायच्या. पण तितक्यात परिवारावर आणखी एक संकट आलं. त्यांच्या एका बहीनीला कँसर झाला. पैशाअभावी पुरेसा उपचार करता आला नाही व तिचा मृत्यु झाला. आता कल्पना सरोज आणखी जिद्दी पेटल्या. त्यांनी ज्योतीबा फुले स्कीम अंतर्गत कर्ज घेउन काही शिलाई मशीन विकत घेतल्या व कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरू केला. आणखी काही दिवसांनी परत कर्ज घेऊन फर्नीचर विकायचा व्यवसाय सुरू केला. आता परिस्थितित हळुहळु बदल होत होता. थोडफार पैसेही जमा झाले होते. तेवढ्यातच एक भुखंड विक्रीस आहे व तुम्ही तो घ्या असा त्यांना प्रस्ताव आला. जमीन मालक कुठल्याही किमतीत द्यायला तयार होता. कारण तो भुखंड जरी मोक्याच्या ठिकानी होता पण बऱ्याच लेटीकेशन्ससाचा:मराठी शब्द मुळे त्याची किंमत मातीमोल झाली होती. कल्पना सरोज नी तो विकत घेतला व बरेच दिवस न्यायालयात पायपीट करून सगळे लेटीकेशन्स दुर केले. आता रातोरात त्या भुखंडाची किम्मत लाखोत झाली. त्यावर भूमाफियांची नजर पडली. त्यांना धमकीचे फोन यायला लागले. पण मृत्युच्या दाडेतुन परत आलेली कल्पना घाबरेल तर शर्यत. एकानी तर त्यांच्या नावाची सुपारी पण दिली होती पण पोलीसांच्या प्रसंग सावधानीने काही अवचीत घडले नाही. पुढे एका बिल्डरच्या मदतीने तीथे एक बहुमजल्याची इमारत उभी राहीली. त्यातुन कल्पना सरोज ह्यांना तब्बल ५ कोटीचा फायदा झाला. अशा प्रकारे त्यांची कंस्ट्रक्शन व्यवसायात एंट्री झाली. पुढे त्यांनी अनेक इमारती उभ्या केल्या व ते काम अविरत चालु आहे.

रामजीभाई कमानी एक स्वातंत्र्य सेनानी व हाडाचे उद्योजक. स्वातंत्र्यानंतर त्यांनी कुर्ला येथे येउन "कमानी ट्यूबस व कमानी इंजीनियरिंग "ही ब्रास ट्यूब तयार करण्याची कंपनी सुरू केली. त्यांच्या मृत्यु पश्चात मुलांमध्ये प्रॉपर्टी वरून वाद निर्माण झाले व हायकोर्टाने त्या कंपनीची मालकी कामगार यूनियन कडे सोपवली. आता त्या कंपनीचे २००० मालक झाले. एक ना धड भाराभर चिंध्या अशी कंपनीची हालत झाली व काही दिवसातच कंपनी कर्जात डुबून बंद झाली. कर्ज परतफेड साठी ती कंपनी हाईकोर्ट ने लिलावात काढली. कल्पना सरोज ह्याच्याकडे कामाला असलेल्या काही लोकांनी ही खबर त्यांच्या कानावर घातली व तुम्ही ती कंपनी विकत घ्या असा आग्रह केला. त्यांनी त्या कंपनीची माहीती घेतली व कंपनी विकत घ्यायचं ठरवलं.इथे दोन मोठे अडथळे होते. एक तर कंपनीवर असलेलं कर्ज व शेकडो लेटीकेशन्स. त्यांनी तब्बल २००० सालापासुन तर 2006 पर्यंत कोर्टात चकरा मारून सगळे लेटीकेशन्स दुर केले. शेवटी 2006 मध्ये हाईकोर्ट ने त्यांना कंपनी चे सर्वेसर्वा बनवले व कर्ज फेडायला सात वर्षाची मुदत दिली. कल्पना सरोज नी देनगीदार बँकासोबत बोलुन पेनाल्टी व व्याज माफ करवून घेतलं. आता कर्जाची किम्मत अर्ध्यावर आली. उरलेलं कर्ज त्यांनी एका वर्षात निल केलं शिवाय कामगारांचा थकीत पगारही देउ केला.काही दिवसातच लॉस मध्ये असणारया कंपनी ला नफ्यात बदललं. अशाप्रकारे त्यानी कमानी ट्यूबस कंपनी टेकोव्हर केली. आज कंपनी ची मार्केट व्हैल्यु 750 कोटी पेक्षा जास्त आहे.कुर्ला येथी एका भागाला "कुर्ला कमानी" हे नाव याच कंपनीची देन आहे. कल्पना सरोज ह्यांची टोटल प्रॉपर्टी $122 मिलीयन एवढी आहे.

सोशल वर्क मध्ये पण त्याना खुप आवड आहे. त्यासाठी त्यानी एक N G O पण उघडला. शिक्षण संस्था सुरू केली.दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर एक पुरस्कार पण ते होस्ट करतात. त्यानी एक KS Films म्हणुन प्रोडक्शन हाउस सुरू केले. त्या बैनर वर त्यांनी "खैरलांजी" नावाचा मराठी चित्रपट तयार केला. 2016 मध्ये युनो हेडक्वार्टर ला बाबासाहेबांची 125 वी जयंती साजरी झाली त्यात त्यांची मुख्य भूमिका होती. त्या DICCI(Dalit Indian chamber of Commerce And Industry) ह्या संघटनेच्या सदस्य आहेत.

त्यांच्या वुमन एंपावरमेंट व आँट्रप्रेनुअरशीप साठी भारत सरकारने 2013 साली त्यांचा पद्मश्री हा खीताब देउन गौरव केला. त्या "भारतीय महीला बँकेच्या " बोर्ड डायरेक्टर आहेत. हा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहील्या मराठी महीला आहेत.

पुरस्कार

  • कल्पना सरोज यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.[१]

संदर्भ आणि नोंदी


हे ही पहा

बाह्य दुवे

संदर्भ