"खासगाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ३७: | ओळ ३७: | ||
== शैक्षणिक सुविधा == |
== शैक्षणिक सुविधा == |
||
गावांमध्ये अनेक शैक्षणिक केंद्रे अपलब्ध आहेत. |
|||
गावांमध्ये अनेक शाळा आहेत. गावात एक [[जिल्हा परिषद प्रशाला]] ही शासकीय माध्यमिक [[शाळा]], एक शासकीय केंद्रिय [[प्राथमिक शाळा]], एक अभिजीत कला व वाणिज्य हे कनिष्ठ माध्यमिक विद्यालय, जिजाऊ इंग्लिश स्कूल व इतर काही शाळा आहेत. |
|||
* जि. प. केंद्रिय प्राथमिक शाळा, खासगांव (प्राथमिक) (विद्यार्थी संख्या - ४४) |
|||
* [[जिल्हा परिषद प्रशाला]], खासगांव (माध्यमिक) (विद्यार्थी संख्या - २२०) |
|||
* अभिजीत कला व वाणिज्य महाविद्यालय, खासगांव |
|||
* जिजाऊ इंग्लिश स्कूल, खासगांव |
|||
याशिवाय ही काही वस्ती शाळा गावात आहेत. |
|||
== वैद्यकीय सुविधा == |
== वैद्यकीय सुविधा == |
१२:५९, २० एप्रिल २०१७ ची आवृत्ती
?खासगांव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | जाफ्राबाद |
विभाग | औरंगाबाद |
जिल्हा | जालना |
तालुका/के | जाफ्राबाद |
लोकसंख्या लिंग गुणोत्तर |
३,५७३ (२०११) ९०३ ♂/♀ |
भाषा | मराठी, हिंदी |
खासगांव हे जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातील एक विकसनशील गाव आहे. जाफ्राबाद पासून हे गाव ९ कि.मी. अंतरावर आहे. वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान, तसेच तंत्रज्ञानाच्या विविध योजना व उपक्रम या येथे राबवल्या गेल्या आहेत.
लोकसंख्या
खासगाव येथे इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार ७३८ कुटुंब असून लोकसंख्या ३,५७३ आहे. पैकी पुरूष लोकसंख्या १८७८ तर स्त्रीयांची संख्या १६९५ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या ४९४ (पुरूष २८१ तर स्त्री २१३) असून ते एकूण लोकसंख्येच्या १३.८३ % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या २१२ असून त्यात १०६ पुरूष व १०६ स्त्रीयां आहेत तर अनुसूचित जमातीचे १० लोक असून त्यात ६ पुरूष व ४ स्त्रीया आहेत. [२]
साक्षरता
- एकूण साक्षर लोकसंख्या: ७४.३७ %
- साक्षर पुरुष लोकसंख्या: ८६.१६ %
- साक्षर स्त्री लोकसंख्या: ६१.६७ %
ग्रामसंसद
खासगांवातील ग्रामपंचायत सदस्य संख्या ११ असून एकूण मतदार संख्या २,७०१ आहे, ज्यात १,४७६ पुरुष व १,२२५ स्त्रिया आहेत.
शैक्षणिक सुविधा
गावांमध्ये अनेक शैक्षणिक केंद्रे अपलब्ध आहेत.
- जि. प. केंद्रिय प्राथमिक शाळा, खासगांव (प्राथमिक) (विद्यार्थी संख्या - ४४)
- जिल्हा परिषद प्रशाला, खासगांव (माध्यमिक) (विद्यार्थी संख्या - २२०)
- अभिजीत कला व वाणिज्य महाविद्यालय, खासगांव
- जिजाऊ इंग्लिश स्कूल, खासगांव
याशिवाय ही काही वस्ती शाळा गावात आहेत.
वैद्यकीय सुविधा
शासकीय
- खासगांव येथे एक मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच एक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुद्धा आहे.
अशासकीय
गावात 2 पेक्षा अधिक वैद्यकीय सुविधा असलेले दवाखाने आहे.
पिण्याचे पाणी
खासगांवात शुद्ध पाणी उपलब्ध आहे, ५ रूपयामध्ये १५ लिटर तसेच १ रू मध्ये १ लिटर फिल्टर केलेले पाणी अशी अशी व्यवस्था गावांत केलेली आहे. गावात पिण्याचे पाण्याचे विविध स्त्रोत आहे.
गावात एका दुर्गा देवीच्या मंदिराजवळ पाण्याची हात पंप आहे. गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा, झऱ्याच्या पाण्याचा आणि नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे.
स्वच्छता
खासगांव हे स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर आहे. गावात कुठेही उघडी गटारव्यवस्था उपलब्ध नाहीत. रोज सकाळी येणारी ग्रामपंचायतीची कचरा गाडी उपलब्ध आहे.
हगनदारी मुक्त
गावात जवळजवळ ९९% जणांनी शौचालये बांधलेली असून हे गाव हगनदारी मुक्त आहे.
संपर्क व दळणवळण
खासगांव येथे पोस्ट ऑफिसची सुविधा उपलब्ध असून त्याचा पिन कोड ४३१ २०६ आहे. गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात शासकीय बस सेवा तसेच ऑटोरिक्षा, टॅक्सी व व्हॅन उपलब्ध आहे.
बाजार व पतव्यवस्था
गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध असून तो गुरूवार या दिवशी असतो. गावच्या बाजारात गाय, बैल, म्हैस, शेती इत्यादी पशूंचीही खरेदी विक्री केली जाते.
लोकजीवन
खासगावांत विविध जाती - धर्माचे लोक राहतात. त्यात प्रामुख्याने मराठा, गोंधळी, मुस्लिम, धनगर, माळी, बौद्ध हे समाज आहेत. तसेच वडार, चांभार, मांग इत्यादी समाज सुद्धा अल्प प्रमाणात आहेत.
धार्मिक स्थळे
गावात अनेक देवस्थाने आहेत, हनुमान मंदिर, विठ्ठल रूक्माई मंदिर - शिवमंदिर, दुर्वादेवी मंदिर ही हिंदूंची प्रमुख धर्मस्थळे आहेत. गावांत दोन मस्जिदी व बौद्ध विहार सुद्धा आहे.
आरोग्य
गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात पाच अंगणवाड्या (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहेत. गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे.
गावात कपड्डीचे क्रिंडागण उपलब्ध आहे. गावात खेळ / करमणूक केंद्र उपलब्ध नाही. सर्वात जवळील खेळ / करमणूक केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
साने गुरूजी सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध आहे. गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे.
वीज
प्रतिदिवस १८ तासांचा वीजपुरवठा घरगुती वापरासाठी, शेतीसाठी व व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे.
उत्पादन
खडकदेवळा ह्या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या क्रमाने): कापूस, गहू, बाजरी, ज्वारी, मका, भुईमूग, तूर, मूग