"डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
पुरस्कार
(काही फरक नाही)

१७:०५, १३ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारद्वारे दिला जानारा एक पुरस्कार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी, पीडीत, दुर्लक्षित या गरजूंची निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा व कामाची दाद घ्यावी यासाठी शासनाने १९७१-७२ पासून हा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत केली आहे.

लाभाचे स्वरुप

५१ व्यक्ता व १० संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराची रक्कम प्रती व्यक्ती रू. १५,०००/- व प्रती संस्था रू. २५,०००/- एवढी निश्चित केलेली आहे. हा पुरस्कार दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल या आंबेडकर जयंती रोजी प्रदान करण्यात येतो.